आजचं मार्केट – ३० जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १७ – १८ ऑगस्ट ला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ३० जुलै २०१९

आज क्रूड US $ ६४.०० प्रती बॅरल ते US $ ६४.५० प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ६८.६९ ते US $ १= Rs ६८.८३ या दरम्यान होता. US $ निर्देशांक ९८.१८ होता. VIX १३.८० होता.

आज USA मध्ये फेडच्या FOMC ची दोन दिवसांची बैठक सुरु झाली. उद्या रात्रीपर्यंत या मीटिंगमध्ये काय निर्णय झाला याची माहिती मिळेल. USA ची अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्था या बाबतीतील फेडचा दृष्टिकोन महतवाचा ठरेल. या बैठकीत ०.२५ बेसिस पाईंट रेट कट होईल असा तज्ज्ञाचा अंदाज आहे.

चीन त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च वाढवण्याच्या विचारात आहे.

USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वाटाघाटी, फेडच्या FOMC ची मीटिंग आणि त्या मीटिंगमध्ये घेतलेले निर्णय, USA चा जॉब डेटा, पहिल्या तिमाहीचे कॉर्पोरेट निकाल, ऑटो क्षेत्रातील मंदी, RBI च्या येत्या वित्तीय धोरणात रेटकट होण्याची अपेक्षा,अंदाजपत्रकातील जादा सेसमुळे FPI करत असलेली जबरदस्त विक्री, लिक्विडीटीची चणचण, आणि कॅफे कॉफी डे चे संकट ही सगळी कारणे या मार्केट पडण्यामागे आहेत.आज मार्केट पडत होते आणि मार्केट बंद होताना अचानक खूप पडले.

भारत सरकार MTNL आणि BSNL या दोन्ही टेलिकॉम क्षेत्रातील सरकारी कंपन्यांच्या मर्जरची योजना तयार करत आहे.
सन फार्माच्या प्रमोटर्सनी आपल्याकडील ९९.७ % शेअर्स तारण म्हणून ठेवल्याची बातमी आल्यामुळे शेअर पडला.
USA मधील केबल क्षेत्रातील COMCAST या कंपनीच्या नेतृत्वाखालील कन्सॉरशियमने झी एंटरटेनमेंट या कंपनीतील सुभाषचंद्र यांचा स्टेक खरेदी करण्यासाठी बाईंडिंग ऍग्रीमेंट सादर केले. या कन्सॉरशियममध्ये ATAIROS, ब्लॅकस्टोन, आणि ल्युपा सिस्टिम्स हे सदस्य आहेत.

कॅफे कॉफी डेचे श्री सिद्धार्थ हे संस्थापक प्रमोटर बेपत्ता आहेत अशी बातमी आल्यामुळे कॅफे कॉफी डे आणि सिकल लॉजिस्टिक्स ह्या त्यांच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांचे शेअर्स पडले. एक हुशार उद्योगपती पण वेळेआधी भारतात ‘कॅफे कॉफी डे’ चे युग सुरु केल्यामुळे ते अडचणीत आले. ‘खूप प्रयत्न करूनही कंपनी प्रॉफीटमध्ये आली नाही. PE फर्म्सनी शेअर्स बाय बॅक आणण्यासाठी तसेच आयकर खात्याने आपल्यावर खूप प्रेशर आणले ‘ असे त्यांनी शेवटी लिहिलेल्या पत्रात लिहून ठेवले आहे. या बातमीचा परिणाम ज्या बँकांनी या कंपन्यांना कर्ज दिले होते त्या बँकांच्या शेअर्सवर झाला.HDFC बँक आणि कर्नाटक बँक यांनी खुलासा केला की त्यांनी सिद्धार्थ यांच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही कंपन्यांना कर्ज दिलेले नाही.

किंगफा सायन्स, ग्रॅनुअल्स, कल्पतरू पॉवर, चोला इंव्हेस्टमेंट,पिरामल एंटरप्राइझेस,हैडलबर्ग सिमेंट, VIP इंडस्ट्रीज, वेल स्पन इन्डिया ह्या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

प्रिझ्म जॉन्सन या कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकाल ठीक आले. कंपनीने Rs १ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
ऍक्सिस बँकेचा पहिल्या तिमाहीमध्ये नफा Rs १३७० कोटी तर NII Rs ५८५४ कोटी, ऍसेट गुणवत्ता स्थिर आणि NIM ३.४% होते. हे निकाल चांगले होते.

टेक महिंद्रा या कंपनीचे पहिल्या तिमाहीसाठी नफा Rs ९६० कोटी, उत्पन्न Rs ८६५३ कोटी, US $ उत्पन्न US $ १२४.७१ कोटी होते. कंपनीच्या डिजिटल उत्पन्नात ३४.७% वाढ झाली.  IT क्षेत्रातील समस्यांचा विचार करता हे निकाल चांगले आहेत.

बँक ऑफ इंडियाचा पहिल्या तिमाहीसाठी नफा Rs २४० कोटी तर NII Rs ३४८५ कोटी होते. पण GNPA आणि NNPA यांच्यात वाढ झाल्याने ऍसेट गुणवत्ता खालावली त्यामुळे निकाल असमाधानकारकच म्हणावे लागतील.

युनायटेड बँक ही राष्ट्रीयीकृत बँक पहिल्या तिमाहीत तोट्यातून फायद्यात आली. बँकेला Rs १०५ कोटी नफा झाला. ऍसेट गुणवत्तेत थोडी सुधारणा झाली. निकाल ठीक म्हणावे लागतील.

नोसिलचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७३९७, NSE निर्देशांक निफ्टी ११०८५ बँक निफ्टी २८७८१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.