आजचं मार्केट – १ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १७ – १८ ऑगस्ट ला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ६४.२७ प्रती बॅरल ते US $ ६४.४५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.०२ ते US $१=Rs ६९.०८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.८३ होता. VIX १४.५५ होता.

अमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेड वाटाघाटी आता सप्टेंबर २०१९ पर्यंत पुढे ढकलली. आता ह्या वाटाघाटी शांघाय येथे होतील.

आज फेडने ०.२५% रेट कट केला. रेट ऑफ इंटरेस्ट २ ते २.२५ एवढा राहील. फेडने सांगितले की ही मिडसायकल अडजस्टमेन्ट आहे. महागाई आणि मंदी या कारणामुळे रेट कट केला असे फेडने सांगितले. परिस्थितीचा परामर्श घेतल्यावर आवश्यक वाटल्यास रेट कटचा विचार केला जाईल असे सांगितले.

केंद्र सरकारने आता विविध PSU कडे असलेली मालमत्ता विकून Rs ३००० कोटी गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यात BSNL कडे असलेली अलीपूर, मुंबई, जबलपूर येथील जमीन, टॉवर्स, गेल ची ११४०० किलो मीटर्सची गॅस पाईप लाईन, नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या मिल्स यांचा समावेश आहे.

आज ७ मार्च २०१९ नंतर प्रथमच मार्केट निर्देशांक निफ्टी १०९०० च्या खाली गेला. काल शेवटच्या सत्रात जी तेजी आली होती ती कमकुवत शेअर्समध्ये होती. आज मात्र मार्केट पडल्यानंतर आलेली तेजी ही मजबूत शेअर्स मध्ये होती.

दिल्लीत ATF ची किंमत ३.४% वाढ झाली.

जेट एअरवेजच्या क्रेडिटर्सची आज मीटिंग होती.

युनिकेम लॅबच्या गोवा युनिटसाठी USFDA ने ४ त्रुटी दाखवल्या.

अजंता फार्मा, MAS फायनान्सियल्स, इंडिया मार्ट, क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण, थंगमाईल ज्युवेलर्स, CEAT इंटरनॅशनल पेपर, गोदरेज कन्झ्युमर,वरूण बिव्हरेजीस, हिकल, वेलस्पन एंटरप्रायझेस यांचे पहिला तिमाहीचे निकाल चांगले आले.

भारती एअरटेल या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीला Rs २८६६ कोटी लॉस झाला. यात Rs १४६९.५० वन टाइम लॉस आहे. पण मार्जिन, अर्पू, उत्पन्न यात वाढ झाली.

मॅग्मा फिनकॉर्प, महिंद्रा लॉजिस्टिक्स, अतुल ऑटो यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

आज ऑटोच्या विक्रीचे आकडे जाहीर झाले. बजाज ऑटो, मारुती, TVS मोटर्स, SML इसुझू, आयशर मोटर्स, अशोक लेलँड या सर्व ऑटो कंपन्यांची विक्री १०% पेक्षा जास्त कमी झाली. ही विक्रीतील घट अजून दोन तिमाहीपर्यंत चालू राहील असे बहुतेक ऑटो कंपन्यांनी सांगितले.

स्टर्लिंग अँड विल्सन सोलर हा IPO ६ ऑगस्ट २०१९ पासून ओपन होईल आणि ८ ऑगस्ट २०१९ वर बंद होईल. हा Rs ३१२५ कोटींचा IPO आहे. प्राईस बँड Rs ७७५ ते Rs ७८० असेल ही सोलर EPC सोल्युशन्स पुरवणारी कंपनी आहे.
विप्रोच्या शेअर बाय बॅकला मंजुरी मिळाली. पण रेकॉर्ड डेट २१ जून असल्यामुळे आता शेअर्स खरेदी करून उपयोग होणार नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७०१८ NSE निर्दशांक निफ्टी १०९८० बँक निफ्टी २८३६७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १ ऑगस्ट २०१९

  1. भगवान सुर्यवंशी

    सोप्या पद्धतीने शेअर बाजारात होणाऱ्या घडामोडीचा इती वृत्तान्त … धन्यवाद मॅडम…🙏

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.