आजचं मार्केट – २६ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १७ – १८ ऑगस्ट ला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २६ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६३.४९ प्रती बॅरल ते US $६३.५६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.०२ ते US $१=Rs ६९.१२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.७७ होते. VIX १२.५४ होते.

‘जय हो’ आज कारगिल विजयाचा दिवस आहे. आज मार्केटने सुद्धा चांगली सलामी दिली. मार्केटची पुढची चाल जगातील सेंट्रल बँकांवर अवलंबून राहील. ECB ने जरी तूर्त व्याजाच्या दरामध्ये कोणतेही बदल केले नाहीत तरी सप्टेंबरमध्ये जर इन्फ्लेशन लक्ष्य गाठत नाही असे वाटले तर रेट कट, मार्केटमधून ऍसेट खरेदी असे मार्ग लिक्विडीटी वाढवण्यासाठी अवलंबले जातील असे सांगितले. युरोझोन मध्ये सध्या मंदीचा धोका दिसतो आहे.USA मध्ये आलेल्या कंपन्यांचे निकाल काही अपवाद वगळता समाधानकारक नाहीत. यामुळे मंदी स्पष्टरित्या जाणवते आहे.

आज कर्नाटक राज्याच्या राज्यपालांनी BJP ला सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित केले.BEML या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीकडे २७०० एकर जमीन आहे. सरकार २७% डायव्हेस्टमेन्ट करणार आहे. पूर्वीचे राज्य सरकार या साठी विरोध करत होते. आता सरकार बदलल्याने डायव्हेस्टमेन्ट शक्य होईल.

ASTRA झेनेका या कंपनीने DR रेडीज या कंपनीविरुद्ध USA मधील कोर्टात ‘ BRILINTA’ या औषधाला ASTRA झेनकाला मिळालेले पेटंट संपण्याच्या आधी DR रेडीज ने त्याचे जनरिक व्हर्जन USA मध्ये लाँच केले असा दावा केला.

इंडोको रेमिडीज या कंपनीच्या USFDA ने २७ मे ते ४ जून २०१९ या दरम्यान केलेल्या तपासणीत गोवा युनिट ३ ला क्लीन चिट दिली.

ACC च्या मानाने अंबुजा सिमेंटची व्हॉल्युम ग्रोथ कमी दिसली.

बँक ऑफ बरोडा प्रॉफीटमध्ये आली परंतु NPA मध्ये वाढ झाली व्यवस्थापनाने देना बँक आणि विजया बँक मर्जर झाल्याचा हा परिणाम आहे असे सांगितले.

PVR, महिंद्रा लाईफ,फोर्स मोटर्स या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

बायोकॉन, ज्युबिलंट लाईफ,, पुर्वांकारा, ADOR वेल्डिंग या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
भारत बिजली तोट्यातून फायद्यात आली. पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

JSW स्टील चे उत्पन्न Rs १९८१२ कोटी, नफा Rs १०३० कोटी आणि ऑपरेटिंग मार्जिन १८.७६% होते. या कंपनीची विक्री ३% ने कमी झाली.

बजाज ऑटोचे उत्पन्न Rs ७७५६ कोटी तर फायदा Rs ११२५ कोटी आणि इतर उत्पन्न Rs ४४७ कोटी होते. ऑपरेटिंग मार्जिन १७.९४ % होते. कंपनीने एन्ट्री लेव्हल गाड्यांवर लक्ष केंद्रित केले होते आणि २% भाव वाढवले होते.
मारुती Rs १४३५ कोटी प्रॉफिट उत्पन्न Rs १९७२० कोटी, EBITDA (अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिसिएशन, अमॉर्टीझेशन) Rs २०४८ कोटी मार्जिन १०.४ % इतर उत्पन्न Rs ८३६ कोटी होते टॅक्स खर्च Rs ४७५ कोटी होता. इतर उत्पन्न Rs ५०० कोटींनी वाढले, टॅक्स खर्च Rs ४०० कोटींनी कमी झाला. हे लक्षात घेतले तर मारुतीचे रिझल्ट फारसे चांगले नाहीत हे लक्षात येते.

PNB फायदा Rs १०१९ कोटी NII Rs ४१४१ कोटी होता. प्रोव्हिजनिंग कमी केली पण NPA वाढले.

वेदांता या कंपनीने अँग्लो अमेरिकन कंपनीमध्ये जी गुंतवणूक केली होती त्याच्या बद्दल वेदांताला बॉण्ड मिळाले होते. तो करार आता रद्द केला त्यामुळे त्यांना या गुंतवणुकीचे पैसे मिळतील

टाटा स्पॉन्ज या कंपनीचा Rs ५०० प्रती शेअर किमतीचा राईट्स इशू काल क्लोज झाला. या मध्ये टाटा स्टीलने Rs १३०० कोटी गुंतवणुक केली. आता टाटा स्टीलचा स्टेक ७५% झाला.

ASTRAL पॉली या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बोनसवर विचार करण्यासाठी २ ऑगस्ट २०१९ रोजी बैठक आहे.
ईरीस लाईफसायन्सेस, ICICI बँक, एस्कॉर्टस, हॅवेल्स, आपले पहिल्या तिमाहीचे निकाल २७ जुलै रोजी जाहीर करतील
MOIL, चेन्नई पेट्रो, कोची शिपयार्डस, DR रेड्डीज, KPR मिल्स ओरिएंट सिमेंट, टाटा स्पॉन्ज, V २ रिटेल या कंपन्या आपले पहिल्या तिमाहीचे निकाल २९ जुलै रोजी जाहीर करतील.

ऍक्सिस बँक, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, हिरो मोटो कॉर्प, NMDC, PNB हौसिंग, टेक महिंद्रा, युनायटेड बँक आपले पहिल्या तिमाहीचे निकाल ३० जुलै २०१९ रोजी जाहीर करतील.

अजंता फार्मा, अपोलो टायर्स, अलाहाबाद बँक, अशोक लेलँड, आयचर मोटर्स, IOC, पेट्रोनेट LNG, सिम्फनी या कंपन्या आपले पहिल्या तिमाहीचे निकाल ३१ जुलै २०१९ रोजी जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७८३० NSE निर्देशांक निफ्टी ११२५२ बँक निफ्टी २९०४३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.