आजचं मार्केट – १० जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १० जुलै २०१९

आज क्रूड US $ ६४.७७ प्रती बॅरल ते US $ ६५.४४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.४५ ते US $१=Rs ६८.५८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५० आणि VIX १४.६० होते.

आज मे २०१७ नंतर प्रथमच निफ्टी ११५०० च्या खाली बंद झाला. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी मार्केटमध्ये जी गॅप तयार झाली होती ती गॅप पूर्णपणे भरल्याशिवाय मार्केट तेजीत येणार नाही.

USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी आज पुन्हा सांगितले की भारत USA च्या उत्पादनांवर फार पूर्वीपासून ड्युटी आकारात आहे पण आता हे मान्य होण्यासारखी नाही. USA मध्ये क्रूडचा साठा कमी झाला आहे. USA आणि इराणमधील ताणतणाव वाढतच आहे. शॉर्ट टर्ममध्ये क्रूडच्या भावात वाढ होऊ शकते. पण वर्षाच्या उत्तरार्धात मात्र क्रूडचे दर कमी होतील असा तज्ञांचा अंदाज आहे. USA मध्ये फेड रेट कट करील असा अंदाज आहे.

गार्टनर ने IT वरील खर्च १.१% वरून ०.६% पर्यंत कमी होतील असा अंदाज वर्तवला आहे.याची कारणे म्हणजे ब्रेक्झिट तसेच USA आणि चीन मधील ट्रेड वॉर तसेच इराण आणी USA यांच्यातील तणाव ही असतील. त्यामुळे IT क्षेत्रातील कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम होईल.

आज CBDT ने सांगितले की FPI आणी AIFS यांनी व्यक्ती आणि ट्रस्टऐवजी कॉर्पोरेट स्ट्रक्चरचा अवलंब केला तर त्यांना HNI वरील जादा सेस द्यावा लागणार नाही. यामुळे आता वाढवलेल्या सेसमधून FPI ना काही सवलत मिळेल अशी शक्यता मावळली.

यावर्षी वरूण राजाने जुलै महिन्यात तरी देशात सर्वत्र पुरेसा वर्षाव केला. UP,बिहार, उत्तराखंड, आसाम, सिक्कीम, मेघालय या राज्यात जोराचा पाऊस पडत आहे.

इंडिगोच्या गंगवाल आणि भाटिया या दोन प्रमुख प्रमोटर्समधील वाद आता सेबी, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय, आणि अर्थ मंत्रालय यांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. गंगवाल यांनी भाटिया यांनी केलेल्या काही रिलेटेड पार्टी व्यवहारांची कडक तपासणी होणे जरुरीचे आहे असे सेबी आणि इतर मंत्रालयांना लिहिलेल्या पत्रात कळवले आहे. हा कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा इशू होण्याची शक्यता असल्यामुळे इंडिगोचा शेअर सडकून पडला.पण इंडिगोच्या व्यवस्थापनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना असे कळवले की प्रमोटर्समधील वादाचा कंपनीच्या बिझिनेसवर काही परिणाम होणार नाही.

PM ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला आज मंजुरी मिळाली. या योजनेअंतर्गत येत्या पांच वर्षात Rs ८०२५० कोटी खर्च करून १.२५ लाख किलोमीटर्स लांबीचे रस्ते बनवण्यात येतील.

टाटा मोटर्सची JLR ची विक्री युरोप आणि चीनमध्ये कमी झाली.त्यामुळे टाटा मोटर्सचा शेअर पडला.

REC ला कर्जाद्वारे Rs ७५००० कोटी उभारायला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने मंजुरी दिली.

ओरिएंटल हॉटेल्स या कंपनीच्या प्रमोटर्सनी २६ जून २०१९ रोजी २.५% शेअर्स तारण म्हणून ठेवले.

शुक्रवार १२ जुलै २०१९ रोजीने इन्फोसिसचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८५५७ NSE निर्देशांक निफ्टी ११४९८ बँक निफ्टी ३०५२२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.