आजचं मार्केट – २९ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १७ – १८ ऑगस्ट ला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २९ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६३.१३ प्रती बॅरल ते US ६३.२४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.७३ ते US $१=Rs ६८.८९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८ होता. VIX १३.३० होते.

USA च्या अर्थव्यवस्थेचे आकडे चांगले आले. फेड ३१ जुलै २०१९ ला रेट कट करण्याची शक्यता आहे. ३० जुलै २०१९ पासून USA आणि चीन यांच्यात टॅरिफसंबंधी बोलणी चालू होतील. यूरोपमधील अर्थव्यवस्थांमध्ये हळू हळू पण निश्चित मंदी येत आहे.

टाटा पॉवरला गुजरातमध्ये २५० MV सोलार प्रोजेक्ट साथीने कॉन्ट्रॅक्ट मिळाले. टाटा पॉवर २५ वर्ष पॉवर पर्चेस अग्रीमेंट तत्वावर GUVNL ला वीज पुरवठा करेल.

सरकारने FY २०१९-२०२० मध्ये शेअर्स बायबॅक करण्यासाठी १० PSUची निवड केली आहे. यात NTPC, PFC, पॉवर ग्रीड, IRCON, RVNL , आणि CONCOR यांचा समावेश आहे.

सेबी मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंग ३५% करण्याच्या विचारात आहे.

AFFLE (इंडिया) ही मोबाइल ऍडव्हर्टायजिंग सोल्युशन्स प्रोवाइड करणारी कंपनी आहे. AFFLE होल्डिंग ही कंपनी AFFLE ( इंडिया) या कंपनीतला त्यांचा स्टेक ८३.५ % वरून ७५.६% वर आणणार आहे. मोबाईल वापरणारा माणूस अप्लिकेशन डाऊन लोड करेल त्यांच्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून व्यवहार करेल. तेव्हा या कंपनीला उत्पन्न मिळते. AFFLE (इंडिया) ही हाय ग्रोथ सेक्टरमधील कंपनी आहे. पण रिच व्हॅल्युएशनआहे. लॉन्ग टर्म कर्ज नाही. रिटर्न रेशियो चांगले आहेत. ज्यांची धोका पत्करण्याची तयारी आहे त्यांनीच या IPOमध्ये अर्ज करावा.कारण सध्या मार्केटमधी मंदीचे वातावरण आहे. या IPO चा प्राईस बँड Rs ७४० ते Rs ७४५ आहे. मिनिमम लॉट २० शेअर्सचा आहे. हा IPO २९ जुलैला ओपन होऊन ३१जुलैला बंद होईल.

एल आय सी चा IPO पुढील काही महिन्यात येण्याची शक्यता आहे. विमा क्षेत्रातील जवळ जवळ ६५% मार्केट शेअर एल आय सी कडे आहे.

GHCL, JMC प्रोजेक्ट, नवीन फ्ल्युओरीन, ओरिएंट सिमेंट चे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. चेन्नई पेट्रो प्रॉफीटमधून लॉसमध्ये गेली. EID पॅरी चा तोटा कमी झाला. बँक ऑफ महाराष्ट्रची ऍसेट गुणवत्ता खालावली. टॅक्स WRITEBACK Rs ३०० कोटींचा आहे. एकंदर निकाल असमाधानकारक म्हणावे लागेल.

DR रेड्डीज चा नफा Rs ६६३ कोटी, ऑपरेटिव्ह मार्जिन २९.५% होते तर इतर उत्पन्न Rs ३८० कोटी होते. निकाल चांगले म्हणावे लागतील. उत्पन्न कमी झाले, इतर उत्पन्न वाढले.

BJP चे नेता सुब्रमणियम स्वामी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून असे कळवले की इंडिया बुल्स हौसिंग ग्रुपने NHB कडून लोन घेऊन Rs १लाख कोटींचा घोटाळा केला आहे. ही बातमी आल्यावर इंडिया बुल्स हौसिंग ग्रुपच्या सर्व कंपन्यांचे( इंडिया बुल्स हाऊसिंग, इंडिया बुल्स रिअल इस्टेट, इंडिया बुल्स व्हेंचर्स, आणि लक्ष्मी विलास बँक) शेअर्स पडले

सरकारने सर्व वाहनांच्या रजिस्ट्रेशन चार्जेसमध्ये वाढ केली. Two व्हीलर वाहनांसाठी Rs १०००,तीन चाकी वाहनांसाठी Rs ५००० तर कार्ससाठी Rs १०००० केली. परदेशी Two व्हिलर्ससाठी रजिस्ट्रेशन चार्जेस Rs १००००/- तर परदेशी कार्ससाठी Rs २००००/- केली. जर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग सर्टिफिकेट मिळवले तर नवीन वाहनासाठी
रजिस्ट्रेशन फीज द्यावी लागणार नाही. प्रदूषण रोखण्यासाठी हा प्रयत्न आहे.

कन्साई नेरोलॅक या कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. ऑपरेटिंग मार्जिन वाढले उत्पन्न वाढले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७६८६ NSE निर्देशांक निफ्टी १११८९ बँक निफ्टी २९२९६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.