आजचं मार्केट – ७ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ७ जून २०१९

आज क्रूड US $ ६२.२५ प्रती बॅरल ते US $ ६३.०४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.४२ ते US $१= Rs ६९.४८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७ होता.

G-२० देशांची मीटिंग या महिन्याच्या अखेरीस आहे. त्यानंतरच टॅरिफचे दर वाढवले जातील.USA आणी चीन यांच्यात बोलणी होतील. नंतरच रेट वाढवण्यावर विचार होईल.

मेक्सिकोच्या मालावर USA सोमवार पासून ५% ड्युटी लावणार होते. . मेक्सिकोने काही वेळ मागितला आहे हा वेळ USA देईल असे वाटते.

सेबीनी ५ AMC कंपन्यांना इन्सायडर ट्रेडिंगच्या संदर्भात नोटीस पाठवली आहे. मन्नापुरम फायनान्स या कंपनीच्या ट्रेडिंगच्या संदर्भात ही नोटीस पाठवली आहे. ही नोटीस २०१३ मधील केसच्या संदर्भात पाठवली आहे.
RBI च्या अधिकार कक्षेत हौसिंग फायनान्स कंपन्या येत नाहीत. ८ महिने होऊन गेले. ज्या काही अडचणी आहेत त्या हौसिंग फायनान्स NBFC च्या बाबतीत आहेत. या हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना ज्या बँकांनी कर्ज दिले आहे त्या बँकासुद्धा अडचणीत आल्या आहेत. निवडणुका असल्यामुळे या समस्येवर तोडगा काढला गेला नाही. SBI चा शेअर पडू लागल्यानंतर SBIनी खुलासा केला की आम्ही हाऊसिंग फायनान्स कंपन्यांसाठी पुरेशी प्रोव्हिजन केली आहे.
सिमेंट कंपन्या सिमेंटचे दर वाढवणार होत्या म्हणून सिमेंटचे शेअर वाढले होते. पण नितीन गडकरींनी सर्व सिमेंट कंपन्यांना सांगितले की आम्ही बरेच इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सुरु करीत आहोत. तुम्ही सिमेंटचे दर वाढवू नका. त्यातच पावसाळा समोर आहे.त्यामुळे सिमेंटचे शेअर पडले.

हाऊसिंग फायनान्स कंपन्या आणि DHFL या खाजगी कंपन्या आहेत त्यामुळे सरकारच्या हातात फारसे काही नाही. हाऊसिंग फायनान्स कंपन्याना बँकांचे खालील प्रमाणे एक्स्पोजर आहे.

SBI Rs ८८०० कोटी, बँक ऑफ बरोडा Rs ४४९० कोटी, बँक ऑफ इंडिया Rs ३५६० कोटी, युनियन बँक Rs २५१० कोटी, कॅनरा बँक Rs २४०० कोटी, सिंडिकेट बँक Rs १५९० कोटी हे एक्स्पोजर मुख्यतः IL & FS, ADAG,DHFL या कंपन्यांचे एक्स्पोजर आहे. येस बँक आणि IDBI बँकेचेही एक्स्पोजर आहे.

NIPPON लाईफ कंपनीची ओपन ऑफर १६ जुलैला उघडेल आणि २९ जुलैला बंद होईल. Rs २३० प्रती शेअर प्राईस आहे.या ओपन ऑफर द्वारे ही कंपनी रिलायन्स NIPPON ऍसेट मॅनेजमेंटमध्ये २२.४९% स्टेक घेईल. १३.८२ कोटी शेअर्स Rs ३१७९ कोटींना खरेदी होतील.

इंडिया बुल्स रिअल इस्टेट मधील १६.४६% स्टेक प्रमोटर्सनी Rs १०६६ कोटींना Rs १५१ प्रती शेअर या भावाने ब्लॅकस्टोन आणि एम्बसी पार्क या कंपन्यांना विकला. एम्बसी पार्क ओपन ऑफर आणेल. लक्ष्मी विलास बँकेच्या बरोबर होणाऱ्या मर्जरमध्ये ही अडचण येत होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९६१५ NSE निर्देशांक निफ्टी ११८७० बँक निफ्टी ३१०६६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.