आजचं मार्केट – २२ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २२ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६३.२० प्रती बॅरल ते US $ ६३.९१ या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.९१ ते US $१= Rs ६९.०२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.१९ होता. VIX १२.५२ होता.

हॉंगकॉंग आणि चीनमधील तणाव वाढत आहे. इराणने UK चा ऑइल टँकर जप्त केला आहे. फेडनी आधी सांगितले की ५० बेस पाईंट रेट कट करू नंतर सांगितले की यावर ३० जुलै आणि ३१ जुलै या दोन दिवस होणाऱ्या मीटिंगमध्ये निर्णय घेतला जाईल. ECB, जपान, USA या देशांच्या सेंट्रल बँका आपापली वित्तीय धोरणे पुढील १५ दिवसात जाहीर करतील. जगातील बहुतेक सर्व बँका ईझी मनी पॉलिसीचा विचार करत आहेत. त्यामुळे रेट कट होण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये FII ची विक्री चालू आहे. त्यामुळे मार्केट मंदीत आहे.

अमर राजा बॅटरीचा पहिल्या तिमाहीचा निकाल खूप छान आले. आव्हानात्मक परिस्थितीतसुद्धा मार्जिन वाढले. हे निर्यातीमुळे साध्य झाले. यातला काही भाग हा अकौंटिंग स्टॅंडर्ड बदलल्यामुळे शक्य झाला आहे.

ITC मध्ये नेहेमी इन्व्हेस्टर खूप असतात. ह्या शेअरचा BETA खूपच कमी आहे . ह्या शेअरच्या किमतीतील हालचाल धीम्या गतीने होते. पण हा शेअर एवढ्या मंदीच्या मार्केटमध्येही चांगला किल्ला लढवतो आहे. डिलिव्हरी व्हॉल्युम चांगले आहेत.
येत्या गुरुवारी GST कौन्सिलची मीटिंग आहे. GST १२% वरून ५% वर आणण्यावर या मीटिंग मध्ये विचार होईल.
HDFC बँकेने दिलेल्या Rs ५ प्रती शेअर विशेष लाभांशाने मार्केटच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना विशेषतः दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची झाली. HDFC बँकेचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. पण व्यवस्थापनाने सांगितल्याप्रमाणे लोन ग्रोथ चा वेग कमी होईल. त्यामुळे पुढील तिमाहीचे निकाल काळजीपूर्वक पाहणे जरुरीचे आहे. आज HDFC बँकेचा शेअर पडला.

इंडिगोच्या पहिल्या तिमाहीचे निकाल पाहिले तर दोन प्रमुख प्रमोटर्समधील भांडणाचा परीणाम निकालावर झालेला दिसला नाही. उलटपक्षीय जेट एअरवेज बंद पडली त्याचा चांगला परिणाम इंडिगोच्या निकालावर दिसला. पण जेटचे जे स्लॉट दिले गेले त्यामध्ये इंडिगोला प्रेफरन्स मिळाला असे दिसले नाही. त्यांच्या मार्केट शेअरचा विचार झालेला नाही. पण इंडिगोमध्ये
शेअर खरेदी करण्यासाठी थोडे थांबून खालच्या लेव्हलला गुंतवणूक केलेली बरी.

ऍक्सिस बँक Rs १८००० कोटी उभारणार आहे. पण हे कोणत्या प्राईस पाईंटला हा प्रश्न आहे. आता मार्केटमध्ये आणि विशेषतः फायनान्सियल क्षेत्रात मंदी सुरु आहे. त्यामुळे बँकेला थोडे थांबावे लागण्याची शक्यता आहे.

सिप्लाच्या बँगलोरमधील वीरगोनगर प्लांटच्या तपासणीत ७ त्रुटी दाखवल्या.

BHEL ही न्युक्लिअर पॉवर क्षेत्रात आपला बेस वाढवून राहिली आहे. तामिळनाडूमधील कुंदनकुलम प्रोजेक्टची Rs ४८६ कोटीची ऑर्डर NPCIL ( न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) यांच्या कडून मिळाली. BHEL नी या आधीच्या सर्व ऑर्डर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत.

BOSCH या कंपनीने तामिळनाडू प्लांटमधील उत्पादन बंद केले.

एस्सार स्टीलच्या रेझोल्यूशनसंबंधित NCLAT च्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने स्टे दिला. पुढील सुनावणी ७ ऑगस्ट रोजी होईल.

LAURAS लॅबने USA मधे ‘PERGABALIN’ हे औषध लाँच केले.

कलाहस्ती पाइप्सचा पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला आला. PAT, उत्पन्न EBITDA, ऑपरेटिंग मार्जिन यात लक्षणीय वाढ दिसली.

OBC बँक तोट्यातून फायद्यात आली. Rs ३९३ कोटी तोट्याऐवजी Rs ११३ कोटी फायदा झाला. GNPA आणि NNPA मध्ये मात्र फारशी सुधारणा झाली नाही.

सन फार्माच्या प्रमोटर्सनी १९ जुलै २०१९ रोजी तारण म्हणून ठेवलेले ३० लाख शेअर्स सोडवले.

लक्ष्मी मशीन टूल्सचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. PAT, उत्पन्न कमी झाले.

DHFL मध्ये AION कॅपिटल मेजॉरिटी स्टेक घेणार आणि US $ १.५ बिलियनची गुंतवणूक करणार आहे. सध्याच्या प्रमोटर्सचा स्टेक १०% ने कमी होणार अशी खबर आल्यामुळे DHFL चा शेअर वाढला आणि त्याच बरोबर येस बँक, इंडिया बुल्स हौसिंग यांचे शेअर्सही वाढले. येस बँकेने DHFL ला कर्ज दिले आहे.

कॅन फिना होम्स या NBFC चे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

कोटक महिंद्रा बँकेचे पहिल्या तिमाहीचे निकाल खूप चांगले आले. कासा रेशियो, NII लोन ग्रोथमध्ये चांगली वाढ झाली.
HM व्हेंचरचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

TVS मोटर्सचे निकाल ठीक आले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८०३१ NSE निर्देशांक निफ्टी ११३४६ बँक निफ्टी २९२८४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.