आजचं मार्केट – २४ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २४ जुलै २०१९

आज क्रूड US $६३.९१ प्रती बॅरल ते US $ ६४.०९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs.६८.९८ ते Rs ६९.०० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.७२ तर VIX १२.७६ होते. FPI च्या उत्पनावरील सेस वाढवल्यापासून FII सतत विक्री करत आहेत. त्यांनी आज Rs २६०८ कोटींची कॅश मार्केटमध्ये विक्री केली. फ्युचर्समध्ये Rs ३०० कोटींची विक्री केली. हे लोक गुंतवणूक करत असलेले क्वालिटी शेअर्स पडत आहेत. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, HDFC आणि HDFC बँक, ABB, स्टेट बँक आणि सर्व क्वालिटी शेअर्स पडत आहेत. इतरांसाठी हे शेअर्स पडलेल्या किमतीत खरेदी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

प्राज इंडस्ट्रीजचा पहिल्या तिमाहीचा निकाल अपेक्षेप्रमाणे खूप चांगला आला. सरकार सातत्याने साखर उत्पन्न क्षेत्राला सवलती देत आहे. प्राज वॉटर ट्रीटमेंटचे काम करते. याही क्षेत्रात त्यांनी चांगली प्रगती केली आहे.

आज सरकारने साखर उत्पादक क्षेत्रासाठी ४० लाख टन बफर स्टॉक मंजूर केला. उसाची FRP (फेअर आणि रेम्यूनरेटिव्ह प्राईस) Rs २७५ कोटी प्रती क्विंटल जाहीर केली. या सरकारच्या निर्णयामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

HUL च्या पहिल्या तिमाहीच्या निकालात ऑपरेटिंग मार्जिन वाढले. पण जाहिरातींवरील खर्च कमी केला. याचा परिणाम मेडिया सेक्टरमधील कंपन्यांच्या उत्पन्नावर होईल. रूरल आणि अर्बन ग्रोथ सारखी आहे. ग्रामीण क्षेत्रातील वाढ आणि मागणी वाढणे जरुरी आहे.व्यवस्थापनाच्या कॉमेंटरीमध्ये फारसा जोर दिसला नाही. ग्रामीण क्षेत्रातील ग्रोथच्या बाबतीत व्यवस्थापनाची नाराजी जाणवली. मागणीमध्ये स्लो डाऊन होत आहे त्यामुळे भविष्यात आता जेवढे मार्जिन शक्य होत आहे तेवढे राहील की नाही याची शंका आहे. ग्रामीण क्षेत्रातील मागणी मुख्यतः पाऊस चांगला होण्यावर अवलंबून आहे.
चांद्रयान २ साठी मिश्रा धातू निगम या कंपनीने माल पुरवला.

कर्नाटकमधील खेळ संपला. कोणते सरकार येते याबाबतीत मार्केटला मतलब नसतो. पण अनिश्चितता संपली. इन्फोसिस, BEML शोभा इंटरप्राइझेस, BF यूटिलिटीज आणि BF इन्व्हेस्टमेंट, NMDC या कंपन्यांना फायदा होईल. कर्नाटक राज्य सरकारचे काही निर्णय या कंपन्यांच्या विरोधात गेले होते.

UK मध्ये आता बोरिस जॉन्सन हे पंतप्रधान होतील. हे ब्रेक्झिट ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अमलात आणण्याच्या बाजूचे आहेत. तसेच भारताविषयी त्यांना सॉफ्ट कॉर्नर असल्यामुळे भारत आणि UK यांचे संबंध आधी सौहार्दाचे होतील. टाटा स्टिल आणि टाटा मोटर्स यांच्यावर या सत्तापालटाचा परिणाम होईल.

लार्सन & टुब्रो चे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने माइंडट्रीमधील शेअर्स Rs ९८० प्रती शेअर्स या भावाने खरेदी केले. ही खरेदी थोडी महागात झाली. कोअर बिझिनेसचे मार्जिन कमी होत आहे. शेअर बाय बॅकच्या बाबतीत क्लॅरिटी आली की कंपनी पुन्हा एकदा शेअर्स बाय बॅक जाहीर करेल.

M & M फायनान्सचे पहिल्या तिमाहीचे निकाल खूपच असमाधानकारक होते. NPA मध्ये वाढ होत आहे. त्यामुळे प्रोव्हिजन मधेही वाढ होत आहे. कंपनीचा फोकस ग्रामीण मार्केटवर होता. ग्रामीण आणि शहरी भागात असमतोल आहे त्याचा परीणाम कंपनीच्या बिझिनेसवर दिसतो. हायग्रोथ आणि हाय P /E असलेल्या शेअर्स मधून बाहेर पडून इन्शुअरन्स कंपन्यांचे शेअर्स किंवा लो BETA असलेल्या शेअर्समध्ये जाण्याचा मार्केटचा कल दिसतो आहे. लाईफ इन्शुअरन्स आणि जनरल इन्शुअरन्स क्षेत्रातील कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले येत आहेत. भारत हा खूपच अंडरइन्शुअर्ड देश आहे. त्यामुळे इन्शुअरन्स क्षेत्रासाठी मोठे मार्केट उपलब्ध आहे. HDFC लाईफ, SBI लाईफ, ICICI पृ, ICICI लोम्बार्ड ही काही उदाहरणे आहेत. पुढील १० वर्षात या कंपन्यांमध्ये खूप प्रगती होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांचे अलीकडेच लिस्टिंग झाले आहे. या कंपन्या F & O मार्केट मध्ये नाहीत. म्युच्युअल फंड, संस्थागत निवेशक या शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत.

मारुतीने सांगितले की मागणीमध्ये होणारी घट विचारात घेऊन गुजरातमध्ये जो क्षमतेचा विस्तार करण्यात येणार होता तो काही काळापुरता स्थगित ठेवला आहे. मारुती EV च्या बाबतीत योग्य दिशेने वाटचाल करत आहे. पण चार्जिंग स्टेशन्स आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी सरकार कडून मदत अपेक्षित आहे

सन फार्माच्या प्रमोटर्सनी २२जुलै २०१९ रोजी ३७ लाख शेअर तारण म्हणून ठेवले.

उद्या GST कौन्सिलची बैठक अर्थमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली होईल. यात EV वरील GST १२% वरून ५% करण्यासाठी विचार होईल.

UPL ने भांडवली खर्चासाठी युरो १० कोटी उभारले.

एशियन पेंट्स या कंपनीचा पाहल्या तिमाहीचा निकाल चांगला आला. PAT, उत्पन्न, ऑपरेटिंग मार्जिन यात चांगली सुधारणा झाली. क्रूडचे दर कमी राहिले. कंपनीने स्पष्ट केले की ऑटो क्षेत्रामधील मागणी कमी झाल्यामुळे इंडस्ट्रियल पेंट्स पेक्षा डोमेस्टिक पेंट्समध्ये कंपनीने चांगली प्रगती केली.

ज्युबिलंट फूड्सचे अहिल्या तिमाहीचे निकाल ठीक होते. सेम स्टोर्स ग्रोथने निराशा केली कंपनीने नवीन ४० स्टोर्स उघडली तर ४ स्टोर्स बंद केली

मॉन्सॅन्टो, V -गार्ड, क्रॉम्प्टन कन्झ्युमर,ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कॅनरा बँक, करूर वैश्य बँक यांचे निकाल ठीक होते. NEOJEN सॉफ्टवेअर, शारदा क्रॉपकेम यांचे निकाल असमाधानकारक होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७८४७ NSE निर्देशांक निफ्टी ११२७१ बँक निफ्टी २८९५२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २४ जुलै २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.