आजचं मार्केट – २३ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २३ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६३.१४ प्रती बॅरल ते US $ ६३.६२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=Rs ६८.९५ ते US $ १= Rs ६९.०२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५१ होता VIX १३.४३ होते .

टाटा ग्रुप प्रोजेक्ट बिझिनेस वेगळा काढायचा विचार करत आहे. वोल्टासमधील प्रोजेक्ट बिझिनेस (इंजिनीअरिन्ग बिझिनेस) अलग काढला जाणार आहे.कंपनी फक्त कन्झ्युमर बिझिनेसवर लक्ष केंद्रित करेल.

F & O मधून ९ कंपन्यांचे शेअर्स बाहेर पडणार आहेत. रेमण्ड, अरविंद, इंजिनीअर्स इंडिया, हिंदुस्थान झिंक, MCX, IDBI बँक, ओरॅकल, कजारिया सिरॅमिक्स, बिर्ला सॉफ्ट या कंपन्यांचे शेअर्स २७ सप्टेंबर २०१९ पासून F & O मधून बाहेर पडतील.

ब्ल्यू स्टारला मुंबई मेट्रोकडून Rs २५० कोटीची ऑर्डर मिळाली.

IOB चा तोटा Rs ९१९ कोटींवरून Rs ३४२ कोटी राहिला. GNPA आणि NNPA यात किंचित वाढ झाली. प्रोव्हिजन कमी झाली. NII मध्ये वाढ झाली. एकंदरीत पाहता निकाल असमाधानकारकच म्हणावे लागतील.

कजारिया सिरॅमिक्सचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. PAT, EBITDA, उत्पन्न, ऑपरेटिंग मार्जिन यांत वाढ झाली.
शांती गिअर्सचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

प्राज इंडस्ट्रीजचे पहिल्या तिमाहीचे निकाल खूपच चांगले आले.

झी एंटरटेनमेंटचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. PAT, EBITDA, उत्पन्न, ऑपरेटिंग मार्जिन यांच्यात चांगली वाढ दिसली. डोमेस्टिक सब्स्क्रिप्शनमध्ये चांगली वाढ झाली.

HUL चे जूनअखेरीच्या तिमाहीचे निकाल चांगले आले. PAT Rs १७५५ कोटी, उत्पन्न Rs १०११४ कोटी, EBITDA Rs २६४७ कोटी होते. डोमेस्टिक व्हॉल्युममध्ये ५% वाढ झाली

बेयर क्रॉपचे निकाल असमाधानकारक आले.

५:९५, १०:९०, २०:८० च्या स्कीमखाली असलेल्या कोणत्याही योजनेला सबव्हेन्शन स्कीम अंतर्गत लोन देऊ नये. हौसिंग लोनची डिसबर्समेन्ट करताना हौसिंग फायनान्स कंपन्यांनी बांधकामातील विविध टप्पे जसे पूर्ण होतील त्याप्रमाणेच हौसिंग लोनची टप्या टप्याने डिसबर्समेंट करावी.असे NHBने सांगितले.

लार्सन & टुब्रोचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

उत्पन्न Rs २९६३६ कोटी,कन्सॉलिडिटेड PAT Rs १४७३ कोटी, EBITDA Rs ३३१९ कोटी होते. ऑर्डर बुक Rs २.९४ लाख कोटी. वन टाइम लॉस Rs ९४ कोटी झाला. ऑपरेटिंग मार्जिन ११.२% होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७९८२ NSE निर्देशांक निफ्टी ११३११ बँक निफ्टी २९१२८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

8 thoughts on “आजचं मार्केट – २३ जुलै २०१९

  1. surendraphatak

   EBITDA म्हणजे व्याज, कर, घट,amortisation ची रक्कम वजा करण्याच्या आधीचे उत्पन्न आणि PAT म्हणजे कर दिल्यानंतर येणारा फायदा होय या सर्व माहितीसाठी आपण माझे पुस्तक वापरा ब्लॉगवर पहा

   Reply
 1. अदिती अनमोल मुधोळकर

  व्वा! भाग्यश्री फाटक ताई…फारच छान! मराठीत शेअर मार्केट च विश्लेषण आणि विवेचन आहे आणि तेही एक कर्तबगार आणि मराठी स्त्री जी उद्योजिका सुद्धा आहे तिच्या द्वारे..महत्वाचे म्हणजे ज्या क्षेत्रावर पुरुषवर्गाची मक्तेदारी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही! मला तुमच्या सर्व बोधपर पोस्ट वाचायला आणि त्यातून काहीतरी शिकायला जरूर आवडेल! आवडत्या आणि महत्वाच्या अशा फायनान्स या क्षेत्रात मलासुद्धा खारीचा वाटा उचलता येईल असा विश्वास वाटतो! आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा!😊

  Reply
 2. प्रशांत

  खुप छान माहिती आहे ,पुढे मार्केट काय असेल

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.