आजचं मार्केट – २७ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २७ जून २०१९

आज क्रूड US $ ६५.९० प्रती बॅरल ते US $६६.४९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.०७ ते US $ १= Rs ६९.१५ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९६.२८ VIX १४.६४ वर होता. जपानमधील ओसाका येथे चालू असलेल्या G -२० च्या बैठकीत USA चे अध्यक्ष ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात उद्या बोलणी होतील. ट्रम्प यांनी आजच स्पष्ट केले की भारताने USA मधून आयात होणाऱ्या मालावरील ड्युटी वाढवली आहे हे आपल्याला पसंत नाही.

येत्या शनीवारी होणाऱ्या ट्रम्प आनि जीन पिंग यांच्यातील वाटाघाटींकडे अवघ्या जगाचे लक्ष असेल. चीन आणि USA यांच्यातील ट्रेड वरचे चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे परिणाम होत आहेत. अनिश्चितता वाढत आहे. हे जरी खरे असले तरी याच्यामुळे पेपर इंडस्ट्री, आणि केमिकल इंडस्ट्री यांना फायदा होत आहे. ज्यूट व्यवसायाला हि फायदा होत आहे. केमिकल इंडस्त्रीमध्ये ऍग्रो केमिकल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेवावे. उदा. आरती, PI , विनंती, SRF, GALAXY फाईन केमिकल्स. दीपक नायट्रेट

आज सेबीने वोटिंग राईट्स, म्युच्युअल फंडांची विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक, कॅश आणि लिक्विड असेटमधील गुंतवणुक, मल्टी नॅशनल कंपन्यांना त्यांच्या भारतीय युनिट्सकडून दिली जाणारी रॉयल्टी ५% पेक्षा जास्त द्यायची असेल तर शेअरहोल्डरची मंजुरी आवश्यक असेल. तसेच तारण म्हणून ठेवलेल्या शेअर्सच्या डिस्क्लोजर बाबतीत नवे नियम जाहीर केले. तारण म्हणून ठेवलेल्या शेअर्सच्या बाबतीत आता शेअर्स तारण ठेवण्याचे कारण डिस्क्लोज करावे लागेल. म्युच्युअल फंडांबरोबर कंपन्यांनी STANDSTILL अरेंजमेंट करणे टाळावे. शेअर बाय बॅकसाठी कंसोलीडेटेड बॅलन्स शीटचा डेट इक्विटी रेशियो लक्षात घेतले जाईल.

सरकारने PSU बँकांना MSME सेक्टरला दिलेल्या लोन्सची काळजी घ्यावी. तसेच MSME ला दिलेल्या किंवा मंजूर केलेल्या लोन विषयी साप्ताहिक रिपोर्ट द्यावा.

क्रूडचा भाव वाढू लागला की पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडींगचे प्रमाण वाढवण्यासाठी उत्तेजन दिले जाते. इथेनॉलचा दर वाढवला जातो. इथेनॉल उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न केले जातात. यामुळे साखर सेक्टर मधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँका ज्या PCA ( प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन) मध्ये आहेत त्यांना PCA मधून बाहेर पडण्यासाठी Rs ३५००० कोटी भांडवल पुरवेल. यात ज्या इतर बँकांनी भांडवलाची आपली गरज व्यक्त केली होती त्यांनाही भांडवल पुरवले जाईल. सरकारची अपेक्षा आहे की हे भांडवल पुरवल्यानंतर PSU बँक एलिजिबल व्यक्तींना कर्ज देतील. आणि कर्जाचा दुष्काळ संपेल. भांडवल मिळण्याच्या यादीत यूको बँक, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, अलाहाबाद बँक यांचा समावेश असेल.

आज निफ्टीने ११९०० ला स्पर्श करताच विक्री सुरु झाली. आज एक्स्पायरी असल्यामुळे विक्री अपेक्षित होती.

उद्या पहिल्या सहामाहीचा शेवटचा दिवस तर जुलै एक्स्पायरीचा पहिला दिवस असेल. १२ जुलै पासून इन्फोसिसच्या पहिल्या तिमाहींच्या निकालानंतर कॉर्पोरेट निकालांच्या सिझनचा शुभारंभ होईल. ओपेकची मीटिंग आहे. त्यात क्रूड उत्पादनात आणखी कपात होण्याची भीती आहे. जुलै ५ २०१९ ला केंद्र सरकार संसदेत अंदाजपत्रक सादर करेल. G -२० मधील वाटाघाटींचे फलितही कळेल. त्यामुळे पुढचा आठवडा मार्केटचा दृष्टीने महत्वाचा आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९५८६ NSE निर्देशांक निफ्टी ११८४१ बँक निफ्टी ३१२६९ वर वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.