आजचं मार्केट – ११ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ११ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६६.५९ प्रती बॅरल ते US $ ६७.४७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.३० ते US $१=Rs ६८.४३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.८९ तर VIX १३.२५ होता.

अंदाजपत्रक सादर झालेल्या दिवसापासून मार्केटमध्ये आलेल्या मंदीने आज थोडी माघार घेतली. USA च्या फेडरल रिझर्व्हचे चेअरमन पॉवेल यांनी – “USA ची अर्थव्यवस्था अजूनही दडपणाखाली आहे. योग्यवेळी योग्य ती उपाययोजना करण्यास सेंट्रल बँक तयार आहे .गरज पडल्यास अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी रेट कटही केला जाईल.” असे सांगितले यामुळे विदेशी मार्केट तेजीत होती. रुपया वधारला. पण क्रूडच्या दरात वाढ झाली. १० वर्षांचे बॉण्ड यिल्ड कमी झाले. अजूनही मार्केट महाग आहे. पहिल्या तिमाहीचे निकाल कमकुवत येण्याची शक्यता आहे.

चीनचे मार्केट भारतापेक्षा स्वस्त फायदा मिळवून देणारे वाटते आहे. FII आणि FPI ची विक्री आणि DII ची खरेदी सुरु आहे. त्यात आज निफ्टी आणि बँक निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी होती.दिवसभर निफ्टी ११५०० च्या वर राहिला. पण ११६००ची पातळी ओलांडली नाही. निफ्टी वर गेला की विक्रीचा दबाव येत होता हे जाणवले. म्हणजेच एकंदरीत काय सर्व सावळा गोंधळच होता.

DHFL ची लेंडर्सबरोबर बैठक होती. या बैठकीत काय निर्णय होतो आहे याकडे सर्वांचे लक्ष होते. DHFL कोणती योजना सादर करते ह्याकडे सर्वांचे लक्ष होते. पण फारसे काही निष्पन्न झाले नाही. लेंडर्सनी एका आठवड्याचा वेळ DHFL ला दिला.
करन्सी मार्केट आता रात्री ९ वाजेपर्यंत ओपन राहील. याचा फायदा BSE ला होईल.

डोणीमलाई माईन्स केसच्या संबंधातील NMDC ची याचिका कोर्टाने मंजूर केली.

जुलै १२ २०१९ रोजी इंडस इंड बँक आणि इन्फोसिस आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर
करतील.

DHFL आणि D-मार्ट आपले निकाल १३ जुलै २०१९ रोजी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८८२३ NSE निर्देशांक निफ्टी ११५८२ बँक निफ्टी ३०७१६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.