आजचं मार्केट – १५ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १५ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६६.५१ प्रती बॅरल ते US $ ६६.९८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.५० ते US $१=Rs ६८.५९ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९६.९५ होता. VIX १२.०२ होता. ही VIX ची लेव्हल नजीकच्या भविष्यकाळात कन्सॉलिडेशन होईल असे दर्शवते.

DHFL चे पहिल्या तिमाहीचे निकाल निराशाजनक होते. DHFL च्या व्यवस्थापनाने सांगितले की जर लवकर रेझोल्यूशन प्लॅन अमलात आला नाही तर कंपनी चालवणे अशक्य होईल. २५ जुलै २०१९ पर्यंत कंपनीला रेझोल्यूशन प्लान तयार करायचा आहे. हा रेझोल्यूशन प्लॅन २५ सप्टेंबर २०१९ पर्यंत इम्प्लिमेंट होणे आवश्यक आहे. या दोन्ही तारखा आता जवळ येत असल्यामुळे DHFL चा शेअर १० वर्षांच्या किमान स्तरावर होता

जून २०१९ मध्ये WPI ( होलसेल प्राईस इंडेक्स) २.०२% ( मे २०१९ साठी २.४५ % ) होता. फुड इन्फ्लेशन ५.०४% , भाज्यांचे इन्फ्लेशन ३३.१५% वरून २४.७६% झाले.

सरकार आता स्क्रॅप प्लांटसाठी विशेष योजना जाहीर करणार आहे. या स्क्रॅप प्लांटसाठी ५ वर्षे प्रत्यक्ष करातून सवलत मिळेल तर GST मध्ये सवलत देण्यात येईल. या प्लांटसाठी SEZ तयार करून या प्लांट्सना विशेष उद्योगाचा दर्जा दिला जाईल. प्रायोरिटी उद्योग असे वर्गीकरण केल्यामुळे बँकांकडून या प्लांट्सना सवलतीच्या दरात कर्ज मिळतील.

सरकार एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया व्यवस्थापन करत असलेले १३० विमानतळ टप्प्या टप्प्याने लीजवर देण्याच्या विचारात आहे. यात प्रॉफिटवर चालणारे आणि लॉसमधे असणारे असा भेदभाव केला जाणार नाही.

बजाज कंझ्युमरचा पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला आला. प्रॉफिट, उत्पन्न वाढले पण ऑपरेटिंग मार्जिन थोडे कमी झाले.

येस बँकेमध्ये एक USA PE फर्मचे कन्सॉरशियम US $ ८५० मिलियन एवढा स्टेक घेणार आहे या बातमीमुळे YES बँकेचा शेअर वाढला. या कन्सॉरशियाममध्ये दोन USA मधील PE फर्म आणि दोन स्थानिक PE फर्म आहेत.

कर्नाटक बँकेचा पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. NII Rs ४९४ कोटी, PAT Rs १७५ कोटी, GROSS NPA ४.५५% तर NIM मात्र कमी होऊन २.८१% राहिले.

सरकारने अपेक्षेपेक्षा कॅपिटल गुड्स इंडस्ट्रीज वरील खर्च कमी केला /पुढे ढकलला. त्यामुळे कॅपिटलगुड्स कंपन्यांना मिळणाऱ्या ऑर्डर्स कमी झाल्या किंवा लांबणीवर पडल्या. याचा परिणाम सीमेन्स. L &T या कॅपिटल गुड्स कंपन्यांवर झाला. त्यांचे शेअर्स पडले.

इंडोको रेमेडीज या कंपनीच्या गोवा युनिटला वार्निंग लेटर दिले. त्यामुळे इंडोको रेमेडीजचा शेअर पडला.

अलाहाबाद बँकेत झालेल्या सुमारे Rs १८०० कोटींचा आणि भूषण स्टील आणि पॉवर संबंधित फ्रॉडमुळे अलाहाबाद बँकेचा शेअर पडला.

टुरिझम फायनान्स या कंपनीच्या प्रमोटर्सने २.८१% शेअर्स तारण म्हणून ठेवले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८८९६ NSE निर्देशांक निफ्टी ११५८८ तर बँक निफ्टी ३०४४५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.