आजचं मार्केट – ५ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ५ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६३.१८ प्रती बॅरल ते US $ ६३.३७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs. ६८.४७ ते US $१=Rs ६८.६० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.५२ आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी FY २०१९-२०२० साठी अंदाजपत्रक सादर केले.

अफोर्डेबल हौसिंग (किंमत Rs ४५ लाख किंवा त्यापेक्षा कमी) साठी घेतलेल्या कर्जावरील व्याजासाठी जादाची Rs १.५ लाख आयकरामध्ये सवलत दिली जाईल. एकूण व्याजात Rs ३.५ लाख व्याजावर आयकरामध्ये सूट दिली जाईल. नियमित हौसिंग लोन साठी Rs २.०० लाखाची सूट दिली जाते.

सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये सरकार Rs ७०००० कोटी भांडवल घालेल. या भांडवलाचा उपयोग या बँका क्रेडिट एक्स्पान्शनसाठी करतील अशी आशा आहे. RBI ने अशी घोषणा केली की ऑगस्ट आणि डिसेंबर २०१९ मध्ये Rs १.३४ लाख कोटी लिक्विडीटी प्रोव्हाईड करेल. PSU बँका ही लिक्विडीटी हौसिंग फायनान्स कंपनीकडून त्यांचे ऍसेट खरेदी करतील.

MSME ला Rs १ कोटी लोन आणि २% व्याजामध्ये सबव्हेन्शन दिले जाईल. या इंटरेस्ट सबव्हेन्शन साठी Rs ३५००० कोटींची तरतूद केली आहे.

कंपन्यांमधील किमान पब्लिक होल्डिंगची मर्यादा २५% वरून ३५% पर्यंत वाढवली जाईल.

इन्शुअरन्स इंटरमिडीअरीजमध्ये १००% FDI ला परवानगी दिली जाईल. तसेच ऍनिमेशन आणि मेडिया सेक्टरमध्ये FDI चे प्रमाण वाढवले जाईल. NRI ना FPI कॅटेगरीमध्ये टाकले जाईल आणि FPI साठी KYC चे नियम सोपे केले जातील.

सर्व घरांना वीज दिली जाईल. सर्व लोकांना २०२२ पर्यंत घरे दिली जातील. १.९५ कोटी घरे बनवली जातील. PSU च्या मालकीच्या जमिनीवर अफोर्डेबल हौसिंग प्रोजेक्ट बनवली जातील. अर्थमंत्र्यानी ‘नारी ते नारायणी” हा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमांतर्गत कुटुंबातील एका महिलेला मुद्रा योजनेखाली Rs १ लाख लोन दिले जाईल.

आता PSU मध्ये सरकारी स्टेक ५१% वर आणला जाईल. विनिवेश लक्ष्य १.०५लाख कोटी निर्धारित केले आहे.
ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजात Rs २.५ लाख सबसिडी मिळेल.

जलशक्ती मंत्रालय हे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात येईल आणि पाण्याशी संबंधित सर्व समस्यांचे निवारण करण्याची जबाबदारी या मंत्रालयाची असेल. २०२४ पर्यंत सर्व घरात पाइपमधून पिण्याचे पाणी पोहोचवले जाईल.

हौसिंग फायनान्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आता RBI कडे सोपवण्यात आली आहे.

रेल्वे स्टेशनांचे आधुनिकरण केले जाईल. रस्ते बांधणीवर तसेच जलमार्ग विकसित करण्यावर भर दिला जाईल.
सोने आणि चांदी यांच्यावरील कस्टम्स ड्युटी १२.५% केली.

सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर Rs १ प्रती लिटर एकसाईझ ड्युटी आणि Rs १प्रती लिटर इन्फ्रा सेस लावला. क्रूड ऑइलवर Rs १प्रती टन इम्पोर्ट ड्युटी लावली.

१७ पर्यटन स्थळे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार डेव्हलप केली जातील.

सरकारने फिस्कल डेफिसिटचे लक्ष ३.३% ठेवले आहे. सरकारने कर्मयोगी स्कीमखाली ३ कोटी किरकोळ व्यापारी आणि दुकानदार यांना पेन्शन दिली जाईल असे जाहीर केले.

जास्त उत्पन्न ( Rs १ कोटींच्यावर ) असणाऱ्यांसाठी सरकारने आयकराच्या एकूण दरात वाढ केली.

या अंदाजपत्रकात प्रत्यक्ष करांमध्ये जास्त सवलती दिल्या गेल्या नाहीत. सरकार आता रेड़ीमेड पार्टली भरलेला आयकर रिटर्न तुम्हाला पाठवेल. जर तुम्हाला तो बरोबर आहे असे वाटले तर तेवढा आयकर तुम्ही भरायचा. तसेच आता तुम्हाला आयकर ऑफिसमध्ये चकरा माराव्या लागणार नाहीत. हे काम संगणकाद्वारे केले जाईल.

जालन कमिटीचा फायनल रिपोर्ट १७ जुलैला अपेक्षित आहे. या रेपोर्टवरून सरकारला RBI कडून किती डिव्हिडंड मिळेल हे कळेल.

शेतीमध्ये आता खाजगी गुंतवणुकीसाठी परवानगी दिली जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९५१३ NSE निर्देशांक निफ्टी ११८११ बँक निफ्टी ३१४७५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – ५ जुलै २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.