आजचं मार्केट – १३ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १३ जून २०१९

आज क्रूड US $ ५९.८६ प्रती बॅरल ते US $ ६२.५६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.३४ ते US $१=Rs ६९.५२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.९४ वर होता.

आज VIX ३.२६% कमी होऊन १३.६६ झाला आणि दिवसभर १५ च्या खाली राहिला.

आज सुरुवातीला क्रूड पडत होते. त्याचा दर US $ ६० प्रती बॅरलपेक्षाही कमी झाला होता. क्रूडचे उत्पादन वाढले पण मागणी कमी झाली. USA मधील सर्व प्लांट ९३% कॅपॅसिटी वर काम करत आहे. पण दुपारच्या सुमारास बातमी आली की अबू धाबीकडे जाणाऱ्या एका ऑइल टँकरला ओमानजवळ समुद्रात आग लागली. ही बातमी येताच क्रूडचा दर थेट US $ ६२.५० प्रती बॅरेलच्या पुढे गेला. आज दुपारच्या सत्रात चांगलीच शॉर्टकव्हरिंग झाली आणि मार्केट तेजीत आले. हॅमर कँडलस्टिक पॅटर्न फॉर्म झाला. पण फॉलोअप खरेदी आवश्यक आहे. आणि सरासरीपेक्षा जास्त व्हॉल्युम हवे आहेत.

सरकारने आपली नववर्षाची डायव्हेस्टमेन्ट मोहीम SAIL या सरकारी कंपनीचे दुर्गापूर अलॉय स्टील प्लांट, तामिलनाडुतील सालेम स्टील प्लांट आणि भद्रावती येथील विस्वेश्वरैय्या आयर्न अँड स्टील प्लांट असे तीन तोट्यात चालणारे प्लांट विक्रीस काढून सुरु केली आहे. स्टील उद्योगात तेजी आहे त्यामुळे या तीन प्लांटची चांगली किंमत मिळेल आणि SAIL ला या तीन प्लान्टपासून होणारा तोटा बंद होईल असा सरकारचा अंदाज आहे.

वरुण बिव्हरेजीस या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची १७ जूनला बोनसवर विचार करण्यासाठी बैठक आहे.
नैसर्गिक गॅसच्या किमती कमी झाल्या आहेत. याचा फायदा टाईल्स कंपन्यांना होईल. उदा नीटको टाईल्स मुर्डेश्वर सिरॅमिक्स.

मँगलोर केमिक्लसचा एक प्लांट पाण्याच्या टंचाईमुळे बंद पडला होता. तो पुन्हा सुरु झाला.

२८ जून २०१९ पासून जेट एअरवेजचा शेअर T टू T ग्रुपमध्ये जाईल.

भारत नेट योजनेच्या दुसऱ्या फेजसाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकते. या मंजुरीनंतर या योजनेअंतर्गत आंध्र प्रदेश, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात काम सुरु होईल.

सी. जी. पॉवर आणि जैन इरिगेशन या कंपन्यांचे शेअर्स वायदेबाजारातून बाहेर जातील.

इंडिया बुल्स ग्रुपच्या कंपनीजविरुद्ध अभय यादवने सुप्रीम कोर्टात एक PIL दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी सुप्रीम कोर्टाने जूलै २०१९ मध्ये ठेवली होती. पण आज अभय यादवने आपली याचिका सुप्रीम कोर्टातून मागे घेतली. काल या ग्रुपच्या व्यवस्थापनाने आपले स्पष्टीकरण दिले होते आणि आपल्या ग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारची हेराफेरी झाली नाही असे सांगितले होते. या बातमीनंतर इंडिया बुल्स ग्रुप च्या शेअरमध्ये चांगली तेजी आली.

गोल्डी, निंबू, हीररांझा, घूमर हे ग्लोबल स्पिरिटचे ब्रँड आहेत. आंध्र प्रदेशात मद्यार्कबंदी आहे पण आंध्र प्रदेशात या कंपनीची विक्री कमी आहे. त्यामुळे या कंपनीवर जास्त परिणाम होणार नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९७४१ NSE निर्देशांक निफ्टी ११९१४ आनि बँक निफ्टी ३०९७६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.