आजचं मार्केट – १९ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १९ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६२.७० प्रती बॅरल ते US $ ६३.१० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.७८ ते US $१= Rs ६८.९० दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.८२ होता.

मार्केट उघडले तेव्हा ग्लोबल क्युज चांगले होते. USA सेंट्रल बँक रेट कट करेल असे संकेत होते. त्यावेळी मार्केट ११६०० वर होते. त्यानंतर मार्केटने U टर्न घेतला.आणि मार्केट (सेन्सेक्स) ६०० पाईंट पडले. त्याची कारणे पुढीलप्रमाणे
(१) FPI सातत्याने त्यांचा स्टेक कमी करत आहेत. अर्थमंत्रयांनी आयकर सरचार्ज मधून FPI ला वगळणे किंवा काही सवलत देणे नाकारले. FPI ना सरचार्ज द्यायचा नसेल तर त्यांनी ट्रस्ट आणि व्यक्ती हे ऑर्गनायझेशन फॉर्म सोडून कॉर्पोरेट स्ट्रक्चरचा अवलंब करावा असे ठणकावून सांगितले.
(२) ऑटो आणि फायनान्स शेअर्स जास्त पडले. बँक निफ्टी आज सर्वात जास्त पडला.
(३) आजपर्यंत जाहीर झालेले पहिल्या तिमाहीचे निकाल गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे नव्हते.
(४) USAच्या फेडने आपण ३०-३१ जूलै २०१९ रोजी होणाऱ्या मीटिंगमध्ये रेट कटचा निर्णयावर विचार करू असे जाहीर केले.

क्रूडसाठी असलेल्या मागणीत घट झाल्यामुळे क्रूडचा दर कमी होता. IEAने जागतिक क्रूडच्या मागणीत या वर्षी घट होईल असे अनुमान जाहीर केले आहे.USA च्या नौसेनेने इराणचे एक ड्रोन पाडल्यामुळे आखाती देशात तणाव आहे.

आज किरकोळ गुंतवणूकदारांसाठी CPSE ETF ओपन झाला.

DR रेड्डीजने ऍलर्जीसाठी ALLEGA-D हे औषध लॉन्च केले.

मे २०१९ मध्ये रिलायन्स जिओनी ८१लाख नवे ग्राहक जोडले तर वोडाफोनने ५७ लाख आणि एअरटेलने १५.१ लाख ग्राहक गमावली.

आज बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला ५० वर्षे झाली. पण या दिवशी या निर्णयाचा पुनर्विचार करावा का अशी नॅशनलाइझ्ड बँकांची परिस्थिती आहे.

RBIने बँकांना असे निर्देश दिले की लोन वसुलीच्या प्रयत्नात सुधारणा करावी तसेच NPA चा प्रश्न हे एक आव्हान समजावे. ज्या क्षेत्रांमध्ये कर्जाची जरुरत असेल त्यांना पुरेसे कर्ज द्यावे. तसेच NBFC ना कर्ज देण्यात सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांनी महत्वाची भमिका पार पाडावी.

RBL बँकेचा पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला आला. प्रॉफिट Rs.२६७ कोटी, ग्रॉस NPA १.३८% तर नेट NPA ०.६५% होते. NII Rs ८१७.३० कोटी होते. लोन ग्रोथ ३५% होती. NIM ४.३% होते. बँकेचे WRITEOFFS Rs १४७ कोटी तर स्लीपेजिस Rs २२५ कोटी होते. पण चेअरमननी आपल्या भाषणात असे सांगितले की पुढील दोन तिमाहीमध्ये कॉर्पोरेट NPA मध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. एकूणच ऍसेट गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे शेअर खूपच पडला.
बंधन बँकेचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. PAT Rs ७०१ कोटी, ग्रॉस NPA २.०२% तर नेट NPA ०.५६% राहिली.पण मार्केट्मधील मंदीचा फटका या शेअरलाही बसल्यामुळे हाही शेअर पडला.

डाबरचे उत्पन्न, PAT, EBITDA, ऑपरेटिंग मार्जिन यांच्यात सुधारणा झाली. कंपनीला एकमुश्त (एकावेळी होणारा) Rs २० कोटी तोटा झाला.

इंडिगो या विमानवाहतूक क्षेत्रातील कंपनीची पहिल्या तिमाहीचे निकाल खूप चांगले आले. सध्या या कंपनीच्या दोन प्रमोटर्समध्येही वाद सेबी आणि MCA यांच्या समोर आहे.

आज रिलायन्स इंडस्ट्रीजने आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.PAT Rs १०१०४ कोटी राहिले. उत्पन्न Rs १.६१ लाख कोटी राहिले. (YOY २१.२५% वाढ) . EBITDA मार्जिन १३.६% राहिले. GRM US $ ८.१ होते.रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओचा परफॉर्मन्स चांगला राहिला. पेटकेम मार्जिनमध्ये वाढ झाली. इतर उत्पन्न Rs ३१४६ कोटी होते. ब्रूकफील्ड रिलायन्स मध्ये Rs २५२१५ कोटी घालेल. त्यातून रिलायन्सचे कर्ज फिटेल.

बायोकॉन ही कंपनी एक महत्वाचे औषध मार्केटमध्ये आणणार होती. पण हे औषध बायोकॉन आधीच दुसऱ्या कंपन्यांनी बाजारात आणले त्यामुळे बायोकॉनला होणारा फायदा कमी होईल. त्यामुळे बायोकॉनचा शेअर पडला.

एल आय सीने UPL, ITC, ग्रॅन्युअल्स, GILLETTE, ब्ल्यू डार्ट, बँक ऑफ बरोडा, अडानी पोर्ट या शेअर्समध्ये स्टेक वाढवला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८३३७ NSE निर्देशांक निफ्टी ११४१९ बँक निफ्टी २९७७० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.