आजचं मार्केट – १७ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १७ जून २०१९

आज क्रूड US $ ६१.७१ प्रती बॅरल ते US $ ६२.१२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ६९.७९ ते US $ १= Rs ६९.८५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५२ होता तर VIX १४ पेक्षा जास्त होते.

आज NSE निर्देशांकाने ५० DMA म्हणजेच ११६८० चा सपोर्ट तोडला आता नेक्स्ट सपोर्ट ११६५० चा आहे.

इराणने आपण १० दिवसांत युरेनियम करार रद्द करू असे जाहीर केले.

फेडची दोन दिवसांची बैठक १८ जून २०१९ पासून सुरु होईल. जरी या बैठकीत रेट कट करण्याचा निर्णय झाला नाही तरी जुलै २०१९ मध्ये रेट कट जाहीर केला जाईल असा अंदाज आहे.

USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले की आपण लवकरच आपली अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करू.

RBI ने असे जाहीर केले की महागाई काबूत ठेवून ग्रोथवर लक्ष केंद्रित केले जाईल. आर्थिक स्थिरतेला प्राधान्य दिले जाईल.NBFC साठी नवीन रेग्युलेटरी नियमांवर RBI मध्ये विचार मंथन चालू आहे.

दिल्ली राज्य सरकारने असे जाहीर केले की दिल्ली राज्य सरकार एक्सक्लुझिव्ह इलेक्ट्रिक व्हेहिकल झोन बनवेल. या झोन मध्ये उभारलेल्या चार्जिंग स्टेशन्सना राज्य सरकार मोफत वीज पुरवेल .

अकौंटिंग स्टॅण्डर्ड्समध्ये सुधारणा झाल्यामुळे ज्या कंपन्यांनी दीर्घ मुदतीची लीज ऍग्रीमेंट केली आहेत त्यांच्या बॅलन्स शीटवर परिणाम होईल. आतापर्यंत ह्या लीजवर केलेला खर्च कंपन्या इतर खर्च या सदरात दाखवत होत्या. या नियमानुसार आता या लीजवरील खर्चाचे तीन कॉस्टमध्ये विभाजन करून त्यांना P & L अकौंटमध्ये इफेक्ट द्यावा लागेल.यामुळे जरी एकंदर प्रॉफिटमध्ये फरक पडणार नसला तरी कॉस्टच्या विश्लेषणात फरक पडेल. याचा परिणाम मल्टिप्लेक्सेस, DEPT स्टोअर्स, FMCG कंपन्या, हॉटेल व्यवसायातील कंपन्या यांच्यावर परिणाम होईल. उदा PVR, इनॉक्स लिजर, फ्युचर रिटेल. ,

आज हवामान खात्याने जाहीर केले की १६ जून २०१९ पर्यंत ४३% पाऊस कमी झाला आहे. दक्षिण भारतामध्ये ५% प्रदेशात पाऊस पोहोचला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक,तेलंगाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांमध्ये नियमित पावसाळा सुरु झाला नाही. जुलै २०१९च्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण वाढेल. जुलै महिन्याचा उत्तरार्ध आणि ऑगस्ट २०१९ या महिन्यात ८०% पाऊस पडेल.

DCC (डिजिटल कम्युनिकेशन कमिशन) ने भारती एअरटेल आणि वोडाफोन आणि आयडिया या कंपन्यांवर २०१५ आणि २०१६ मध्ये Rs ३०५० कोटी दंड लावण्याच्या डॉट आणि ट्राय यांच्या निर्णयाची पुष्टी केली. पण DCC अजून एकदा याबद्द्ल TRAI चे मत लक्षात घेईल.

टाटा कम्युनिकेशनने Batelko बरोबर नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठीच्या कराराची मुदत वाढवली.

रिलायन्स इन्फ्राला चौथ्या तिमाहीत Rs ३३०१ कोटी तोटा झाला. त्यामुळे शेअर सपाटून पडला.

पिरामल एंटरप्रायझेसने श्री राम ट्रान्सपोर्ट या कंपनीतील आपला १०% स्टेक विकला. त्यामुळे दोन्हीही शेअर पडले.
चहाची MSP (मिनिमम सपोर्ट प्राईस) सरकार ठरवणार आहे.
.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८९६० NSE निर्देशांक निफ्टी ११६७२ बँक निफ्टी ३०२७३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – १७ जून २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.