आजचं मार्केट – १२ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १२ जून २०१९

आज क्रूड US $ ६०.६५ प्रति बॅरल ते US $६२.५२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.२७ ते US $१=Rs ६९.४४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.७१ होते.

निफ्टी ५० हा निर्देशांक मार्केट P /E च्या २९ पटीत चालू आहे. गेल्या दशकातील कमाल स्तरावर आहे. त्यामुळे मार्केट व्हॅल्युएशन जास्त आहे . मार्केट महाग झाले आहे. अंदाजपत्रक सादर होईपर्यंत मुख्य ट्रिगर नाही. जागतिक संकेतही चांगले नाहीत.त्यामुळे मार्केटमध्ये प्राईस करेक्शन चालू आहे. VIX २.५४% पडून १४.१२च्या पातळीला आला जोपर्यंत VIX १६च्या खाली आहे तोपर्यंत ‘बाय ऑन डिप्स’ हे धोरण ठेवा. IIP च्या आकड्यांमध्ये सुधारणा झाल्यामुळे उद्या मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.

आज १२ जून २०१९ रोजी निफ्टी फ्युचरची सुरुवात होऊन १९ वर्षे झाली. निफ्टी फ्युचरची स्थापना १२ जून २००० ला १४६१ वर झाली. त्यामुळे निफ्टी फ्युचर्स हॅपी बर्थडे !

गोव्याच्या मुख्यमंत्र्यानी सांगितले की कॅसिनोजची गोव्याला गरज आहे. कारण गोव्याची मदार पर्यटन उद्योगावर आहे. यामुळे डेल्टा कॉर्प आणि अडवानी हॉटेल्स यांना फायदा होईल.

रिलायन्स कॅपिटलचे ऑडिटर PWC यांनी राजीनामा दिला.

येस बँकेचे इंडिपेन्डन्ट डायरेक्टर मुकेश साबरवाल यांनी राजीनामा दिला. RBI ने येस बँकेला Rs ११.२५ लाख दंड लावला.
अडानी ग्रीनमधील आपला ५.९८% हिस्सा फ्लोअर प्राईस Rs ४३ प्रती शेअर OFS च्या माध्यमातून गौतम अडानी विकणार आहेत. या OFS मधून त्यांना Rs ४०२ कोटी मिळतील.

ड्रग आणि कॉस्मेटिक ऍक्टखाली E- सिगारेटच्या उत्पादनावर बंदी आणली जाईल. E-सिगारेटला ड्रगच्या कॅटेगरीखाली आणले जाईल. याचा अनुकूल परिणाम ITC आणि गॉडफ्रे फिलिप्स यांच्यावर होईल.

सोलर पॅनलसाठी ३०% सबसिडी जाहीर होणार आहे. याचा फायदा बोरोसिल, गुजरात बोरोसिल, स्नायडर इलेक्ट्रीक, सेंट गोबेन यांना होईल.

सध्याच्या ऍन्टीडम्पिंग ड्युटीचा परिणाम वाढविण्यासाठी ड्युटीचे स्ट्रक्चर बदलणार आहेत. JSW स्टील फुल कॅपॅसिटीवर चालू आहे पण JSPL ची स्पेअर कॅपॅसिटी आहे त्यांना फायदा होईल.

ITC Rs २०००० कोटी विस्तार योजनेसाठी खर्च करणार आहे.

आज बायोकॉनच्या बोनसची एक्स डेट होती. उद्या सिंजीनच्या बोनस इशूची एक्स डेट आहे.

F &O मार्केटमध्ये बायोकॉनचा लॉट ९०० शेअर्सचा होता तो आता १८०० शेअर्सचा होईल.

सेबीने जुलै २०१९ पासून F & O मार्केटमध्ये ट्रेड होणाऱ्या शेअर्सची लॉट साईझ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शेअर्सची किंमत कमी झाल्यापासून लॉटची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू कमी होत आहे त्यामुळे लॉटमधील शेअर्सची संख्या वाढवली.
HDFC लाईफमधला किंवा HDFC AMC मधील स्टेक विकण्याची कोणतीही योजना नाही असे HDFC ने जाहीर केले.HDFC ही ERGO चा स्टेक विकत घेणार आहे.

निरव मोदींची जमानतसाठीची याचिका चौथ्या वेळेला फेटाळली.

केमिकल उत्पादन करणाऱ्या शेअर्समध्ये आज चांगलीच मूव्ह होती. अंदाजपत्रकात या उद्योगाला काही सवलती जाहीर होतील असा अंदाज मार्केटला आला असावा. न्यू जेन केमिकल्स, थिरुमलाई केमिकल्स, नवीन फ्ल्युओरीन हे शेअर वाढले.
IIP मध्ये एप्रील २०१९ मध्ये चांगली सुधारणा झाली. -०.१% वरून ३.४% झाला. कॅपिटल गुड्स मायनिंग मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रामध्ये ग्रोथ झाली. आणि महागाई स्थिर राहिली. मे २०१९ साठी CPI ३.०५% ( एप्रिलमध्ये २.९२%) होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९७५६ NSE निर्देशांक निफ्टी ११९०६ बँक निफ्टी ३०९६५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.