आजचं मार्केट – ८ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ८ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६४.१५ प्रती बॅरल ते US $६४.५९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.५७ ते US $ १=Rs ६८.७४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.१७ तर VIX १३.७१ होता.

USA मध्ये जॉब डेटा चांगला आला. US $ची किंमत इतर करंन्सीजच्या तुलनेत वाढली. त्यामुळे इमर्जिंग मार्केटच्या करंन्सीजचे अवमूल्यन झाले. जगातील सर्व मार्केट्स आज मंदीत होती. इराणवर युरेनियम एनरिचमेण्टसाठी घातलेली मर्यादा ओलांडून इराण युरेनियमचे उत्पादन वाढवेल. यामुळे इराण अणुबाँब बनवण्यासाठी सक्षम होईल.

इलेक्ट्रिकल व्हेइकलचे स्पेअर पार्ट्स आयात करण्यासाठी इम्पोर्ट ड्युटी भरावी लागणार नाही. त्यामुळे पुष्कळ इलेक्ट्रिक वाहने तयार होतील. पेट्रोल आणि डिझेलवर चालणार्या वाहनांना मागणी येणार नाही. मारुतीने जून २०१९ मध्ये आपले उत्पादन १५.६% ने घटवले. BS VI ची समस्याच आहेच. मागणी कमी आणि पुरवठा जास्त अशी स्थिती आहे. यामुळे ऑटो क्षेत्रातील शेअर्स पडले. वाहनांनाच मागणी नाही म्हणून स्पेअर पार्ट्स आणि ऍक्सेसरीजचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स पडले.

PNB च्या अडचणी काही संपत नाहीत. PNB चा स्टाफ आणि भूषण स्टील या कंपनीचे अधिकारी यानी संगनमताने Rs ३८०५ कोटींचा फ्रॉड केला. यामुळे गेले काही दिवस सावरत असलेला PNB चा शेअर कोसळला. त्याबरोबर बँकिंग क्षेत्रामधील शेअर्स पडले.

किमान पब्लिक शेअरहोल्डिंगची लिमिट २५% वरून ३५% केली जाईल. याचे काही फायदे तर काही तोटे आहेत. MSCI, FTSE इंडेक्समध्ये भारताचे वेटेज वाढेल. MCX IEX आणि इतर सरकारी कंपन्यांना फायदा होईल१२०० कंपन्यांना प्रमोटर शेअर होल्डिंग कमी करावे लागेल. यामुळे मार्केटमध्ये विक्रीसाठी शेअर्सचा ओघ चालू राहील आणि शेअर्सचे भाव पडतील असे वाटल्यामुळे आज ट्रेडर्सनी प्रॉफिट बुकिंग केले. फ्लोटिंग स्टॉक कमी असला की योग्य पद्धतीने प्राईस डिस्कव्हरी होत नाही. ५० P/E( प्राईस अर्निंग रेशियो) वर काही कंपन्यांच्या शेअरचे भाव आहेत. मायनॉरीटी शेअर होल्डर्सची कायम तक्रार असते की त्यांच्यावर बहुमताच्या जोरावर अन्याय होतो. त्यामुळे ह्या तक्रारीची तीव्रता कमी होईल. सेबी प्रमोटर्सचे शेअरहोल्डिंग १०% ने कमी करण्यासाठी वेळ देईल. पण ही तलवार बर्याच काळपर्यंत लटकत राहील. MNC कंपन्यांच्या बाबतीत स्थिती विचित्र आहे. या कंपन्यांना फ्लोटिंग स्टॉक वाढवण्यात स्वारस्य नसते. या कंपन्या भारतातून डीलीस्ट होण्याचा विचार करतील.

अंदाजपत्रकात वार्षिक Rs २ कोटी ते Rs ५ कोटी उत्पन्न असणाऱ्या करदात्यांवर जादा सेस बसवला. हा वाढीव सेस आपल्याला भरायला लागू नये म्हणून FPI आणि FII नी आज मार्केटमध्ये जोरदार विक्री केली.त्यामुळे मार्केट सुरवातीपासून पडायला सुरुवात झाली आणि नंतरही पडतच राहिले. सरकारने असे जाहीर केले केले की आम्ही या वाढीव सेसची योग्य ती समीक्षा करू. पण याचा मार्केटवर फारसा परिणाम झाला नाही.

या पडझडीत काही शेअरमध्ये मात्र तेजी होती. उदा. ज्युबिलण्ट फूड्स, शीला फोम्स, D मार्ट, टी सी एस, सिम्फनी, सुप्रीम इंडस्ट्रीज. सोन्यावर इम्पोर्ट ड्युटी वाढवली. याचा फायदा मन्नापुरम फायनान्स आणि मुथूट फायनान्स यांना होईल.
येत्या दोन आठवड्यात देशात सर्वत्र चांगला पाऊस पडेल. त्यामुळे जूनमध्ये कमी पडलेल्या पावसाची कमतरता भरून निघेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला. तरीही मार्केट पडतच राहिले.

यावर्षीच्या अंदाजपत्रकात कंपन्या करत असलेल्या शेअर बाय बॅक वर २०% टॅक्स लावला. डिव्हिडंडवर डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स भरायला लागू नये म्हणून कंपन्यांनी शेअरहोल्डर्सना फायदा होण्यासाठी शेअर बाय बॅक सुरु केले होते. शेअर बाय बॅक ‘टेंडर’ किंवा ओपनमार्केट या कोणत्याही मार्गाने केले तरी हा टॅक्स कंपन्यांना भरावा लागेल. या कराचा फटका इन्फोसिसला बसण्याची शक्यता आहि. कारण त्यांचा ओपनमार्केट मार्गाने शेअर बाय बॅक चालू आहे. पण हा शेअर बायबॅक अंदाजपत्रक सादर होण्याच्या आधी सुरु झाला असल्याने जर या बायबॅकला सवलत मिळाली तर बाय बॅक ओव्हरसब्सक्राइब होईल. अंदाजपत्रक दीर्घ काळासाठी चांगले असले तरी अल्प मुदतीसाठी थोडे कष्टप्रद आहे.

२४ जून ते ५जुलै २०१९ या दरम्यान बायोकॉनच्या मलेशिया मधील युनिटची तपासणी झाली होती. त्यात १२ त्रुटी दाखवल्या गेल्या. या युनिटमध्ये ३ प्लान्ट आहेत. ग्लेनमार्क फार्माच्या अंकलेश्वर प्लान्टमधील API फॅसिलिटीजची तपासणी USFDA ने केली. त्यांनी कोणतीही त्रुटी दाखवली नाही.

मंगळवार ९ जुलै २०१९ रोजी टी सी एस चा तर शुक्रवारी १२ जुलै २०१९ रोजी इन्फोसिस आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल. IT क्षेत्रातील कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल पगारवाढ, व्हिसावरील खर्च यामुळे थोडे कमी असतात.
आज गोवा कार्बन या कंपनीचा पहिल्या तिमाहीचा निकाल लागला. कंपनी फायद्यातून तोट्यात गेली. कंपनीला Rs ५ कोटी तोटा झाला. उत्पन्न वाढले असले तरी EEBITDA खूपच कमी झाला.

बजाज ग्रुपच्या काहि कंपन्यांनी असा इशारा दिला की त्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल काहीसे कमी असतील. त्यामुळे बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व हे शेअर्स पडले. या कंपन्यांमधील FPI इन्व्हेस्टमेंट कमी झाली.

कर्नाटक राज्यात ज्या राजकीय हालचाली चालू आहेत त्यामुळे BF इन्व्हेस्टमेंट, आणी BF युटिलिटीज हे शेअर्स वरच्या सर्किटवर होते.

सरकार न्यू इंडिया, GIC यांच्यातील १०% आणि कोल इंडिया यांच्यातील ५% स्टेक कमी करणार आहे. सरकारने असे जाहीर केले की काही PSU मधील स्टेक सरकार ४०% पर्यंत कमी करेल.

येस बँकेच्या व्यवस्थापनाने सांगितले की बँकेची आर्थीक स्थिती चांगली असून कोणीही राजीनामा दिलेला नाही. उलटपक्षी २ नवीन डायरेक्टर्सची नेमणूक करत आहोत. त्यामुळे एवढ्या पडझडीतही येस बँकेचा शेअर स्थिर राहिला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८७२० NSE निर्देशांक निफ्टी ११५५८ बँक निफ्टी ३०६०३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.