आजचं मार्केट – १७ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १७ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६४.५२ प्रती बॅरल ते US $ ६४.८९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.७३ ते US $ १= Rs ६८.८४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.०१ होते. VIX ११.२० होते. आज बॉण्ड यिल्डस कमी झाल्यामुळे बँकिंग शेअर्समध्ये तेजी होती.

USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा एकदा US $ ३२५ अब्ज किमतीच्या चिनी मालावर USA आणखी ड्युटी लावणार आहे असे सांगितले. इराणबरोबर थेट वाटाघाटी करायला ट्रम्प तयार आहेत. जर इराण आणि USA यांच्यातील द्विपक्षीय वाटाघाटी जर सौजन्यपूर्ण झाल्या तर भारताला फायदा होईल. क्रूडनेही माघार घेतली. सकाळी क्रूड US $ ६४.५५ प्रती बॅरल होते.

RBI कडे असलेल्या सरप्लसची व्यवस्था काय करायची यासाठी नेमलेल्या बिमल जालान समितीने आज आपला रिपोर्ट तयार केला. यात RBI कडील सरप्लस सरकारला ३ ते ५ वर्षात हप्त्या हप्त्याने सुपूर्द करावे अशी शिफारस करण्यात आली आहे.
USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉरमुळे USA मधून भारतातील कच्या रबराला मागणी येत आहे. याचा फायदा हॅरिसन मलायलमला होईल.

पुढील तीन महिने मेटल क्षेत्रासाठी चांगले असतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ग्लोबल रिपोर्टप्रमाणे जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वेहिकल्सची विक्री वाढत आहे.

स्ट्राइड्स फार्मा या कंपनीच्या पुडुचेरी येथील युनिटच्या तपासणीत USFDA नी भेसळ आणि CGMP चे (करंट गुड्स मॅनुफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस) नियम पाळले जात नसल्याचा रिपोर्ट केला. यामुळे स्ट्राईड फार्माचा शेअर पडला.

उद्या कर्नाटक राज्याच्या विधानसभेत मुख्यमंत्री विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. तसेच आज सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या सभापतींना अशी सूचना केली की त्यांनी फुटीर आमदारांविषयी लवकर निर्णय घ्यावा. तसेच ते या आमदारांवर विश्वासदर्शक ठरावात भाग घेण्याची सक्ती करू शकत नाहीत. या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांमुळे BF यूटिलिटीज आणि BF इन्व्हेस्टमेंट या शेअरमध्ये वाढ झाली.

DCB बँकेचा पहिल्या तिमाहीचा निकाल असमाधानकारक होता. SME सेक्टरमध्ये NPA वाढल्यामुळे आणि पुढील दोन तिमाहीत हा प्रश्न राहील असे व्यवस्थापनाने सांगितल्यामुळे DCB बँकेचा शेअर सपाटून पडला.
टाटा एलेक्सि या कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. उत्पन्न आणि PAT दोन्हीही कमी झाले. त्यामुळे शेअर पडला.

धनलक्ष्मी बँक तोट्यातून फायद्यात आली. पण शेअरमध्ये मात्र या निकालामुळे जास्त फरक पडला नाही.

आज विप्रो या IT क्षेत्रातील कंपनीने आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. PAT Rs २३८८ कोटी, उत्पन्न Rs १४७१६ कोटी, EPS ३.९७ होता. चौथ्या तिमाहीपेक्षा ३.८६% वाढ झाली. अझीम प्रेमजी हे विप्रो कंपनीचे संस्थापक CEO जुलै २०१९ अखेर निवृत्त होत आहेत.

येस बँकेचे पहिल्या तिमाहीत प्रॉफिट (YOY) बेसिसवर ९१% कमी होऊन Rs ११३.८० कोटी झाले. GROSS NPA ५.०१% (३.२२% मार्च तिमाहीत) राहिले. प्रोव्हिजन Rs १७८४ कोटी यापैकी ( मार्क टू मार्केट प्रोव्हिजन Rs ११०९ कोटी) केली. NII Rs २२८१ कोटी होते . नेट NPA २.९१% होते NIM २.८% होते. लोन ग्रोथ १०.१% होती.

माईंड ट्रीचा PAT Rs ९३ कोटी होते. मार्जिन १०% होते.

कॉक्स &किंगने Rs ४१.१० लाखाचा व्याजाच्या पेमेंटमध्ये डिफॉल्ट केला. कॅश फ्लोमधील अडचणींमुळे हा डिफॉल्ट झाला असे कॉक्स एन्ड किंग्सच्या व्यवस्थापनाने सांगितले.

ऑइल इंडिया ने १२ ऑइल ब्लॉकसाठी तर वेदांताने १० ऑइल ब्लॉकसाठी आणि ONGC ने ८ ब्लॉक साठी तर रिलायन्स इंडस्ट्रीजनी SOLE KG बेसिनसाठी आणि IOC ने १ ऑइल ब्लॉक साठी सरकारबरोबर करार सही केला.

इंडस इंड बँकेच CEO सोबती यांना ७० वर्ष पुरी झाल्यामुळे घ्यावी लागणारी निवृत्ती जवळ येत असल्यामुळे बँकेच्या शेअरहोल्डर्समध्ये अस्वस्थता आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९२१५ NSE निर्देशांक निफ्टी ११६८७ बँक निफ्टी ३०७३५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.