आजचं मार्केट – ११ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ११ जून २०१९

आज क्रूड US $ ६२.२१ प्रती बॅरल ते US $ ६२.७४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.३६ ते US $१=Rs ६९.४७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.८० तर VIX १४ .९३ होते.

आज चीनचे राष्ट्रप्रमुख जीन पिंग यांनी २८-२९ जून २०१९ रोजी होणाऱ्या G -२० देशांच्या मीटिंगला आले पाहिजे. जर तसे घडले नाही तर आम्ही चीनमधून आयात होणाऱ्या US $३०० बिलियन मालावर ताबडतोब ड्युटी बसवू असे USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला सांगितले. यावर चीनने आम्ही ट्रेड वॉर करू इच्छित नाही पण आम्ही ट्रेड वॉरला घाबरत नाही आम्हीही सडेतोड उत्तर देऊ असे चीनने सांगितले.

जूलै २०१९ च्या पहिल्या आठवड्यात ओपेकची बैठक आहे. ओपेक या क्रूड उत्पादन करणाऱ्या देशांच्या संघटनेने आपला क्रूड उत्पादनातील कपात जारी करण्याचा निर्णय पुढेही चालू राहील असे सांगितले. पण रशिया आणि USA मध्ये क्रूडचे उत्पादन आणि साठा वाढत आहे. त्यामुळे क्रूडमधील भाववाढीला त्यांचा पाठिंबा नाही.

सरकार GST अपेलेट ट्रायब्युनलचे गठन करणार आहे. पर्सनल केअर उत्पादनांवर GST मध्ये सवलत दिली जाईल असा अंदाज आहे.

सरकारने जाहीर केले कि स्टिल स्क्रॅप पॉलिसीची लवकरात लवकर घोषणा केली जाईल.

२०२४ पर्यंत प्रत्येक घरामध्ये पाईपच्या साहाय्याने पाणी देण्याची योजना सरकारने हाती घेतली आहे. यामुळे पाईप उत्पादक कंपन्यांचे शेअर्स वाढले. उदा :-अपोलो पाईप्स, फिनोलेक्स, महाराष्ट्र सीमलेस, ASTRAL पॉली.

DHFL ने आधार हौसिंग मधील आपला स्टेक विकला. त्याचे त्यांना Rs २००० कोटी मिळाले. स्टरलाईट टेकने तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले.

विकास शंकर आणि अभय यादव यांनी इंडिया बुल्स कंपनीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला असे व्यवस्थापनाने सांगितले. या कंपनीनं फंडची हेराफेरी केली आहे, प्रत्यक्ष लोन आहे त्यापेक्षा जास्त लोन असल्याची तक्रार केली. या दोघांनी हल्लीच विकास शंकरने २ तर अभय यादवने शेअर होल्डर बनण्यासाठी ४ शेअर्स खरेदी केले. कंपनीत एकाही पैशाची हेराफेरी झाली नाही असा खुलासा कंपनीच्या व्यवस्थापनाने केला.

सरकार लवकरच सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांचे मोठ्या प्रमाणावर मर्जर कऱण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, PNB, बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक या पाच बँका लीड करतील. बाकीच्या लहान सरकारी बँकांचे या ५ बँकांत मर्जर केले जाईल. PNB, बँक ऑफ महाराष्ट्र आणि अलाहाबाद बँक याचे मर्जर होण्याची शक्यता आहे. OBC ,आंध्र बँक आणि युनियन बँक यांचे बँक ऑफ इंडियामध्ये मर्जर केले जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९९५० NSE निर्देशांक निफ्टी ११९६५ बँक निफ्टी ३१२६५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.