Monthly Archives: August 2019

आजचं मार्केट – ३० ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३० ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ६०.६९ प्रती बॅरल ते US $ ६१.१० प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.५० ते US $ १= Rs ७१.७८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.५६ तर VIX १७.१७ होते.

पुढील आठवड्यात सोमवार २ सप्टेंबर २०१९ रोजी आपल्या सर्वात आवडत्या देवाचे म्हणजे गजाननाचे आगमन घरोघरी आणि सार्वजनिक समारंभात होईल. त्याच्या आगमनासरशी सर्व विघ्ने दूर होऊन आपल्याला संपदा स्वास्थ्य, सुख याची प्राप्ती व्हावी ही शुभेच्छा

आज साप्ताहिक मासिक क्लोजिंग चांगले झाले.आज मार्केट आजच्या लोपासून ५०० पाईंट वाढले. त्याचबरोबर F & O मार्केटमधील सप्टेंबर सिरींजची सुरुवात चांगली झाली. विघ्नहर्त्या गजाननाची चाहूल लागली.

HDFC ने गृहफायनान्समधील आपला ९.२% स्टेक Rs २४३ प्रती शेअर ते Rs २४७ प्रती शेअर या भावाने विकला. कंपनीला या विक्रीतून Rs १६७८ कोटी मिळतील अशी अपेक्षा होती. HDFC ला भरपूर लिक्विडीटी मिळते आहे. गृह फायनान्समधल्या HDFC च्या स्टेकविक्रीची टांगती तलवार नाहीशी झाली. यामुळे HDFC, बंधन बँक, गृह फायनान्स हे सर्व शेअर्स वाढले. सरकारचा जोर पॉवर क्षेत्रावर आहे. विजेचे खांब हल्ली झिंकचे असतात. चांदी हे झिंकचे बायप्रॉडक्ट आहे.हिंदुस्थान झिंक ही कंपनी चांगला लाभांश देते. हिंदुस्थान झिंकचे प्रमोटर अनिल अग्रवाल हे कोल मायनिंगसाठी बोली लावण्याची शक्यता आहे.यामुळे हिंदुस्थान झिंक या शेअरमध्ये तेजी होती. चीन आणि USA यांच्यात पुन्हा बोलणी सुरु होत आहेत. त्यामुळे सर्व मेटल शेअर्स तेजीत होते.

इंडिगो मध्ये चालू असलेल्या दोन प्रमुख प्रमोटर्समधील विवादाबद्दल आज चेअरमननी सांगितले की रेग्युलर किंवा रिलेटेड पार्टीजमार्फत कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. सर्व जुन्या व्यवहारांना ऑडिटर्सने प्रमाणित केले आहे. याबाबतीत आम्ही नवीन आणि परिणामकारक पॉलिसी सेफगार्डस तयार केले आहेत. आम्ही MCA आणि SEBI ला कागदपत्र दिले आहेत. प्रमोटर्समध्ये बोलणी चालू आहेत आणि यातून काही तोडगा निघेल याविषयी आम्ही आशावादी आहोत. कंपनी ग्रोथवर लक्ष केंद्रित करत आहे.

सरप्लस फंड्स ट्रान्स्फर केल्यावर RBI OMO ( ओपन मार्केट ऑपरेशन्स) च्या खरेदीमध्ये कपात करू शकते.

NTPC त्यांच्या कोल बिझिनेससाठी वेगळी सबसिडीअरी बनवणार आहे.

नेस्लेने Rs १० किमतीचे कोटेड वेफरचे पॅकेट लाँच केले.

नीती आयोगाच्या पुढाकाराने स्ट्रॅटेजीक विक्रीवर विचार करण्यासाठी बैठक बोलावली आहे.

IDBI बँक रेपोरेट लिंक्ड घर कर्ज आणि ऑटो कर्जाची योजना १० सप्टेंबर २०१९ पासून लाँच करत आहे

स्पाईस जेटने २५ सप्टेंबरपासून ६ नवी उड्डाणे जाहीर केली.

पहिल्या तिमाही मध्ये GDP मधील ग्रोथ ५% होती. ही २५ महिन्यातील किमान ग्रोथ आहे.

वेंकीज बॅक्टेरिया फ्री एग्ग्ससाठी नवीन युनिट सुरु करणार आहे. वेंकीजच्या काही अंड्यांवर ++ असे चिन्ह असते या अंड्यांचा भाव दुप्पट असतो अशी माहिती मिळते. चिकनचा खप प्रती माणशी वाढत आहे. श्रावण महिना आज संपेल त्यामुळे मद्यार्क आणि चिकन अंडी यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येईल.

आज विश्वप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांचा ८९ वा वाढदिवस होता. या दिवशी आपण त्यांच्या काही विचार जाणून घेऊ. ‘शेअर मार्केटमध्ये पहिला नियम असा आहे की आपली भांडवल सुरक्षित ठेवणे आणि दुसरा नियम हा आहे की पहिल्या नियमाचे वारंवार स्मरण करणे. जेव्हा सर्व लोक खरेदीची शिफारस करत असतील तेव्हा तो शेअर खरेदी करू नका. शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी अतिशय हुशार माणसाची जरुरी नसते. शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी संयम आणि धैर्य यांची जरुरी असते. यशस्वी होण्यासाठी पुस्तके वाचून ज्ञान मिळवणे जरुरीचे आहे. ज्या उद्योगाविषयी आपल्याला पुरेसे ज्ञान नसेल त्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करू नका.’

आज माननीय अर्थमंत्र्यानी बँकांच्या मर्जरविषयी आणि एकंदर बँकिंग उद्योगात सुधारणा आणण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली.

PNB, OBC, युनायटेड बँक यांची एक बँक बनवली जाईल. या तिन्ही बँकांत वापरली जाणारी टेक्नॉलॉजी कम्पॅटिबल आहे. या बँकेच्या ११४३७ शाखा असतील. या बँकेचे नाव PNB असेल.

कॅनरा आणि सिंडिकेट यांचा विलय करून दुसरी बँक बनवली जाईल. या बँकेच्या एकूण मुख्यतः दक्षिण भारतात १०३४२ शाखा असतील. या बँकेचे नाव कॅनरा बँक असेल

युनियन बँक, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक एकत्र करून बँक बनवली जाईल. या बँकेच्या ९६०९ शाखा असतील. या बँकेचे नाव युनियन बँक ऑफ इंडिया असे असेल

इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक एकत्र करून बँक बनवली जाईल. या बँकेचे नाव अलाहाबाद बँक असे असेल.
वरील चार बँका SBI आणि बँक ऑफ बरोडा अशा ६ आणि बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब आणी सिंध बँक, सेंट्रल बँक, युको बँक, IOB, बँक ऑफ इंडिया अशा सहा क्षेत्रीय बँका मिळून आता सार्वजनिक क्षेत्रातील २७ बँकांऐवजी १२ बँका राहतील.
सरकार बँकांना खालीलप्रमाणे भांडवल पुरवेल. युनियन बँक Rs ११७०० कोटी, PNB Rs १६००० कोटी, बँक ऑफ इंडिया Rs ११७०० कोटी, कॅनरा बँक Rs ६५०० कोटी , बँक ऑफ बरोडा Rs ७००० कोटी, IOB Rs ३८०० कोटी, यूको बँकेला Rs २१०० कोटी, सेंट्रल बँकेला Rs ३३०० कोटी,. इंडियन बँक Rs २५०० कोटी, पंजाब आणि सिंध बँक Rs ७५० कोटी.
त्याचबरोबर सरकारने कोणालाही नोकरीवरून काढून टाकण्यात येणार नाही. कोणत्याही कर्मचार्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. असे आश्वासन दिले. ही मर्जर्स करताना दशा दिशा आणि गंतव्य यांचा विचार केला आहे. टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म आणि प्रत्येक बँकेचे वर्ककल्चर कम्पॅटिबल आहेत याचा विचार केला आहे. स्ट्रॉंग बँक आणि WEAK बँक असा विचार केलेला नाही. बँकेची साईझ स्केल आणि डेप्थ यांचा विचार केला आहे.

बँकांमध्ये हुशार आणि कर्तृत्ववान माणसांना आकर्षित करण्यासाठी साजेसा मोबदला दिला जाईल. एक चीफ रिस्क ऑफिसर नेमला जाईल.

मार्केटवर मंगळवारी या घोषणांचा परिणाम विशेषतः बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तात्पुरती तेजी येण्यात कदाचित होईल. पण फार जास्त किमतीला शेअर पोहोचला असेल तर खरेदी करु नका कारण या घोषणांमुळे बँकांच्या फंडामेंटल्समध्ये काहीही फरक पडलेला नाही. जरी काही शेअर्स खरेदी केले तरी दिवस अखेरीस ते विकून प्रॉफिट/लॉस बुक करा. अन्यथा वरच्या किमतीत खरेदी केलेले शेअर्स तुमच्याकडे पडून राहण्याची शक्यता आहे. गेल्यावेळच्या बँकांच्या रिकॅपिटलायझेशनच्या वेळी असाच अनुभव आला होता.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७३३२ NSE निर्देशांक निफ्टी ११०२३ बँक निफ्टी २७४२७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २९ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २९ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ६०.११ प्रती बॅरल ते US $ ६०.४४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.७२ ते Rs ७२.०३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.१७ होता. VIX १६.९० वर होता. चिनी युआन US $१= ७.१७२९ होता.

आजपर्यंत आपण USA- इराण, USA- चीन, चीन- हाँगकाँग, UK मधील ब्रेक्झिट आणि UK च्या पंतप्रधानांनी बरखास्त केलेली संसद या विविध ठिकाणी असणाऱ्या जिओ पोलिटिकल ताणतणाव यांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि देशावर आणि पर्यायाने शेअर मार्केटवर काय परिणाम होईल याची चर्चा करत होतो. पण आता हेच जिओ पोलिटिकल ताणतणाव अगदी आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत.

पाकिस्तानच्या एका मंत्र्यानी घोषणा केली की पाकिस्तान आणि भारताचे ऑक्टोबर नोव्हेंबर २०१९ मध्ये युद्ध होईल. त्यातच भर म्हणून आज कांडला पोर्टवर आतंकवादी हल्ला होण्याची शक्यता जाहीर झाली आहे अडानी पोर्टने मुंद्रा पोर्टला ऍडव्हायझरी जारी केली आहे.

गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील सर्व बंदरांमध्ये धोक्याचा इशारा दिला आहे.

शेअरमार्केट किंवा कोणत्याही मार्केटला राजकीय. सामाजिक अस्थिरता आवडत नाही. मार्केट हाव आणि भीती या दोन जबरदस्त भावनांवर चालते. त्यामुळे भारताच्या माथ्यावर घोंगावत असलेल्या युद्धाच्या ढगांची भीती मार्केटला आणखी किती खाली खेचते हे बघावे लागेल.

२७ सप्टेंबर २०१९ पासून इंडिया बुल्स हौसिंग निफ्टीमधून बाहेर पडेल आणि नेस्लेचा शेअर निफ्टीमध्ये समाविष्ट होईल. २६ सप्टेंबरपासून रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स कॅपिटल, DHFL हे शेअर्स F & O मार्केटमधून बाहेर पडतील.

लक्ष्मी विलास बँकेचे CEO पार्थसारथी मुखर्जी यानी राजीनामा दिला. ३० ऑगस्ट २०१९ हा त्यांच्या कार्यकालाचा शेवटचा दिवस असेल.

कमर्शियल कोल मायनिंगसाठी १००% FDI ला सरकारने मंजुरी दिली.

शुगरसाठी ठरल्याप्रमाणे Rs ६२०० कोटी सबसिडीअरी मंजूर झाली. पण ही सबसिडी शुगरमीलला न मिळता थेट शेतकऱ्यांना मिळेल.

व्होल्टासला मुंबई मेट्रोकडून Rs २३३ कोटींची ऑर्डर मिळाली.

C G पॉवरचे चेअरमन गौतम थापर यांना त्यांच्या पदावरून हटविण्यासाठी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी परवानगी दिली. ही कारवाई शेअरहोल्डर्स आणि कंपनीचे हित लक्षात घेऊन केली असे जाहीर केले. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरमध्ये किंचित तेजी आली.

सरकार आता डायव्हेस्टमेन्टवर पुरा जोर देणार आहे. इंटरमिनिस्टरीयल समिती यावर विचार करत आहे. BEL, IRCON, SJVN, MOIL, RITES, NBCC या कंपन्या सरकारच्या डायव्हेस्टमेन्टच्या लक्ष्यावर आहेत. ही डायव्हेस्टमेन्ट शेअर बायबॅक प्रक्रियेच्या माध्यमातून केली जाईल. बायबॅकची साईझ आणि वेळ ही लवकरच निश्चित केली जाईल.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सिमेंटच्या किमतीमध्ये प्रती बॅग Rs ४० ते Rs ५० च्या दरम्यान दरवाढ करण्यात आली. या दरवाढीचा फायदा इंडिया सिमेंट, सागर सिमेंट, रामको सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांना होईल.

सूर्या रोशनी या कंपनीला IOC कडून Rs ८९ कोटींची ऑर्डर मिळाली त्यामुळे हा शेअर वाढला.

१ सप्टेंबर २०१९ हा दिवस महत्वाचा ठरणार आहे त्या दिवशीपासून चीनने जाहीर केलेली USA मधून होणाऱ्या US $७५ बिलियन आयातीवर वाढीव ड्युटी लागू होईल, आणी USA ने चीनमधून होणाऱ्या US $ ३०० बिलियन आयातीवर वाढीव ड्युटी लागू होईल.

१ सप्टेंबर २०१९ पासून मार्जिनट्रेडिंग विषयी सेबीने केलेले नवीन नियम लागू होतील. त्या आधी सेबीने ब्रोकर्स, ट्रेडिंग मेम्बर्सना त्यांच्याजवळ असलेल्या किंवा त्यांनी तारण ठेवलेल्या सर्व पार्टली पेड शेअर्सचा बॅलन्स क्लिअर करायला सांगितला आहे. त्यामुळे ३१ ऑगस्ट २०१९ रोजी म्हणजे उद्या मार्केटमध्ये उदाहरणादाखल येस बँक, इंडिया बुल्स हाऊसिंग, RIL, L & T, तसेच मारुती या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये जोरदार विक्री होण्याची शक्यता आहे.
NSE ने आज काही तांत्रिक अडचणींमुळे डेरिव्हेटीव्ह डेटाची भाव कॉपी प्रसिद्ध केली नाही. त्यातून आज मंथली एक्स्पायरीचा दिवस. आज झीरोदा या ब्रोकिंग हाऊसची ऑन लाईन साईट काही वेळ बंद होती. त्यामुळे शेअर्समध्ये विशेषतः F &O सेगमेंट ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेडर्सची गैरसोय झाली.

RBL बँकेच्या व्यवस्थापनाने खुलासा केला की सेबीने घालून दिलेल्या नियमानुसार कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर काम करते. आमची बँक ही प्रोफेशनली मॅनेज्ड बँक आहे. जे स्टाफला ESOP दिलेले आहेत त्यासंबंधातील नियम स्टाफवर बंधनकारक आहेत. या नियमांचा भंग करून कोणीही शेअर्स विकलेले नाहीत. या व्यवस्थापनाच्या स्पष्टीकरणानंतर बँकेचा शेअर पुन्हा वाढावयास सुरुवात झाली.

सरकार आता सार्वजनिक क्षेत्रातील प्रत्येक सरकारी बँकेला किती कॅपिटलायझेशनची जरूर आहे याचा शोध घेत आहे. मार्केटने आज बँक निफ्टीमधील शेअर्समध्ये जोरदार विक्री केली.

IIFL वेल्थ ही L & T फायनान्सचा वेल्थ मॅनेजमेंट बिझिनेस खरेदी करणार आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७०६८ NSE निर्देशांक निफ्टी १०९४८ बँक निफ्टी २७३०५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २८ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २८ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ५९.८६ प्रती बॅरल ते US $ ६०.२३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=Rs ७१.५८ ते US $१= Rs ७१.८६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.१० होता तर VIX १६.२६ होता.

चीन आणि USA यांच्यातील ट्रेड वॉर आता आणखी तीव्र झाले. ट्रम्पनी सांगितले की वाटाघाटींसाठी चीनमधून फोन आला होता. पण चीनने मात्र आमच्याकडून कोणी USA मध्ये अशाप्रकारचा फोन केला नव्हता असे सांगितले.

‘जगत’ हा तांदुळाचा ब्रँड आहे. त्याच्या प्रमोटरला पकडले आहे. हा ब्रँड असलेली कंपनी लिस्टेड नाही याचा फायदा तांदुळाची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना होईल. गल्फ देशांबरोबर फ्री ट्रेड करार होण्याची शक्यता आहे. यामुळे या देशांना होणाऱ्या तांदुळाच्या निर्यातीत वाढ होईल.

रेल्वे ऑथॉरिटीज सप्टेंबरपासून ऑर्डर द्यायला सुरुवात करतात. त्याचा फायदा RVNL आणि RITES या कंपन्यांना होईल.
चीनमध्ये जनरिक औषधांच्या संबंधात एक बिल पास झाले आहे. याचा फायदा DR रेड्डीज या कंपनीला होईल.

कमर्शियल कोल मायनिंग, सिंगल ब्रँड रिटेल, डिजिटल मीडिया, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग यामधील विदेशी गुंतवणूकीवर आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत विचार होईल. याचा तोटा कोल इंडिया तर फायदा CANTABIL, ट्रेंट, HT मीडिया, बालाजी टेली, झेई मीडिया अशा कंपन्यांना होईल.

ऑटो सेक्टरची समीक्षा केली जाईल. सध्या घेतलेल्या निर्णयांचा ऑटो क्षेत्रावर काय परिणाम होतो आहे हे पाहावे लागेल. आणि गरज भासल्यास आणखी उपाय योजावे लागतील.

GST संबंधात असलेल्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करू असे अर्थमंत्र्यानी सांगितले.

फिलिप मॉरीस आणि ALTRIA यांच्या मर्जरची बातमी आहे. या दोन कंपन्यांचे US $ २०००० कोटीं मध्ये मर्जर होईल. फिलिप मॉरीसचा गॉडफ्रे फिलिप्समध्ये २५.१% स्टेक आहे. जर हा स्टेक वाढला तर गॉडफ्रे फिलिप्स मध्ये ओपन ऑफर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॉडफ्रे फिलिप्सचा शेअर वाढत होता.

अफोर्डेबल हौसिंगच्या व्याख्येत महत्वाचे बदल केले जाणार आहेत. याचा फायदा ब्रिगेड इंटरप्रायझेस यासारख्या कंपन्यांना होईल.

सोने आणि चांदीचे दर कमाल स्तरावर आहेत. इक्विटी मार्केटमध्ये मंदी असते तेव्हा कमोडिटी मार्केटमध्ये व्हॉल्युम वाढतात. याचा फायदा MCX ला होत आहे. म्हाणून या कंपनीचा शेअर वाढत आहे.

तळवलकर्स या कंपनीचे स्टॅटयूटरी ऑडिटर M K दांडेकर आणि कंपनी यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाने आमच्या क्वेरीजना समाधानकारक प्रतिसाद दिला नाही म्हणून राजीनामा दिला. या शेअरला लोअर सर्किट लागले.

सरकारने ६० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. Rs १०.५० प्रती किलो या दराने साखरेसाठी सबसिडी मिळेल. प्रमोशन आणि मार्केटिंगवर जोर असेल. सरकार Rs ६००० कोटींचे पॅकेज मंजूर करण्याची शक्यता आहे.
IOC सिटी गॅस प्रोजेक्टमध्ये ८ वर्षांत Rs १०००० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

कल्पतरू पॉवर या कंपनीला बोली लावताना नियमांकडे दुर्लक्ष केले म्हणून वर्ल्ड बँकेने नोटीस पाठवली आहे. कंपनीने आम्ही या नोटिसीला उत्तर पाठवू असे सांगितले.

सरकारचा असा विचार आहे की वीज कंपनीच्या ग्राहकाला आपण कोणत्या वीज कंपनीकडून वीज घ्यावी हे ठरवण्याचे आणि प्रसंगी ही कंपनी बदलण्याचे स्वातंत्र्य असावे.म्हणून सरकार आवश्यक ते बदल करत आहे.

आयकरासाठी नेमलेल्या टास्क फोर्सने आज आपल्या शिफारशी सरकारला सादर केल्या. आयकरासाठी असलेली रिबेटची सीमा सध्याच्या Rs ५ लाखांवरून Rs ६.२५ लाखापर्यंत वाढवावी. पण करमुक्त उत्पन्नाची मर्यादा मात्र Rs २.५ लाखच ठेवावी. Rs २.५ लाख ते Rs १० लाख उत्पन्नावर १०% , तर Rs १० लाख ते Rs २० लाख उत्पन्नावर २०% आयकराचा रेट ठेवावा. सुझुकीने आपल्या कंपनीत ४.९% स्टेक टोयोटा या कंपनीने घेण्यासाठी करार केला.

मूडीजने येस बँकेचे लॉन्ग टर्म रेटिंग कमी केले आणि आउटलूक निगेटिव्ह केला. रेटिंग Ba१ वरून Ba३ केले.
RBL बँकेच्या शेअरची पडझड थांबायचे नाव काढत नाही. आज हा शेअर लिस्टिंग डेच्या हायपेक्षाही कमी पातळीवर आला. आज या बँकेच्या व्यवस्थापनाने आपला होलसेल लोन पोर्टफोलिओचा गायडन्स कमी केल्यामुळे शेअर पडतच राहिला.

रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ने कॉफी डे च्या AGM ची तारीख (३० सप्टेंबरला ही AGM होणार होती) पुढे ढकलायला परवानगी दिली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७४५१ NSE निर्देशांक निफ्टी ११०४६ बँक निफ्टी २७८०४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २७ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ५८.८९ प्रती बॅरल ते US $ ५९.०३ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.६७ ते US $१=Rs ७१.८६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.९० आणि VIX १६.४० होते.

रिझर्व्ह बँकेने दिलेले Rs १.७६ लाख कोटी देशाच्या कन्सॉलिडिटेड फंडात जमा करून त्याचा विनिमय अंदाजपत्रकातील तरतुदीसाठी करण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले.

HDFC लाईफ आजपासून MSCI निर्देशांकामधे समाविष्ट केला जाईल. आणि युनियन बँक ऑफ इंडिया आणि शारदा क्रॉपकेम हे बाहेर पडतील

NSE त्यांच्या F & O सेगमेंटमधून स्ट्राइड्स फार्मा या कंपनीला १ नोव्हेंबर २०१९ पासून बाहेर काढेल.

मारुती CNG कार्सचे उत्पादन ५०% वाढविण्याची योजना आखत आहे. भारतात इलेक्ट्रिक व्हेइकलचे टेस्टिंग सुरु आहे असे सांगितले. पुढच्या वर्षीपासून तिसऱ्या प्लांटमध्ये काम सुरु होईल. या वर्षाच्या अखेरीपर्यंत डिझेल कार्सचे उत्पादन बंद करण्यात येईल असे कंपनीने सांगितले. ब्रेझा आणि अर्टिगा याची पेट्रोल व्हर्जन चालू ठेवणार आहेत.

GSTN च्या प्रक्रियेचा अर्थमंत्री आढावा घेतील. आणि रिफंडची प्रक्रिया सरळ आणि जलद बनविण्यावर विचार करण्यात येईल.

स्पाईस जेट आता स्वदेशातील उड्डाणांसाठी स्वस्त योजना लाँच करत आहे. Rs १२९९ मध्ये स्वदेशात प्रवास करण्याची योजना लाँच करत आहे.

DGTP ने मलेशियातून आयात होणाऱ्या पामतेलावर ५% सेफगार्ड ड्युटी लावण्याची शिफारस केली.

आज इन्फोसिसने आपली शेअर बाय बॅक योजना बंद केली. कंपनीने ११०५.१९ लाख शेअर्स सरासरी किंमत Rs ७४७.३८ या भावाने बाय बॅक केले या बायबॅकसाठी Rs ८२५९.९९९९ कोटी बायबॅक वर खर्च केले. त्यामुळे कंपनीने ही मार्च २०१९ पासून सुरु असलेली Rs ८२६० कोटींची शेअर बायबॅक योजना २६ ऑगस्ट २०१९ पासून बंद केली.

V G सिद्धार्थ यांच्या दुखःद निधनानंतर RBL बँकेच्या ऑफिसर्स आणि स्टाफने त्यांच्या जवळ असलेले शेअर्स विकून टाकले. RBL बँकेने V G सिद्धार्थ यांच्याशी संबंधित असलेल्या लॉजिस्टिक, कॉफी, आणि रिअल इस्टेट बिझिनेसला लोन दिली होती. या स्टाफ आणि ऑफिसर्सनी केलेल्या विक्रीमुळे RBL बँकेचा शेअर या निधनानंतर १३% पडला होता.
‘एक वेळ अशी येते की कंपनी आपल्या प्रमोटर्सपेक्षा मोठी होते आणि आपल्या पायावर उभी राहते’ हे विधान आहे इंडीगोचे एक प्रमुख प्रमोटर राहुल भाटिया यांचे. राहुल भाटिया आणि गंगवाल या दोन प्रमुख प्रमोटर्समध्ये रस्सीखेच चालू असताना त्याचा परिणाम कंपनीच्या बिझिनेसवर झाला नाही ही पार्श्वभूमी या विधानामागे आहे. कंपनीचा बिझिनेसही वाढला आणि कंपनीच्या शेअर्सचा भावही वाढला.

आज सरकारने कोरियामधून आयात होणाऱ्या CPVC वर डम्पिंग ड्युटी बसवली. याचा फायदा ASTRAL पॉली, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, सुप्रीम इंडस्ट्रीज या कंपन्यांना होईल.

आज HUL ने आपल्या काही प्रॉडक्टसच्या किमतीत कपात केली. लक्स साबण २५.९%, लाईफबॉय २८.६%, डोव्ह २०%, रिन १५% यांच्या किमतीत याप्रमाणे कपात केली.

क्लोजअपची नवीन टूथपेस्ट लाँच केली. तर वॅसेलीनचे ५ नवीन स्किन केअर प्रोडक्ट लाँच केले.

ONGC विदेश कझाकस्थान ब्लॉक मधून बाहेर पडणार आहे.

एक रिपोर्ट प्रमाणे भारतामध्ये बिस्किटाऐवजी लोकांची आवड कुकीजकडे जास्त झुकत आहे. ब्रिटानिया या कंपनीने नुकताच कुकीजच्या मार्केट मध्ये प्रवेश केला आहे.

सिप्लाच्या इंदोर प्लाण्टला UK रेग्युलेटरी ऑथॉरिटीने क्लीन चिट दिली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७६४१ NSE निर्देशांक निफ्टी १११०५ बँक निफ्टी २८१२६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २६ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २६ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ५८.७१ प्रति बॅरल ते US $ ५९.३४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=७१.९४ ते US $१= Rs ७२.२३ या दरम्यान होता. US $ निर्देशांक ९७.६८ तर VIX १७.५० होता.

भारताचे अर्थमंत्री तसेच इतर खात्याचे मंत्री असलेले धुरंधर आणि समन्वयांत विश्वास ठेवणारे राजकारणी, तज्ज्ञ वकील तसेच एक अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्ता लाभलेले असे अरुण जेटली यांचे निधन झाले. त्यांना भावपूर्वक आणि आदराने श्रद्धांजली वाहून आजचा ब्लॉग सुरु करूया

आज रुपया घसरला आणि US $१=Rs ७२ च्या स्तराला पोहोचला. तसेच चीनची करन्सी युआन ही ११ वर्षांच्या किमान स्तरावर होती.

आज जागतिकीकरण म्हणजे काय आणि याचा प्रत्येक देशाच्या अर्थकारणावर काय परिणाम होतो याचे उत्तम उदाहरण पाहावयास मिळाले. आज भारताच्या माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या विविध निर्णयांमुळे मार्केट तेजीत राहील असा सर्वांचा अंदाज होता. त्याप्रमाणे मार्केट ओपन झाले ही तेजीत निफ्टी ११००० या स्तरावर होता. पण बातमी आली की USA चे अध्यक्ष यांनी चीनमधून आयात होणाऱ्या US $ २५० बिलियन किमतीच्या मालावरील ड्युटी २५% वरून ३०% केली. या बातमीसरशी तेजीत ओपन झालेले भारतीय मार्केट धडाधड पडू लागले आणि शुक्रवारपेक्षाही मंदीत गेले. त्यावेळेस मार्केट निफ्टी १०७५६ पर्यंत पोहोचले. तेवढ्यात बातमी आली की ट्रम्प यांनी आता अशी घोषणा केली की चीनबरोबर अजून वाटाघाटी करायला लागतील. मार्केटने हा धागा पकडला आणि ट्रम्प यांचा ट्रेडवॉर मधील पवित्रा थोडा सौम्य झाला असे समजून मार्केटमध्ये तेजी परतली आणि ती शेवटपर्यंत टिकली.मार्केटने ११०७० निफ्टी गाठला. आणि ११०५७ निफ्टीचा क्लोज दिला. या मुळे बुलिश PIN BAR पॅटर्न तयार झाला.

शुक्रवारी PIERCING लाईन पॅटर्न तयार झाला होता. हा बुलिश रीव्हर्सल पॅटर्न समजला जातो. गुरुवार आणि शुक्रवारच्या मार्केटच्या स्थितीवरून हे लक्षात येते. गुरुवारी CEA (चीफ इकॉनॉमिक एडव्हायझर) नी सांगितले की तेजी आणी मंदी मार्केटमध्ये आणि बिझिनेसमध्ये येणारच. प्रॉफिट इज पर्सनल आणि लॉस मात्र सोशल असे सांगितल्यामुळे जखमेवर मीठ चोळल्यासारखे होऊन मार्केट पडले होते.

पण शुक्रवारी दिवसभर सांगण्यात आले की संध्याकाळी अर्थमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही महत्वाच्या घोषणा करणार आहेत.त्यामुळे दिवसभर मार्केट तेजीत राहिले. गुरुवारी झालेला बराचसा लॉस भरून निघाला. ६०% ते ६५% मार्केट रीट्रेस झाले. PIERCING लाईन पॅटर्न तयार झाला. हा बुलिश रिव्हर्सल पॅटर्न तयार झाला.म्हणजेच २ दिवस पाठोपाठ तेजीचे पॅटर्न तयार झाले त्याचबरोबर अर्थमंत्र्यानी जाहीर केलेल्या सवलती हा मूलभूत बदल झाला आणि अजूनही काही सवलती दिल्या जाणार आहेत असे सांगितले आहे. यामुळे ही तेजी अल्पमुदतीसाठी चालू राहील.

अर्थात चीनने असे उत्तर दिले की आम्ही USA च्या दबावाखाली झुकणार नाही. आम्ही आमच्या देशाच्या हिताचे रक्षण करू. तसेच आम्ही USA ऐवजी दुसरा पार्टनर शोधू असे सांगितले.

युनिकेम लॅबच्या गाझियाबाद युनिटच्या USFDA ने केलेल्या तपासणीत १ त्रुटी दाखवली.

CBIC (सेंटर बोर्ड ऑफ इन्डायरेक्ट टॅक्सेस आणि कस्टम) भ्रष्टाचाराच्या आपल्या २२ सिनियर अधिकाऱ्यांवर कारवाई केली.

स्वदेशी गॅस कंपन्या गॅस क्षेत्रात Rs ५ लाख कोटींची गुंतवणूक करतील.

NCLT कडून PVR मध्ये ‘SPI सिनेमाज’ चे मर्जर करायला मंजुरी मिळाली.

स्पाईस जेटने स्वस्त परदेशी उड्डाणांची योजना लाँच केली. आता तुम्ही Rs ३९९९ मध्ये परदेशी जाऊ शकाल.

दिलीप बिल्डकॉनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी ५ रोड प्रोजेक्टमधील कंपनीची हिस्सा विकण्यासाठी मंजुरी दिली
RBI ने सरकारला Rs १.७६ लाख कोटी लाभांश म्हणून देण्याचे ठरवले आहे.

टाटा मेटॅलिक्सचे खडगपूर युनिट ३ दिवस रिपेरिंगसाठी बंद राहील.

HDFC म्युच्युअल फंडाने TNPL मध्ये २.५% स्टेक खरेदी केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७४९४ NSE निर्देशांक निफ्टी ११०५७ बँक निफ्टी २७९५१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २३ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २३ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ५९.८४ प्रती बॅरल ते US $ ६०.२५ पराते बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.५७ ते US ७१.९९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.३३ आणि VIX १७.४३ होते.

सर्व वाचकांना दही हंडीच्या शुभेच्छा. अर्थमंत्र्यानी सर्व अडचणी आणि तक्रारी दूर केल्यामुळे दही हंडीचा मनसोक्त आनंद लुटा.

एडेलवाईस फायनान्सने कोहिनूरला बँकांनी दिलेले आणि NPA झालेले कर्ज आपल्या ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत Rs १२० कोटींना खरेदी केले. ED ने चालू केलेल्या IL & FS च्या चौकशीत ह्या कर्जाचा उल्लेख आल्यामुळे ह्या कंपनीचा शेअर पडला.

पॉवर सेक्टर मधील NPA कमी करण्यासाठी पॉवर मंत्रालय नवीन योजना तयार करत आहे.

नोव्हेंबर २०१८ ते ऑगस्ट २०१९ या काळात मारुतीने ४०६१८ वॅग्नर गाड्या फ्युएल होज मध्ये गडबड असल्यामुळे परत मागवल्या.

आज माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली.त्यांनी सांगितले की जागतिक अर्थव्यवस्थेचा GDP ग्रोथ रेट ३.२% आहे. जगात सर्वत्रच कंझम्पशन कमी होत आहे. भारतातील GDP ग्रोथचा रेट चांगला म्हणता येईल. अर्थमंत्र्यानी आम्ही वेल्थ क्रिएटर्सचा आदर सन्मान केला पाहिजे हे पंतप्रधानांचे वाक्य आणि ‘इझ ऑफ बिझिनेस’ आणि ‘इझ ऑफ लिविंग’ या घोषणांचा आम्ही आदर करतो आणि त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे सांगितले. त्यात खालील पॅकेज जाहीर केले.

(१) सरकारने आयकरा मध्ये केलेल्या सुधारणांवर जोर दिला. FACELESS असेसमेंट, सेंट्रलाइज्ड इशू ऑफ नोटीस,समन्स, ऑर्डर्स तसेच प्रत्येक आयकर खात्याकडून येणाऱ्या कम्युनिकेशनला डॉक्युमेंट इडेंटिफिकेशन नंबर असेल, आता प्रत्यक्ष तपासणी हा अपवाद असेल. सरकारने असे सांगितले की कॉर्पोरेट जगतामध्ये घडणाऱ्या नियमांचे उल्लंघन आता क्रिमिनल न समजता सिव्हिल मॅटर समजली जाईल. सरकार आता प्रॉसिक्युशनकडून पेनल्टीकडे संक्रमण करत आहे.

(२) FPI ला होणाऱ्या लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्सवरील सरचार्ज मागे घेतला. स्वदेशी गुंतवणूकदारांवरील सरचार्ज ही मागे घेतला.

(३) बँकांना अपफ्रंट Rs ७०००० कोटी भांडवल दिले जाईल. आणखी Rs ५ लाख कोटी टप्प्या टप्य्याने दिले जातील. बॅंक्स आता RBI ने केलेले रेट कट सर्व कर्जदारांना पास ऑन करतील. कारण आता बँकांचे व्याजदर रेपोरेटशी संलग्न केले जातील. कर्जाची परतफेड केल्यावर बँकांनी आता तारण म्हणून ठेवलेली डॉक्युमेंट्स १५ दिवसात परत केली पाहिजेत. आता आपण आपल्या कर्जासाठी केलेल्या अर्जाच्या प्रक्रियेचा पाठपुरावा ऑन लाईन करू शकता.

(४) सरकार SME ची एक व्याख्या निश्चित करेल SME ना आतापर्यंत न मिळालेले GST रिफंड ३० दिवसाच्या आत दिले जातील. आणि नवीन रिफंड ६० दिवसाच्या आत दिले जातील. SME साठी OTS(वन टाइम सेटलमेंट) चा निर्णय एक्सपीडाइट केला जाईल. हा निर्णय बॉक्स टिक करून घेतला जाईल. थोडक्यात आता हा निर्णय ऑब्जेक्टिव्ह असेल

(५) त्यांनी ऑटो सेक्टरसाठी खालील घोषणा केल्या

३१/०३/२०२० पर्यंत खरेदी केलेली BS4 वाहने त्यांचा रजिस्ट्रेशन पिरियड संपेपर्यंत उपयोगात आणता येतील.
वाहनांच्या वन टाइम रजिस्ट्रेशन फीमध्ये केलेली वाढ जून २०२० पर्यंत स्थगीत ठेवली जाईल.
सरकारी डिपार्टमेंट आणि CPSE यांच्यावर नवीन वाहन खरेदी करण्यावर(जुनी वाहने रिप्लेस करण्यासाठी) असलेले निर्बंध रद्द केले.
आता खरेदी केलेल्या वाहनांवर मार्च २०२० पर्यंत १५% अधिक डेप्रीसिएशन क्लेम करता येईल. म्हणजे मार्च २०२० पर्यंत आपल्याला ३०% डेप्रीसिएशन क्लेम करता येईल.
५) जुन्या गाड्यांच्या वापरातून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी स्क्रॅपेज पॉलिसी अमलात आणण्यात येईल. या बाबतीत सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले जाईल.

(६) सरकारी खाती आणि CPSE कडून जर कंपन्यांना केलेल्या कामासाठी पैसे येणे असतील तर त्यांचे पैसे ताबडतोब दिले जातील.

(७) NHB ला Rs ३०००० कोटी दिले जातील.

(८)सरकारने IBC आणि DVR च्या नियमांमध्ये सुधारणा केल्या.

(९) सरकारने आता डीमॅट अकौंट आणि म्युच्युअल फंड खरेदी करण्यासाठी ‘आधार’ वर आधारित KYC लागू होईल.असे सांगितले. आता NBFC बँक ऑथेंटिकेटेड आधार बेस्ड KYC वापरू शकतील.

(१०) दीर्घ मुदतीच्या फायनांससाठी एक संस्था स्थापन केली जाईल. ही संस्था इन्फ्रास्ट्रक्चर आणि हौसिंग प्रोजेक्टसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज देईल.

(११) NBFC आणि HFC आणि लिस्टेड कंपन्यांना आता आऊटस्टँडिंग डिबेंचर्ससाठी डिबें न्चर रिडम्प्शन फंड ठेवावा लागणार नाही.

(१२) बँकेत घेण्यात येणाऱ्या कमर्शियल डिसिजनसाठी बँका आपल्या इंटर्नल अडवायझरी कमिटी नेमतील. ही कमिटीने घेतलेलया निर्णयांचे व्हिजिलन्स आणि नॉनव्हिजिलन्स असे वर्गीकरण करेल. या कमिटीचा निर्णय अंतिम असेल.

(१३) सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँका आणि NBFC यांनी संयुक्तरित्या अंतिम ग्राहकाला सेवा द्यावी.

सरकार आपल्याकडून लेबर रिफॉर्म्स चालू ठेवील . पर्यावरण क्लिअरन्स लवकर मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील राहील.
८-८ दिवसांच्या अंतराने दोनदा अर्थमंत्री काही निर्णय जाहीर करतील असे त्यांनी सांगितले.

या सगळ्या अर्थमंत्र्यांनी केलेल्या निवेदनामुळे मार्केटमधील मंदी संपेल. सोमवारपासून तेजी सुरु होईल. यामुळे सर्वांना आनंद झाला. जणू काही दहीहंडीचा प्रसादच मार्केटला मिळाला. त्यामुळे ट्रेडर्स गुंतवणूकदार आता आनंदाने दही हंडी साजरी करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६७०१ NSE निर्देशांक निफ्टी १०८२९ बँक निफ्टी २६९५८ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २२ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २२ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ६० प्रती बॅरल ते US $ ६०.४७ प्रती बॅरल या दरम्यान तर रूपया US $१=Rs ७१.६४ ते US $ १= Rs ७१.९१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.१७ तर VIX १८.१२ होते.

मार्केटच्या आकाशात सर्व बाजूनी अंधार झाला आहे. जागतिक मंदीचे सावट, USA आणि चीन यांच्यात चालू असलेले ट्रेड वॉर, अंदाजपत्रकातील जादा सेसमुळे FPI करत असलेली धुवाँधार विक्री, रुपयाची घसरण, ग्रामीण आणि अर्धशहरी भागात कमी होत जाणारी मागणी आणि त्यामुळे कंपन्यांनी प्लांट बंद करणे किंवा कामगारांना काढून टाकणे, दिवसेंदिवस कमी होणारी गुंतवणूक आणि GDP ग्रोथचा रेट. या सगळ्या अंधारात सरकारकडे विविध उद्योग एका सवलतींच्या पॅकेजची अपेक्षा करत आहेत. सरकार काही हस्तक्षेप करून आपल्या उद्योगासाठी आणि शेअर मार्केटसाठी काही सूट सवलती, सोयी जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. पण सरकार सर्व उद्योगांशी बोलणी करत आहे आमचा स्टिम्युलस पॅकेजवर विचार चालू आहे अशी घोषणा करत आहे. आजचे चीफ इकॉनॉमिक सल्लागारांचे निवेदन म्हणजे पाऊस पडण्याऐवजी डोक्यावर वीज कोसळावी या प्रकारचे होते. त्यांनी सांगितले की ‘प्रॉफिट झाले तर तुमचे आणि लॉस झाला तर मात्र समाजाचा’ असे होऊ शकत नाही. करदात्यांचा पैसा वापरताना फार विचार करूनच वापरावा लागेल.तेजी आणि मंदी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या चीफ इकॉनॉमिक सल्लागारांच्या निवेदनानंतर मार्केट पडण्याची गती वाढली आणि ते पडतच राहिले. त्यातच पंतप्रधान परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे दौऱ्यावरून आल्याशिवाय पॅकेजविषयी निर्णय होणे कठीण आहे मार्केट एक तर अती निराशा किंवा अवास्तव अपेक्षा यांच्या आहारी नेहेमीच जात असते .

पंतप्रधान फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात संरक्षणविषयी काही करार होण्याची शक्यता आहे त्यामुळे सरंक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्या या पडझडीतही टिकून होत्या. उदा BEL

टाटा स्पॉन्जचे नाव आता ‘टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्ट्स’ असे होईल.

LIC हाऊसिंगमधील शेअर्स ३% ते ८% डिस्काऊंटवर FIDELITY ने विकले हे शेअर्स Rs ४२५ ते Rs ४४९ प्रती शेअर या भावाने विकले.

स्टील कंपन्यांनी २५% सेफगार्ड ड्युटी लावण्याची सरकारला विनंती केली. पण सरकारने ती मान्य केली नाही.
केरळमध्ये कच्च्या रबराचे उत्पादन होते. ओणमचा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. पण यावेळेला आलेल्या पुरामुळे सणासुदीच्या काळात कार्स, ज्युवेलरी यांची मागणी कमी असेल. पूर परिस्थितीमुळे घरांचे नुकसान झाल्यामुळे सिमेंट आणि बिल्डिंग मटेरिअल्सची मागणी वाढेल.

कर्नाटक सरकारने NMDC कडून दोनीमलाई खाणीचे लायसेन्स परत घेतले. सरकार या खाणीचा पुन्हा लिलाव करणार होते. पण कोर्टाने त्याच्यावर स्टे दिला.

राणा कपूरच्या कंपनीने तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले. म्युच्युअल फंडांचे Rs ७९० कोटींचे कर्ज फेडले.
सरकारने MTNL आणि BSNL च्या मर्जरला मंजुरी दिली नाही.

L & T ला सौदी आरामको कडून Rs २५०० कोटी ते Rs ५००० कोटींच्या दरम्यानचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

सुप्रीम कोर्टाकडून DLF या कंपनीला डिस्क्लोजर्स संबंधात नोटीस मिळाली असे कंपनीने सांगितले. हरयाणामधील ५-६ एकर जमिनीसंबंधात झालेल्या कायदेशीर कार्रवाईविषयी माहिती दिली नाही. कंपनीने सांगितले की QIP करताना सर्व डिस्क्लोजर दिलेली आहेत. कंपनी सुप्रीम कोर्टाच्या या नोटिसीलाही योग्य ते उत्तर पाठवेल असे कंपनीने सांगितले. DLF चा शेअर खूप पडला.

अडाणी पोर्ट येत्या ६ वर्षात Rs १७५०० कोटींची गुंतवणूक करेल.

ITC ने FABELLE चॉकोलेट बारचे चार नवीन प्रकार लाँच केले. ITC ने त्यांना कॅफे कॉफी डे मध्ये स्वारस्य आहे या बातमीचा इन्कार केला.

IRCTC ने २ कोटी शेअर्सच्या IPO साठी अर्ज केला.

ल्युपिन ही फार्मा क्षेत्रातील कंपनी त्यांचा जपानमधील INJECTABLE बिझिनेस विकणार आहे.

अडाणी ग्रीनने राजस्थानमध्ये १०० MV चा सोलर एनर्जी प्लांट सुरु केला.

ग्रनुअल्सच्या USA सबसिडीअरीच्या तपासणीत USFDAला २ त्रुटी मिळाल्या.

PMO ने आयकर खात्याला स्टार्टअपच्या संबंधातील टॅक्सविषयीचे विवाद लवकर निपटायला सांगितले. तसेच स्टार्टअपच्या तपासणीत थोडी सौम्यता आणावी असे सांगितले.

THYSSENKRUPP या जर्मन कंपनीने टाटा स्टील बरोबरच्या जॉईंट व्हेंचर करण्याला प्रतिबंध करणाऱ्या EU कमिशनच्या ऑर्डरविरुद्ध EU कोर्टात अर्ज केला.

पॉवर सेक्रेटरीने सांगितले की कोल इंडिया बरोबरच इतर कंपन्यांनाही कोळसा उत्पादनाची संधी दिली पाहिजे. या त्यांच्या निवेदनानंतर कोल इंडियाचा शेअर पडला.

HDFC AMC चे C G पॉवर मध्ये एक्स्पोजर होते.

GILLETTE चे तिमाही निकाल चांगले आले. कंपनीने Rs २५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६४७२ NSE निर्देशांक निफ्टी १०७४१ बँक निफ्टी २७०३४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २१ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २१ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ६०.२९ प्रति बॅरल ते US $ ६०.४५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.५५ ते US $१=Rs ७१.५८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.२३ आणि VIX १७.०२ होते.

आज USA चे चीनशी चालू असलेले ट्रेड वॉर २०२० नोव्हेंबरमध्ये मिटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. USA मध्ये क्रूडचा साठी ३५ लाख बॅरेलने कमी झाला. त्यामुळे क्रूड आज US $६० प्रती बॅरल च्या वर झाले. DR रेड्डीजच्या दुवाडा विशाखापट्टणम युनिटच्या केलेल्या तपासणीत USFDA ने ८ त्रुटी दाखवल्या आणि फॉर्म ४८३ इशू केला.

NSE ने एक्स्चेंजवर लिस्ट झालेल्या आणि ट्रेड होत असलेल्या आणि लिस्टेड नसलेल्या पण ट्रेडिंग साठी परवानगी असलेला कोणताही शेअर निफ्टीमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो असे सांगितले. तसेच असा नियम करण्याबद्दल येत्या मीटिंग मध्ये विचार केला जाईल असे कळवले त्यामुळे ABBOTT इंडिया, बेयर क्रॉप सायन्स, MCX, नेस्ले या चार कंपन्या NSE वर लिस्टेड नसल्या तरी ट्रेड होतात. अशा कंपन्या आता निफ्टीमध्ये समाविष्ट होऊ शकतील. येस बँक आणि इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स हे दोन शेअर निफ्टीमधून बाहेर पडण्याची आणि नेस्ले चा शेअर निफ्टीमध्ये समाविष्ट केला जाण्याची शक्यता आहे.

सेबीने आज H R खान कमिटीच्या शिफारशी मंजूर केल्या. FPI साठी असलेले वर्तमान रेग्युलेटरी फ्रेमवर्क सोपे केले. त्यांच्या असलेल्या ऑपरेशनल निर्बंध आणि कम्प्लायन्ससाठीचे नियम सोपे केले. सेबीने FPI साठी KYC डॉक्युमेंटेशन सोपे आणि सरळ केले.FPIचे वर्गीकरण आता ३ प्रकारांऐवजी दोन प्रकारात होईल

सेबीने भारतीय म्युच्युअल फंडांच्या ऑफशोअर फंडांना FPI म्हणून गुंतवणूक करण्यास परवानगी दिली.
सरकारचे असे म्हणणे आहे की सिमेंट कंपन्या आपापसांत संगनमत करून सिमेंटच्या किमती वाढत्या स्तरावर ठेवण्यासाठी उत्पादन कमी करत आहेत. यामुळे सिमेंटचे शेअर पडले.

कॅफे कॉफी डे या कंपनीत स्टेक खरेदी करण्यासाठी ITC ने त्यांच्या ऍसेट आणि फायनान्सियल्सचा ड्यू डिलिजन्स चालू केला आहे.

सरकार येत्या महिन्यात PSU मधील आपला स्टेक ५१%पेक्षा कमी करण्याची शक्यता आहे. या वेळच्या मंत्रिमंडळात NTPC, NMDC, कोल इंडिया आणि भेल या PSU मधील स्टेक ४०% वर आणण्यासाठी चर्चा झाली.

१० वर्षे जुन्या कमर्शियल वाहनांच्या विक्रीवर Rs ५००००, ७ वर्ष जुन्या कारच्या विक्रीवर वर Rs २०,००० आणि दुचाकी वाहनाच्या विक्रीवर Rs १०००० सूट देण्याचा सरकार विचार करत आहे. १ एप्रिल २०२० पासून आता वापरात असलेल्या BS4 गाड्या रद्द होऊन फक्त BS6 गाड्या वापरात राहतील. सरकार रजिस्ट्रेशन फीमधील वाढ २०२० पर्यंत पुढे ढकलण्यांचा विचार करत आहे.

ब्रिटानिया पाठोपाठ आज पार्ले प्रॉडक्ट्स या कंपनीने बिस्किट्स, चिप्स आणि साबण यांच्या छोट्या पॅकेट्स च्या विक्रीमध्ये घट होत आहे असे सांगितले . सरकारने Rs १०० प्रती किलोपेक्षा कमी दराच्या. बिस्किटांवरील GST कमी करण्याचा विचार करावा नाहीतर मागणी कमी झाल्यामुळे कंपनीला १०% स्टाफ कमी करावा लागेल.असे पार्ले प्रॉडक्ट्सच्या व्यवस्थापनाने सांगितले

GILLETTE, २२ ऑगस्ट रोजी तर वाडीलाल इंडस्ट्रीज २३ ऑगस्ट रोजी आपले तिमाही निकाल जाहीर करतील.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७०६० NSE निर्देशांक निफ्टी १०९१८ बँक निफ्टी २७७१९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २० ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २० ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ५९.७३ प्रती बॅरल ते US $ ६०.१६ प्रती बॅरल या दरम्यान रुपया US $१=Rs ७१.५१ ते US $ १= Rs ७१.७५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.३४ तर VIX १६.८० होता.

USA मध्ये क्रूडचा साठा १९ लाख बॅरल कमी झाला. तसेच USA चे अध्यक्ष ट्रम्प यांचा US चीन ट्रेड वॉरविषयी पवित्रा सौम्य झाला. त्यामुळे क्रूडच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. आज रुपया ६ महिन्यांच्या किमान स्तरावर होता. यामुळे IT क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

US $ मजबूत होत आहे, US $ निर्देशांक तीन महिन्याच्या उच्च स्तरावर असल्याने सोने आज घसरले.
MGL मध्ये ब्रिटिश गॅसचा स्टेक आहे. हा स्टेक ब्रिटिश गॅस अधून मधून कमी करत असे. या शेअरवर हा स्टेक म्हणजे टांगती तलवार होती. आज ब्लॉक डीलच्या सहाय्याने MGL मधील आपला १०% स्टेक Rs ७८० प्रती शेअर या भावाने ब्रिटिश गॅसने विकला.या शेअर्स साठी असलेला ३ वर्षांचा लॉकइन पिरियड १ जुलै २०१९ रोजी संपला. त्यात ब्रिटिश गॅस प्रमोटर होते त्यामुळे त्यांच्या साठी ह्या शेअर्ससाठी ३ वर्षांचा लॉकइन पिरियड होता. महानगर गॅसचे लिस्टिंग जून २०१६ मध्ये झाले. या नंतर ३ वर्षांनी हा लॉकइन पिरियड संपला. हे शेअर्स खरेदी करण्याचा अधिकार GAIL ला होता पण त्यांनी शेअर्स खरेदी करण्यासाठी नकार दिल्यामुळे ब्रिटिश गॅसने हा स्टेक ओपन मार्केटमध्ये विकला. या स्टेक विक्रीमुळे MGL च्या शेअरमध्ये तेजी होती.

HDFC AMC आणि HDFC लाईफ यांना एस्सेल ग्रुपकडून रक्कम मिळणार आहे. बुधवारी स्टॅंडर्ड लाईफने HDFC लाईफमधला ३.३३% स्टेक विकला.

L I C ने क्रॉम्प्टन कन्झ्युमर मधील स्टेक ५.२% वरून ३.१% इतका कमी केला. तर हिंदाल्को मधील आपला स्टेक ८.३२% वरून १०.३९% पर्यंत वाढवला.

M & M फायनान्सियल्सने IDEAL फायनान्स मध्ये ५८.२% स्टेक Rs ८०.६ कोटींना विकत घेतला.

DHFL ने आज पुम्हा Rs १५७१ कोटीच्या पेमेंटमध्ये डिफॉल्ट केला.

GAIL येत्या ५ वर्षात गॅस पाईप लाईन वर Rs ४८००० कोटींची गुंतवणूक करेल.

आज स्टर्लिंग & विल्सनचे Rs ७०६ प्रती शेअर या भावावर लिस्टिंग झाले म्हणजे इशू प्राईसच्या ९% डिस्काउंटवर झाले. या IPO चा प्राईस बँड Rs ७७५ ते Rs ७८० होता. IPO ची साईझ कमी केली होती. त्यामुळे लिस्टिंग इशू प्राईसपेक्षा कमी प्राईसवर होईल असा अंदाज होताच.

ONGC ३ कोलंबियन ब्लॉकमधून बाहेर पडणार आहे.

ओबेराय रिअल्टीज आणि CAPACITE इन्फ्रा या कंपन्यांचा आयकर विभागाने सर्व्हे केल्यामुळे हे दोन्ही शेअर पडले.
C G पॉवर मध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कंपनीने तारण म्हणून ठेवलेले शेअर्स येस बँकेने जप्त केले होते. त्यामुळे आता या कंपनीत येस बँकेचा १२.७९% स्टेक आहे. त्यामुळे C G पॉवर आणि येस बँक या दोन्ही कंपन्यांचे शेअर पडले.

SBI ने सणासुदीच्या दिवसांसाठी ऑटोलोन वरील प्रोसेसिंग चार्जेस रद्द केले आहेत. कारसाठी

८.७० % दराने कर्ज देणार आहे. जर तुम्ही कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केला तर तुम्हाला व्याज दरात ०.२५% ची सूट मिळेल.

जम्मू आणि काश्मीरमध्ये NHPC आणि JKSPDC हे संयुक्तरीत्या हायड्रोप्रोजेक्ट तयार करणार आहेत. यात NHPC चा ५१% स्टेक असेल. हा एकूण Rs ५२८१ कोटींचा प्रकल्प आहे.यामुळे NHPC च्या शेअरमध्ये तेजी आली.
हुंदाईने आज आपली GRAND i १० NIOS ही कार लाँच केली.

कर्नाटक राज्य सरकारने दोनीमलाई मायनिंगचा अधिकार NMDC कडून परत घेतला.

NMDC च्या छत्तीसगढमधील खाणींसाठी असलेले मायनिंग लायसेन्स २०२० मध्ये संपत आहे. त्यामुळे NMDC च्या शेअर्सच्या प्राईसमध्ये घट झाली.

BSE चा शेअर बायबॅक ३० ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या मुदतीत ओपन राहील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७३२८ NSE निर्देशांक निफ्टी ११०१७ बँक निफ्टी २७९८२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १९ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १९ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $५९.०७ प्रती बॅरल ते US $ ५९.५७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=Rs ७१.१६ ते US $ १=Rs ७१.४५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.२० तर VIX १६.२४ होते.

आज प्रत्यक्ष कर रिफॉर्म्स टास्क फोर्स आपला अहवाल अर्थमंत्र्यांना सादर करेल. या अहवालात DDT (डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूशन टॅक्स) पूर्णपणे हटवण्याची शिफारस आहे. जेव्हा डिव्हिडंड दिला जातो तेव्हा हा टॅक्स कंपनीने पेड करावा लागतो. या टॅक्सचा रेट १५% असून १२% सरचार्ज +३%शिक्षण सेस धरुन एकंदर इफेक्टिव्ह कराचा दर २०.३५% आहे. तसेच MAT (मिनिमम आल्टर्नेट टॅक्स) ही पूर्णपणे रद्द करावा अशी शिफारस केली आहे. हा कर बुक प्रॉफिट्स वर १८.५% नी लागतो. तसेच कॉर्पोरेट टॅक्सचा रेट २५% करावा. तसेच आयकराच्या विविध स्लॅब आणि कराचे दर यांच्यात बदल करावा अशी शिफारस केली आहे.

RBI चे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी FICCI बरोबरच्या मीटिंग मध्ये सांगितले की वित्तीय स्थैर्य आणि ग्रोथ हे RBI चे मुख्य फोकस एरिया असतील.

आज BSE वर आधीच लिस्टेड असलेल्या कंपन्या NSE वर लिस्ट झाल्या. त्या पुढीलप्रमाणे :- स्पाईस जेट, फोर्स मोटर्स, केन्नामेटल, वेस्टलाइफ, विशाल फॅब्रिक्स, वॉटरबेस, BC पॉवर कंट्रोल, जिया इको प्रॉडक्ट्स, जम्प नेटवर्क्स, दिग्विजय सिमेंट, दोलत इन्व्हेस्टमेंट, विकास PROPPANT, विकास WSP आणि हिंदुस्थान फूड्स. या पैकी काही कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी करून मार्केटने या लिस्टिंगचे स्वागत केले. उदा :- स्पाईस जेट, फोर्स मोटर्स.

जूनमध्ये रिलायन्स जियोनी ८३ लाख ग्राहक जोडले तर भारती एअरटेलने ३०००० ग्राहक गमावले.

LNG च्या वापराला उत्तेजन देण्यासाठी LNG वर चालणाऱ्या बस आणि ट्रक यांच्यावरील GST सरकार कमी/रद्द करण्याची शक्यता आहे.

उज्जीवन स्माल फायनान्स बँकेच्या Rs १२ कोटी रुपयाच्या IPO साठी अर्ज दाखल केला. ही बँक लिस्ट झाल्यावर उज्जीवन फायनान्स ही होल्डिंग कंपनी बनेल. यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये ४०% पर्यंत घट होण्याची शक्यता आहे. या बँकेच्या IPO आधी Rs ३०० कोटीची अलॉटमेंट करेल.

सन फार्माच्या हलोल प्लाण्टला USFDA ने NAI (नो एक्शन इनिशिएटेड) प्रमाणपत्र दिले. सन फार्माने चीनमध्ये सात जनरिक औषधांच्या डेव्हलपमेंट आणि मार्केटिंगसाठी करार केला.

FPI वरील जादा सेस, ऑटोसेक्टरमधील मंदी, सतत कमी होणारी औद्योगिक गुंतवणूक या आणि इतर बाबतीत उद्योगांच्या निवेदनावर सरकार काही उपाय करेल अशी मार्केटला आशा आहे.त्यामुळे तेजीमंदीचा लपंडाव चालू आहे. तेजी टिकत नाही ट्रेडर्स सकाळी पोझिशन घेतात सरकारी घोषणेची दिवसभर वाट बघतात आणि जर दिवसभरात घोषणा झाली नाही तर मार्केट संपताना विक्री करतात. ही तेजी येते तेव्हा प्रथम लार्ज कॅप शेअर चालतात, दुसरे दिवशी मिडकॅप तर तिसरे दिवशी स्माल कॅप किंवा खूप पडलेले शेअर्स चालतात. चौथे दिवस मार्केट बेअर्सच्या ताब्यात जाते. आज काही शेअर्स त्यांचे NSE वर लिस्टिंग झाले म्हणून वाढले. हे काही मूलभूत कारण नव्हे. कंपन्यांचे उत्पन्न प्रॉफिट वाढले नाही कोणतीही ग्रोथ झालेली नाही तरी जर शेअर्सची किंमत वाढत असली तर सावध राहा. कारण तेजीत वरच्या किमतीला खरेदी केलेले शेअर्स मार्केट अनपेक्षितरित्या पडले तर तुमच्याकडे दीर्घ काळ ठेवावे लागतील.

आज स्पंदन स्फूर्ती या कंपनीचे Rs ८५६ वर लिस्टिंग झाले.

BSE निर्देशांक सेंसेक्स ३७४०२ NSE निर्देशांक निफ्टी ११०५४ बँक निफ्टी २८१८६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!