आजचं मार्केट – १४ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १४ जून २०१९

आज क्रूड US $ ६०.८९ प्रती बॅरल ते US $ ६१.८० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=Rs ६९.५४ ते US $ १= Rs ६९.७५ या दरम्यान होते. US $ निर्देशङ्क ९६.९४ ते ९७.१४ या दरम्यान होता. VIX १२.६४ ते १४.१ या दरम्यान होते.
WPI मे २०१९ साठी २.४५% (एप्रिल ३.०६%) म्हणजे २२ महिन्यांच्या किमान स्तरावर होते.

USA नी आता आपल्या ट्रेड वॉरचा रोख भारताकडे वळवला. भारताकडून आयात होणाऱ्या मालावर आम्ही ड्युटी आकारू /वाढवू असे USA ने जाहीर केल्यावर भारताने USA मधून आयात होणाऱ्या २९ उत्पादनांवर आम्हीही ड्युटी लावू /वाढवू असे भारताने सांगितले. त्यामुळे मार्केट जोरदार पडले.

प्रकाश पाईप्स या कंपनीचे Rs ९० वर लिस्टिंग झाले

इन्फोसिसच्या शेअरच्या लिस्टिंगला २६ वर्षे पुरी झाली..

‘टोटल’ ही फ्रेंच कंपनी अडानी गॅसमध्ये ३०% स्टेक खरेदी करणार आहे. त्यामुळे ओपन ऑफर येईल.

रिट्स (RITES) या रेल्वेशी संबंधित असलेल्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक २४ जून २०१९ रोजी बोनसवर विचार करण्यासाठी होईल.

हेक्झावेअरनी मोबिक्विटी या कंपनीचे अधिग्रहण केले. ही कंपनी US $ १८.२ कोटींना विकत घेतली. यासाठी हेक्झावेअरने US $१३.१ कोटींचे अपफ्रंट पेमेंट केले.

HDFC गृह फायनान्समधील ४.२% स्टेक Rs २९० प्रती शेअर या भावाने विकेल.

ट्रेन्ट या टाटा ग्रुपच्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक राईट्स इशूवर विचार करण्यासाठी १८ जून २०१९ रोजी होईल.

चोलामंडलमचा शेअर आज एक्स स्प्लिट झाला

WOCKHARDT च्या औरंगाबाद प्लाण्टला USFDA कडून क्लीन चिट मिळाली.

युनियन बँक नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनमधील १० लाख शेअर्स विकेल.

इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग इंफ्रावर ५०% ते १००% सबसिडी मिळेल.

होलसेल फायनान्सचे रेट कमी झाल्यामुळे स्मॉल फायनान्स बँकांचा फायदा होईल.

सोन्याचा भाव Rs ३३००० झाला. त्यामुळे मन्नापुरम फायनान्स आणि मुथूट फायनान्स याचे शेअर वाढले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९४५२ NSE निर्देशांक निफ्टी ११८२३ बँक निफ्टी ३०६१४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.