आजचं मार्केट – २५ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १७ – १८ ऑगस्ट ला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २५ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६३.३२ प्रती बॅरल ते US $ ६३.६२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.९३ ते US $१=Rs ६८.९८ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९७.७२ तर VIX १२.७२ होते.

जुलै २०१९ ची सिरीज ही गेल्या १७ वर्षातील खराब जुलै महिन्याची सिरीज होती. अमरराजा बॅटरी, ल्युपिन, युनायटेड ब्रुअरीज, इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स, कॅडीला, सिपला, टाटा ग्लोबल बिव्हरेजीस, DR रेड्डीज, BEL, औरोबिंदो फार्मा, पेज इंडस्ट्रीज अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ऑगस्ट सिरीजमध्ये ७५% च्या आसपास रोल ओव्हर झाले.
जुलै महिन्यात FII नी जबरदस्त विक्री केली. (अंदाजपत्रकात जादा सेस लावल्यामुळे) त्यामुळे सर्व ब्ल्यू चिप आणि लार्जकॅप शेअर्समध्ये मंदी आली. नेहेमी DII खरेदी करतात पण यावेळी ही विक्री मोठ्या प्रमाणात आणि थोड्या वेळात झाली.अजूनही एल आय सी ने खरेदी सुरु केली की नाही याची माहिती नाही. त्यामुळे निफ्टी आणि सेन्सेक्स मोठ्या प्रमाणात पडले. बँका आणि NBFC यांच्या विषयी येणाऱ्या प्रतिकूल बातम्यांमुळे बँक निफ्टीही पडला.

ब्रिटानियाच्या शेअरमध्ये खूपच मंदी आली. अमूलने प्रीमियम बिस्किटांच्या सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या बिस्किटांमधील घटक चांगले आहेत. त्यामुळे ब्रिटानियाचा मार्केट शेअर थोडासा अमूल कडे जाण्याची शक्यता आहे.
साऊथ इंडियन बँकेचे उत्पन्न, नफा वाढला, NPA मध्ये थोडी घट आहे. एकूण निकाल चांगले म्हणता येतील.

FACT त्यांच्याकडे असलेली शिलकी जमीन केरळ राज्य सरकारला विकेल. ही रक्कम कंपनीच्या खर्चासाठी वापली जाईल. या बातमीने FACT या कंपनीचा शेअर वाढला. याचबरोबर या कंपनीची आणि मद्रास फर्टिलायझर यांचे मर्जर होण्याची शक्यता आहे. NFL ही कंपनी निमकोटेड युरिआ विकते.

भारती इंफ्राटेलचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. सागर सिमेंटचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

ताज GVKचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. नफा, ऑपरेटिंग मार्जिन यांच्यात वाढ झाली.

कॅपलिन पाईण्टच्या इंजेक्टीबल युनिटला USFDA ने EIR (एस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्ट) दिला.

बजाज फायनान्सचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले पण मार्केटच्या अपेक्षा वाढल्याने शेअर पडला. तसेच त्याच्या कोअर बिझिनेस म्हणजेच ऑटो लोन आणि डिजिटल लोन ( संगणक, मोबाईल इत्यादीसाठी) मध्ये NPA चे प्रमाण वाढल्यानेही शेअर पडला. PAT Rs ११२५ कोटी, NII Rs ३६९५ कोटी, GNPA १.६०% तर NNPA ०.६४% होते. कंपनीने NPA साठी प्रोव्हिजन ६०% वरून ६१% केली.

थिरुमलाई केमिकल्स या कंपनीचे उत्पन्न वाढले पण प्रॉफिट आणि ऑपरेटिंग मार्जिन कमी झाले.

जालान कमिटीचा रिपोर्ट सादर व्हायला वेळ लागला. जालान समिती RBI चे मत या संबंधी काय आहे याची नोंद घेईल.

HDFC बँकेने सांगितले की आयशर मोटर्सच्या डिलर्सना लोन देणार नाही.

टाटा मोटर्सचे पहिल्या तिमाहीचे निकाल आले. कंपनीला Rs ३६९० कोटी तोटा झाला. उत्पन्न Rs ६१४६७ कोटी झाले. आणि ऑपरेटिंग मार्जिन ६.२% राहिले. त्याचा JLR युनिटला GBP ५९७ कोटी उत्पन्न तर GBP ४० कोटी तोटा झाला. ऑपरेटिंग मार्जिन ४.२% होते. हे निकाल मार्केटच्या अपेक्षेपेक्षा खूपच निराशाजनक आहेत. त्यामुळे शेअर पडण्याची शक्यता आहे.

ग्राईंडवेल नॉर्टन या कंपनीला Rs ४२.७ कोटी नफा झाला तर उत्पन्न Rs ४८० कोटी झाले. निकाल समाधानकारक होते.

राणे ब्रेक्सचे पहिल्या तिमाहीचे निकाल ठीक होते.

सरकार PSU चे ऍसेट विकून Rs ३००० कोटी गोळा करेल.

वेस्टलाइफ डेव्हलपमेंट फायद्यातून तोट्यात गेली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७८३०, NSE निर्देशांक निफ्टी ११२६१ बँक निफ्टी २९१०९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – २५ जुलै २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.