आजचं मार्केट – ५ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १७ – १८ ऑगस्ट ला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ५ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ६०.९५ प्रति बॅरल ते US $ ६१.४५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.३२ ते US $ १= Rs ७० .५८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.९० होता. VIX १६.४८ होता.

जम्मू काश्मीर मध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली. जम्मू काश्मीरच्या बाबतीत काही महत्वाचे निर्णय आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतले जातील असा अंदाज होता. त्यामुळे मार्केट सुरुवातीला ६५० पाईंट पडले. लोकसभा सुरु होताच सरकारने आपले तीन निर्णय जाहीर केले.
(१) कलम ३७० आणि त्याच्या अंतर्गत असलेली ३५-A ही कलमे रद्द केली. जम्मू आणि काश्मीर हा आता विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश असेल. (२) जम्मू काश्मीर मधून लडाख वेगळा काढून विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केला. (३) जम्मू काश्मीरच्या भौगोलिक सीमा नव्याने ठरवण्यात येतील. या निर्णयाला राष्ट्रपतींनी संमती दिली. हा निर्णय घोषित झाल्यावर मार्केट जोरदार पडेल असे वाटले होते पण मार्केटने आश्चर्याचा धक्का दिला. मार्केट सावरले आणि ३०० पाईंट सुधारले सुद्धा. यामुळे १०८०० च्या जवळपास शॉर्ट टर्म बॉटम बनण्याची शक्यता वाटू लागली.
आज अर्थमंत्र्यांनी FPI च्या तक्रारी ऐकून घेण्याचे आश्वासन दिले.

आज इराणने पुन्हा इराकचे एक तेलवाहू जहाज पकडून ठेवले. इराण आणि USA आणि युरोप यांच्यातील ताणतणाव वाढत आहे.

ल्युपिनच्या औरंगाबाद युनिटला USFDA ने क्लीन चिट दिली.

ट्रेड वॉरमुळे युआन या चीनच्या करन्सीच्या मूल्यात बदल झाल्यामुळे आता US $१= चिनी युआन ७.०८ असा विनिमय दर झाला.येन,फ्रॅंक या करन्सीज स्ट्रॉंग झाल्या तर रुपया आणि युआन या करन्सीज कमजोर झाल्या. रुपयाचा US $ बरोबरचा विनिमय दर US $१= ७०.५० पर्यंत घसरला. RBI योग्य वेळी ओपनमार्केट ऑपरेशन करेल.

RBI आपले द्वैमासिक वित्तीय धोरण बुधवार ७ ऑगस्ट २०१९ रोजी जाहीर करेल. RBI या वित्तीय धोरणात ०.२५% रेट कट करेल अशी मार्केटची अपेक्षा आहे. या आधी ५ ऑगस्ट पासून मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक होईल. ETF मध्ये ऑऊटफ्लो खूप आहे. FII नी IT, फार्मा आणि FMCG मध्ये थोडीशी खरेदी सुरु केली आहे.

भेलने ११६ MV चे पंपिंग स्टेशन सुरु केले.

वेंकीजचे प्रॉफिट कमी झाले. उत्पन्न वाढले. मार्जिनमध्ये घट झाली कारण इनपुट कॉस्ट वाढली. AB कॅपिटल, टॉरेन्ट पॉवर, बॉम्बे डाईंग (तोट्यातून फायद्यात आली), बर्जर पेंट्स या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

युनायटेड इंडिया इन्शुअरन्स, नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स या तीन सरकारी विमा कंपन्यांचे मर्जर केले जाईल. सरकार या कंपन्यात सॉल्व्हन्सी रेशियोसाठी Rs ३००० कोटी गुंतवणूक करेल. नंतर IRDA मर्जरला आवश्यक ती परवानगी देईल.

DHFL चे ऑडिटर डेलॉइटने काम करणे बंद केले. म्हणून DHFL चा शेअर पडला.

५ ऑगस्ट २०१९ पासून स्पंदन या मायक्रोफायनान्स कंपनीचा IPO ओपन झाला. ही कंपनी Rs २५००० ते Rs ६५००० या रेंजमध्ये लोन देते. प्राईस बँड Rs ८५३ ते Rs ८५६ असून मिनिमम लॉट १७ शेअर्सचा आहे. ही कंपनी महिलांच्या गटांना कर्ज देते. या कंपनीचे ओरिसात खूप एक्स्पोजर आहे. या कंपनीला स्माल फायनान्स बँक्स, मायक्रो फायनान्स कंपन्या यांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.

द्वारिकेश शुगरचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. प्रॉफिट आणि ऑपरेटिंग मार्जिन कमी झाले.
कामत हॉटेल या कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

इंडियन बँकेचे प्रॉफिट वाढले. पण ऍसेट गुणवत्ता कमी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६६९९ NSE निर्देशांक १०८६२ बँक निफ्टी २७६४८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

3 thoughts on “आजचं मार्केट – ५ ऑगस्ट २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.