आजचं मार्केट – १६ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १६ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६६.६१ प्रती बॅरल ते US $ ६६.७० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.५३ ते US $१=Rs ६८.६६ होते. US $ निर्देशांक ९६.९८ होता तर VIX १२.०२ होते.

११६५० चा महत्वाचा रेझिस्टन्स निफ्टीने पार केला. पण ऍडव्हान्स डिक्लाईन रेशियो प्रतिकूल होता. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त होती. ही चिंतेची बाब होती.FII च्या विक्रीचे प्रमाण कमी झाले आहे. काही मोजक्या शेअर्समध्ये डिलिव्हरी बेस्ड खरेदी दिसत आहे जर पहिल्या तिमाहीचे निकाल खराब आले नाहीत तर मार्केट ११८०० चा टापा गाठेल असे वाटते.

भारताचा व्यापार घाटा कमी झाला. भारत शुगर एक्स्पोर्ट सबसिडी सुरु ठेवेल. ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया यांनी WTO (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) कडे तक्रार केली आहे. पण या तक्रारींना भारताने दाद दिली नाही.

कॉटनच्या किमती जगभरात कमी होत आहेत. पण भारतात मात्र MSP वर कॉटन खरेदी करावे लागते. त्यामुळे टेक्सटाईल कंपन्यांना तोटा होत आहे.

जेट एअरवेजच्या क्रेडिटर्सची आज बैठक आहे.

बासमती तांदुळाच्या किमती कमी झाल्या आहेत. जास्त एकरात तांदुळाचे पीक घेतले जाईल. तांदूळ पिकतो तेथे चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे तांदुळवाल्या कंपन्यांना वाईट दिवस आले. त्यातच USA ने इराणवर लावलेल्या निर्बंधांमुळे तांदुळाची निर्यात कमी झाली.

NPA संबंधात सरकारनी कंबर कसलेली आहे. वेळेवर NPA रेकग्नाईझ केले नाहीत म्हणून दंड लावण्यास सुरुवात केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया वर Rs ७ कोटी दंड लावला आहे.

सरकार NBCC, HUDCO, कोल इंडिया, NLC आदी CPSE मध्ये OFS च्या माध्यमातून डायव्हेस्टमेन्ट करण्याची शक्यता आहे.

ब्रिगेड एंटरप्रायझेसने २ शेअर्सवर एक शेअर बोनस दिला. प्रमोटरशिवाय बिझिनेस कोणालाही चांगला समजत नाही. ब्रिगेडचे प्रमोटर्स बिझिनेसमधील आपला स्टेक वाढवावयास तयार आहेत.

HDFC बँक २० जुलै २०१९ रोजी विशेष लाभांश जाहीर करण्याची शक्यता आहे.

ज्युबिलंट लाइफने व्हिटामिन B ३ च्या किमती वाढवल्या. ही कंपनी जगात विटामीनच्या क्षेत्रात अग्रेसर आहे.

अपोलो हॉस्पिटलच्या प्रमोटर्सनी आज पुन्हा ४% शेअर्स तारण ठेवले.

करन्सी मजबूत झाली क्रूड थोडे कमी झाले ही गोष्ट BPCL, HPCL, IOC या ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या दृष्टीने चांगली आहे.

HDFC AMC, फेडरल बँक, यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले होते.

मॉर्गन स्टॅन्लेने सन फार्माला डबल अपग्रेड करून ओव्हरवेट रेटिंग दिल्यामुळे गेले तीनचार दिवस सन फार्मा वाढतो आहे. सन फार्मा आपल्या हायेस्ट प्राईसपासून ७०% पडला आहे. पण आता बिझिनेसमधील वाढ आणि कॉस्ट यांचा चांगला मेळ बसत असल्यामुळे कंपनीचा शेअर वाढत आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९१३१ NSE निर्देशांक निफ्टी ११६६१ बँक निफ्टी ३०५७६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १६ जुलै २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.