आजचं मार्केट – १० जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १० जून २०१९

आज क्रूड US $६३.३३ प्रती बॅरल ते US $६३.६१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.४५ ते US $१=Rs ६९.५२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.८४ आणि VIX १५.४१ होते.

RBI ने स्ट्रेस्ड ऍसेटच्या बाबतीत नवीन सर्क्युलर काढले. आता १ महिन्याची मुदत रेझोल्यूशन प्लान तयार करण्यासाठी दिली. पण एखाद्या कंपनीला NCLT मध्ये घेऊन जायचे किंवा नाही याचे स्वातंत्र्य कर्ज देणाऱ्या बँकांना दिले.

१८ जूनला टेलिकॉम कंपन्यांचे प्रमुख टेलिकॉम मंत्र्यांबरोबर चर्चा करतील. या चर्चेत लायसेन्स फी निम्मी करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

PVR ने चेन्नई येथे १० मल्टिस्क्रिन असलेला मल्टिप्लेक्स उघडला.

PNB त्यांचा PNB हौसिंगमधील स्टेक मार्च २०२० पर्यंत विकण्याची शक्यता आहे.

रिलायन्स पॉवरने Rs ३५०० कोटी लॉस दाखवला,लोन रिपेमेंट केले नाही. ऑडिटरने बऱ्याच त्रुटी दाखवल्या. रिलायन्स इंफ्राने आपले तिमाही निकाल पुढे ढकलले. या सर्वाचा परीणाम म्हणजे ADAG ग्रूपचे शेअर सपाटून पडले. त्याचबरोबर या ग्रूपला कर्ज देणाऱ्या बँकांचे शेअर्सही पडले.येस बँकेच्या नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमन अजयकुमारने राजीनामा दिला.

SBI ने त्यांची बँक हौसिंग लोनचे दर रेपोरेटशी संलग्न करील असे सांगितले. रेपो रेट ज्याप्रमाणे बदलेल त्याप्रमाणे हौसिंग लोनचे रेट बदलतील.

जम्मू आणि काश्मीर बँकेच्या चेअरमनला सरकारने बडतर्फ केले. अनियमित आणि नियमांना डावलून कर्ज दिली असा त्यांच्यावर आरोप आहे. म्हणून शेअर सपाटून पडला.

ग्लोबस स्पिरिटने मद्यार्काचे दर राजस्थानमध्ये Rs ३५ ने वाढवले.

दीपक नायट्रेट या कंपनीने Rs १४०० कोटी गुंतवणूक करून फिनाईल अक्ट्रॉनचा प्लांट लावला. ऍसेटोनचे भाव ४२% पडले. घरगुती फिनाईलही २५%पडले. या प्लॅन्टमधून कंपनीला २०२० ते २०२२ पर्यंत चांगला फायदा होईल असा अंदाज होता. पण आता असे घडणार नाही असे वाटल्यामुळे गेल्या आठवड्यापासून हा शेअर पडत आहे.

हिरो मोटोला BSVI चे प्रमाणपत्र मिळाले.

सिप्लाच्या कुरूकुंभ युनिटला USFDA ने केलेल्या ११मार्च ते २० मार्च २०१९ या दरम्यान केलेल्या तपासणीत क्लीन चीट मिळाली.

२० जून २०१९ रोजी GST कौन्सिलची मीटिंग आहे.

सरकार ५ जुलै २०१९ रोजी २०१९-२०२० साठी अंदाजपत्रक सादर करेल.

मोरॅटोरियम पिरियडमध्ये एस्क्रो अकौंटमधून Rs ८०० कोटी काढल्याबद्दल IL &FS ९ बँकांविरुद्ध CONTEMPT केस दाखल करणार आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९७८४ NSE निर्देशांक निफ्टी ११९२२ बँक निफ्टी ३१०३४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १० जून २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.