आजचं मार्केट – ३१ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १७ – १८ ऑगस्ट ला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ३१ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६५.१२ प्रती बॅरल ते US $ ६५.३१प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.८५ ते US $१=Rs ६८.९१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.०६ तर VIX १३.६१ होते.

गेल्या १७ वर्षात या वर्षी जुलै हा महिना निफ्टीसाठी खराब महिना ठरला. ट्रम्प यांनी आज सांगितले की USA मधील निवडणुकांपर्यंत ट्रेड डील लांबवू नयेत मी निवडून आलो तर कदाचित हे डील होणारही नाही. त्यामुळे चीनने या वाटाघाटींना वेग आणावा.

आज शेवटी सिद्धार्थ यांच्या दुःखद निधनाची बातमी खरी आहे असे जाहीर झाले. S.V . रंगनाथ यांची कॅफे कॉफी डेचे अंतरिम चेअरमन म्हणून नेमणूक झाली. गेले दोन दिवस कॅफे कॉफी डे आणि सिकल लॉजिस्टक्स हे शेअर्स लो सर्किटवर ट्रेड करत आहेत

३१ जुलै २०१९ रोजी ३ वाजेपर्यंत AFFLE (इंडिया) चा IPO ८६ वेळा ओव्हरसब्सक्राइब झाला.

P & K ( फॉस्फरस आणि पोटॅशियम) फर्टिलायझर्सचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सरकार २०१९-२०२० या वर्षात Rs २२८७५ कोटी सबसिडी दिली जाईल असे सरकारने सांगितले. याचा फायदा मंगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर , NFL या कंपन्यांना होईल.

INVESCO OPPENHEIMER फंडाने झी एंटरटेनमेंटच्या प्रमोटर्सचा ११.५% स्टेक Rs ४२२४ कोटींना खरेदी केला.
कंपन्यांना अलॉट केलेल्या कॅप्टिव्ह (स्वतःच्या वापरासाठी) खाणींचा तीन वर्षांसाठी वापर केला नाही तर ही खाण कंपन्यांकडून काढून घेण्याचा प्रस्ताव सरकारकडे आहे.

सिम्फनी, मोतीलाल ओसवाल, झायडस वेलनेस, SEQUENT सायंटिफिक,हेस्टर बायोसायन्सेस, IOC, फ्युचर रिटेल यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले

महिंद्र हॉलिडेज, BF यूटिलिटीज, नेलकास्ट, कॉर्बोरन्डम युनिव्हर्सल, अपोलो टायर्स, ब्ल्यू डार्ट, आयशर मोटर्स यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल खराब आले.

अलाहाबाद बँक टर्नराउंड झाली. GNPA आणि NNPA यांच्यात किंचित सुधारणा झाली.

OMC कंपन्यांना सरकार पेट्रोल पंपाच्या शेज़ारी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सांगत आहे. पण OMC नी आज सरकारला सांगितले की सध्या EV साठी मागणी नाही. ह्या चार्जींग स्टेशनसाठी खूप भांडवली गुंतवणूक करावी लागेल. यावर्षीच्या अखेरीस सर्व परिस्थितीचा साकल्याने विचार करून या विषयी निर्णय घेऊ असे OMCने सांगितले.

मारुती एर्टिगा (पेट्रोल) चे BSVI व्हर्जन लाँच केली. याची किंमत Rs ७.५४ लाख ठेवली आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७८४१ NSE निर्देशांक निफ्टी ११११८ बँक निफ्टी २६८७६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.