आजचं मार्केट – ९ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ९ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६४.०७ प्रती बॅरल ते US $ ६४.१२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.६५ ते US $१=Rs ६८.७७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.३७ तर VIX १४.२२ होते.

पुट /कॉल रेशियो १ च्या खाली आला. दोन दिवस मार्केट पडतच होते. त्यामुळे ट्रेडर्स थोडे शॉर्ट्स कव्हर करत होते त्यामुळे मार्केट थोडे तेजीत थोडे मंदीत होते. दिवसभर वोलतालीटी खूप होती.

ABB ला त्यांचा सोलर इन्व्हर्टर व्यवसाय FIMER या इटालियन कंपनीला विकण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी मिळाली.

पहिल्या तिमाहीच्या अर्निंगविषयी प्रॉफिट वॉर्निंग टायटनच्या व्यवस्थापनाने दिल्यामुळे टायटनचा शेअर पडला. सोन्याचा भाव वाढणे हे टायटनच्या दृष्टीने चांगले आहे. दागिन्यांसाठी मागणी कमी होत असल्याने म्हणजेच गरज नसताना जी खरेदी होते ती काही काळासाठी पुढे ढकलली जात आहे.

पाऊस सध्या जोरात सुरु आहे पण अजूनही सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे दुष्काळाच्या भीतीने उसाची लागवड कमी होईल. साखरेचा जो साठा असेल तो हळूहळू कमी होईल. भारतात साखरेचा खप आणि उत्पादन दोन्हीही जास्त आहे. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये ट्रेडिंगच्या चांगल्या संधी मिळतील.

काल बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व हे शेअर पडले होते. पण आज व्यवस्थापनाने सांगितले की काल दिलेला व्ह्यू संपूर्ण उद्योगाच्या संबंधात होता. बजाजची पोझिशन साऊंड आणि स्टेबल आहे. या व्यवस्थापनाच्या स्पष्टीकरणानंतर दोन्ही शेअर्स पुन्हा तेजीत आले. निफ्टी CPSE ETF मधून REC बाहेर पडणार या बातमीने शेअर पडला.

टी सी एस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीनी आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. प्रॉफिट Rs ८१३१ कोटी (अनुमान Rs ७८२० कोटी) वाढले. उत्पन्न Rs ३८१७२ कोटी (अनुमान Rs ३८५०६ कोटी) कमी झाले. EBIT Rs ९२२० कोटी (अनुमान Rs ९३०५ कोटी) कमी झाले. EBIT मार्जिन २४.१% होते. ऑपरेटिंग मार्जिन २४.२% होते. US $ रेव्हेन्यू ५४८.५ कोटी होता. अन्य उत्पन्न Rs १६७५ कोटी होते. कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ १०.६% आहे. ऍट्रिशन रेट ११.५ आहे आहे. कंपनीने Rs ५ प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. अर्निंग प्रती शेअर Rs २१.६७ आहे.

उद्या फेड मीटिंगची मिनिट्स येतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८७३० NSE निर्देशांक निफ्टी ११५५५ बँक निफ्टी ३०५६९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.