आजचं मार्केट – १८ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १८ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६३.५७ प्रति बॅरल ते US $ ६३.९३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.७५ ते US $१=Rs ६८.९६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.०९ तर VIX ११.७८ होता.

सतत दुसऱ्या महिन्यासाठी USA चा हौसिंग डेटा कमजोर आला. USA मध्ये व्याज रेट वाढतील असा अंदाज आहे. यामुळे सोने आणि चांदी यांच्या किमतीत वाढ होत आहे.

उद्यापासून CPSE ETF सुरु होईल. या ETF मध्ये ११ सरकारी कंपन्या आहेत.

काल येस बँकेचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले. येस बँकेमध्ये विदेशी संस्था स्टेक घेत आहेत या बातमीला कोठलाही दुजोरा बँकेने निकाल जाहीर करताना दिला नाही. बँकेच्या बॅलन्सशीटची साफसफाई आणखी किती दिवस चालणार आहे याचा खुलासाही निकालात नव्हता. त्यामुळे येस बँकेच्या शेअरमध्ये वाढत्या अनिश्चिततेमुळे शेअर Rs ८५ पर्यंत पडला.

कर्नाटक हायकोर्टाने दोनीमलाई खाणीच्या संबंधात NMDC ला दिलासा दिल्यामुळे दोनीमलाई युनिटमध्ये पुन्हा काम सुरु होईल.

सेबीने आज असा प्रस्ताव केला की जर ऑडिटर्सनी त्यांना ज्या मुदतीसाठी नेमले असेल त्या मुदतीच्या आधी लिस्टेड कंपन्यांच्या ऑडिटर म्हणून राजीनामा दिला तर त्यांना आता त्यांच्या राजीनाम्याचे कारण जाहीर करावे लागेल. हा प्रस्ताव ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार यांच्या हितासाठी करण्यात आला. यामुळे पारदर्शकता वाढेल.

पंजाब आणि सिंध बँकेमध्ये भूषण स्टील आणि पॉवरच्या संबंधात तर अलाहाबाद बँकेमध्ये SEL मॅनुफॅक्चरिंगच्या खात्यात घोटाळा उघडकीस आला. त्यामुळे हे दोन शेअर तर पडलेच पण इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्स वर ही परिणाम झाला. उदा बँक ऑफ बरोडा, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँक

BHEL ला एमिशन कंट्रोल सिस्टिमसाठी Rs ७५० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

RIL ने ‘हॅमलेज ग्लोबल’ विकत घेण्याचा व्यवहार पूर्ण केला.

माईंड ट्री या कंपनीचा पहिल्या तिमाहीचा निकाल असमाधानकारक होता. कंपनीने Rs २० प्रती शेअर विशेष लाभांश जाहीर केला. पण असमाधानकारक निकाल आणि अपेक्षेपेक्षा कमी विशेष लाभांश जाहीर झाल्यामुळे कंपनीचा शेअर पडला.

कोलगेटचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. PAT Rs १६९.१० कोटी तर उत्पन्न Rs १०८५ कोटी राहिले. व्हॉल्युम ४% नी वाढले. EBITDA मार्जिन कमी झाले. जाहिरातींवरील खर्च वाढले. स्टरलाईट टेकचे उत्पन्न वाढले नफा वाढला निकाल समाधानकारक होते.

हाटसन ऍग्रोचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

CYIENT चे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

ACC या सिमेंट क्षेत्रातील कंपनीच्या जून अखेर तिमाहीचा निकाल जाहीर झाला. PAT ३९% वाढून Rs ४५६ कोटी झाले. उत्पन्न ७.८३% ने वाढून Rs ४१५० कोटी झाले. रेडी मिक्स्ड काँक्रीट बिझिनेसमुळे प्रॉफिट वाढले. कंपनीनं आठ रेडी मिक्स काँक्रीट प्लांट सुरु केले. ऑपरेटिंग मार्जिन वाढले.

DB कॉर्पचे रिझल्ट समाधानकारक म्हणता येतील.पॅट थोडे कमी झाले. उत्पन्न कमी झाले पण ऑपरेटिंग मार्जिन वाढले.
विप्रोचा Rs १०५०० कोटींचा शेअर बायबॅक पूर्ण केला जाईल. सरकारच्या कर धोरणाविषयीच्या निर्णयाची कंपनी वाट पाहत आहे. (सरकारने अंदाजपत्रक जाहीर होण्याआधी जाहीर झालेल्या/ सुरु झालेल्या शेअर बायबॅकमध्ये सवलत देण्याविषयी विचार चालू आहे असे जाहीर केले होते) यामुले मंदीच्या मार्केटमध्ये विप्रोचा शेअर वाढत होता.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८८९७ NSE निर्देशांक निफ्टी ११५९६ बँक निफ्टी ३०४३० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – १८ जुलै २०१९

    1. surendraphatak

      हाऊसिंग आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्राची पूर्ण माहिती यावरून मिळते घरांचे प्रकार,त्याच्या किंमती,घरभाडे,तारण , शहरी आणि ग्रामीण विभागातील बांधकाम याची माहिती असते हा सर्व डेटा चांगला नाही. अमेरिकेतील हा सर्व डेटा खराब आला

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.