आजचं मार्केट – २ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १७ – १८ ऑगस्ट ला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ६१.६४ प्रती बॅरल ते US $ ६२.०२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.०९ ते US $१=Rs ६९.५५ या दरम्यान होते. US $ ९८.४१ होते. VIX १५.५० होता.

आज USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी चीनच्या US $ ३००० बिलियन मालावर १ सप्टेंबर २०१९ पासून १०% नवीन ड्युटी आकारली जाईल असे सांगितले. त्यामुळे आता USA आणि चीनमधील ट्रेडवॉर वेगळे वळण घेत आहे असे वाटते. चीनच्या परराष्ट्र खात्याने सांगितले की ही USA ची ट्रेडवॉरची नीती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अपायकारक आहे. आम्हाला ट्रेड वॉर नको आहे वाटाघाटींनी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व पर्यायांचा विचार करायला तयार आहोत. पण वेळ आली तर आम्ही मागे हटणार नाही. त्यांनी असेही सांगितले की याबाबतीत USA चा पवित्रा स्पष्ट होत नाही. USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉरमुळे मेटल्स संबंधित शेअर्स पडत आहेत.

शेअरमार्केट मंदीत आहे. बॉण्ड यिल्डस कमी होत आहेत. मुदत ठेवीवरचे व्याजाचे दर कमी होत आहेत. अशा परिस्थितीत लोक सोन्याकडे एक सुरक्षित बचत म्हणून पहात आहेत. सोन्याचा ओक्टोबर २०१९ MCX वायद्याचा भाव आज Rs ३६००० च्या वर होता.

पॉवर ग्रीड या सरकारी कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकाल आले. फायदा Rs २४२८ कोटी, उत्पन्न Rs ८८०४ कोटी, मार्जिन ९.७% होते. हे निकाल चांगले होते.

HDFC या हौसिंग लोन क्षेत्रामधील दिग्गज कंपनीला पहिल्या तिमाहीत Rs ३२०३ कोटी नफा झाला उत्पन्न Rs १२९९० कोटी, होते. कंपनीने इम्पेअरमेंट ऑन फायनान्सियल इंस्ट्रुमेन्टससाठी Rs ८९० कोटींची प्रोव्हिजन केली. हा रिझल्ट क्षेत्रातील इतर NBFC आणि हौसिंग कंपन्यांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर चांगला होता.

आज ITC या FMCG क्षेत्रातील कंपनीच्या पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. नफा Rs ३१७४ कोटी, उत्पन्न Rs ११५०३ कोटी आणि मार्जिन ३९.७% झाले.

आज स्टेट बँकेने आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. बँकेला Rs २२९३९ कोटी उत्पन्न, Rs २३१२ कोटी नफा झाला. GNPA स्थिर होते तर NNPA मध्ये किंचित वाढ झाली. पण या तिमाहीत स्लीपेजिस Rs १६२१२ कोटी झाले. बँकेने Rs १५८४२ कोटींची कर्ज WRITE OFF केली, निकाल ठीक म्हणता येतील. स्टेट बँकेने एकूण Rs ७१००० कोटींची कर्ज ऑटो क्षेत्रातील कंपन्यांना दिली आहेत. त्यापैकी Rs ११००० कोटी ऑटो डिलर्सकडे अडकले आहेत. ल्युमेक्स ऑटो चा निकाल खराब आला.

सरकारने OFS साठी NBCC, कोल इंडिया, NMDC, हुडको, IRCON, NLC या कंपन्यांची निवड केली आहे सरकारची या कंपन्यातील १०% स्टेकसाठी OFS आणण्याची योजना आहे.

सरकारने IT क्षेत्रातील कंपन्यांना ओव्हरसीज असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या त्या देशाची भाषा शिकवण्याची सूचना केली आहे. उदा चीन जपान कोरिया यामुळे ह्या ओव्हरसीज कर्मचाऱयांची कार्यक्षमता वाढून निर्यात वाढीला उत्तेजन मिळेल असे सरकारला वाटते.

सरकारने अंदाज पत्रकात Rs २ कोटींपेक्षा जास्त उत्पन्नावर आयकर कायद्यात जादा सेस आकारण्यात येईल असा नियम केला. ही तरतूद असलेले फायनान्स बिलही मंजूर झाले. या तरतुदीप्रमाणे कॉर्पोरेट स्ट्रक्चर नसलेल्या सर्व FPI ना ह्या जादा सेसची झळ पोहोचणार होती. त्यामुळे FPI नी अंदाज पत्रक जाहीर झाल्यावर भारतीय शेअर मार्केट मधून आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली.FPI नी याबाबतीत सर्व संबंधितांची भेट घेतली.त्यांच्या मते सर्व प्रकारच्या FPI ना कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये रूपांतर करणे सोपे आणि व्यवहार्य होणार नाही. पण सरकार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. याचा परिणाम म्हणजे अंदाजपत्रकाच्या सुमारास १२००० वर असणारा निफ्टी आज १०८८० झाला. सर्व लार्जकॅप शेअर्स आणि ब्ल्यू चिप शेअर्सच्या किमती FPI नी ह्या शेअर्समध्ये विक्री केल्यामुळे कमी झाल्या. सरकार सरचार्ज देऊन जेवढी रक्कम गोळा करेल त्यापेक्षा जास्त नुकसान मार्केट सतत पडत होत असल्याने आता सरकारचे लक्ष या प्रश्नाकडे गेले आहे. पंतप्रधानांच्या ऑफिसने नीती आयोग, अर्थमंत्रालय, विधी मंत्रालय आणि सेबी यांना FPI ना या सेसमधून सवलत कशी देता येईल याचे मार्ग शोधायला सांगितले आहेत. फायनान्स बिल दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यामुळे आता त्यात दुरुस्ती करता येणार नाही.दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने यातून मार्ग काढावा लागेल. मार्केटने या बातमीचे स्वागत केले. पडणारे मार्केट काहीसे सावरले.

सरकारने खाजगी लिस्टेड कंपन्यांमधील पब्लिक स्टेक २५% वरून ३५% वर नेण्याचा आपला निर्णय सध्या काही दिवसांसाठी स्थगित ठेवण्यास सांगितले आहे.

सरकार नॅशनल हौसिंग बँकेला Rs १०००० कोटी देईल. NHB हे पैसे हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना अफोर्डेबल हौसिंग योजनेखाली कर्ज देण्यासाठी कर्जाऊ देईल.

सरकार १५ ऑगस्ट २०१९ स्वातंत्र्यदिनापासून किसान पेन्शन योजना अमलात आणील.

टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स यांच्यात प्रमुख महानगरात EV चार्जिंग स्टेशन बनवण्यासाठी करार झाला.
आंध्र बँक तोट्यातून फायद्यात आली. ऍसेट गुणवत्तेमध्ये सुधारणा दिसली नाही.

EXIDE , गोदरेज एग्रोव्हेट, BEML, पराग मिल्क यांचे निकाल ठीक होते.

उज्जीवन, हुडको, दीपक नायट्रेट, बाटा यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७११८ NSE निर्देशांक निफ्टी १०९९७ बँक निफ्टी २८२०४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – २ ऑगस्ट २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.