आजचं मार्केट – २ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६४.८७ प्रती बॅरल ते US $ ६५.११ प्रती बॅरल आणि रुपया US $ १= Rs ६८.३३ ते US $१=Rs ६९.०४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.७१ होता. VIX १४.८३ होता.

ओपेक आणि त्यांचे मित्र रशिया यांनी क्रूडच्या उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयाची मुदत मार्च २०२० पर्यंत वाढवली.
USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी युरोपियन युनियनमध्ये उत्पादन होणाऱ्या गुड्सवर USA $ ४ बिलियनची टॅरिफ लावेल अशी धमकी दिली. USA चा EU बरोबर एअरक्राफ्टसबसिडीच्या बाबतीत वादविवाद चालू आहेत.

पावासाचे प्रमाण कमी असल्यामुळे ऊस लागवडीखालील एरिआ UP मध्ये २% ने तर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे १६% आणि २४% कमी होईल असा अंदाज आहे. २०१९-२० या वर्षात साखरेचे उत्पादन २८ मिलियन टन असेल असा अंदाज आहे.त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांचा फायदा होईल. कारण उत्पादन कमी झाल्यामुळे साखरेचे भाव वाढतील.

इंद्रप्रस्थ गॅस आणि महानगर गॅसचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट प्लेयर्सना वापरू द्यावे असे PNGRB चे सर्क्युलर सांगते. जर हि व्यवस्था अमलात आली तर IGL आणि MGL च्या शेअर्सवर विपरीत परिणाम होईल. आज ह्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या  व्हॉल्युमसह पडायला सुरुवात झाली.

ICRA या रेटिंग एजन्सीचे नरेश टक्कर यांना पुढील आदेश मिळेपर्यंत कामावर येऊ नका असे सांगितले. IL & FS ला दिलेल्या रेटिंगबाबत चौकशी चालू आहे.

ज्या कंपन्यांच्या प्रमोटर्सनी आपले बहुसंख्य शेअर्स तारण म्हणून ठेवले आहेत, किंवा ज्या कंपन्यांवर खूप प्रमाणात कर्जाचा बोजा आहे, त्याचप्रमाणे ज्या कंपन्यांच्या बाबतीत कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे इशू आहेत अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये सावधगिरी बाळगूनच ट्रेड किंवा गुंतवणूक करावी.

गुजरात ऊर्जा विकास निगम बरोबर झालेले पॉवर पर्चेसचे अग्रीमेंट रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यामुळे अडाणी पॉवरचा शेअर वाढला.

रॅलीजचा दहेज येथे जो प्लांट आहे त्याबाबतीत प्रदूषण कंट्रोल बोर्डाने एक्शन घेतली आहे. कंपनीला हा प्लांट बंद करायला सांगितला आहे.

येस बँकेने RADIUS डेव्हलपर्सना Rs १२०० कोटींचे कर्ज दिले आहे. या कर्जावरचे Rs ३० कोटींचे व्याज ४५ ते ६० दिवसांदरम्यान दिले नाही. या डेव्हलपर्सनी बँकिंग सिस्टिमकडून Rs ५५०० कोटींचे कर्ज घेतले आहे. यामुळे येस बँकेचा शेअर पडला.

स्वीलेक्ट एनर्जी या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची ८ जुलै २०१९ रोजी बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करण्यासाठी बैठक आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९८१६ NSE निर्देशांक निफ्टी ११९१० बँक निफ्टी ३१२८३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २ जुलै २०१९

  1. Nandratna

    Kontya comany madhe … Kay positive ani negative news ahet … Sagle kontya site war mahit padlte … Ki jene karun … Tya company baddal alert rahane bare padel

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.