आजचं मार्केट – ६ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १७ – १८ ऑगस्ट ला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ६ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ५९.८९ प्रती बॅरल ते US $ ६०.४५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.६१ ते US $१=Rs ७०.७८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५६ तर VIX १६.६६ होता.

USA आणि चीनमधील ट्रेड वॉर आणखीनच तीव्र झाले. चीनने जाहीर केले की चीनी कंपन्या USA मधून ऍग्री प्रॉडक्ट्स खरेदी करणार नाहीत. USA ने हॉन्गकॉन्गच्या प्रश्नांत लक्ष घालायला सुरुवात केली हे चीनला पटलेले नाही. हाँगकाँग आणि आमचा आपसी मामला आहे आणि त्यात USA ने मध्यस्थी करू नये असे चीनचे म्हणणे आहे. चीन हाँगकॉन्गमध्ये ३००० कोटी युआन विकेल. USA च्या ट्रेजरी विभागाने चीनला करन्सी मेनिप्युलेटर असे संबोधले. पण चीनच्या सेंट्रल बँकेने सांगितले की करंसीचा उपयोग आम्ही ट्रेड वॉरमध्ये हत्यार म्हणून करणार नाही.चीनच्या सेंट्रल बँकेच्या या आश्वासनानंतर मार्केट सावरले. चीनच्या युआन पाठोपाठ इमर्जिंग मार्केटमधील करन्सी घसरू लागल्या. क्रूड US $ ६० प्रती बॅरलच्या खाली जाऊ लागले,सोने वाढू लागले, रुपया घसरू लागला ही सर्व परिस्थिती आर्थिक मंदीची लक्षणे दाखवू लागली.

१७ जून २०१९ रोजी सुरु झालेले संसदेचे अधिवेशन आज संपले. या अधिवेशनात ३७० आणि ३५-A कलम रद्द करणे, जम्मू आणि काश्मीरमधून लडाख वेगळा काढणे, जम्मू आणि काश्मीर हा विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश आणि लडाख हा विधानसभेशीवाय केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी प्रस्ताव पास झाले. त्याच बरोबर शेअर मार्केटच्या दृष्टीने अनिश्चितताही संपली. कोणते विधेयक मंजूर होईल आणि त्याचा कोणत्या उद्योगावर परिणाम होईल या बाबतची अनिश्चितता संपली.

DHFL या अडचणीत असलेल्या NBFC ने आज स्टॉक एक्सचेन्जला कळवले की त्यांनी एक स्पेशल DEBT रेझोल्यूशन प्लान कमिटी आणि ERNST आणि YOUNG यांच्या बरोबर सल्लामसलतीने आणि त्यांच्या संमतीने तयार केला आहे. या रेझोल्यूशन प्लान अंतर्गत क्रेडिटर्सना फारसा हेअरकट घ्यावा लागला नाही. रिटेल फंडिंग सुरु ठेवण्यासाठी NHB ( नॅशनल हौसिंग बँक) आणि इतर बँकांकडून कर्ज मिळण्याची शक्यता आहे.

जम्मू आणि काश्मीर बँक, कलम ३७० रद्द झाल्यावर काश्मीरमध्ये राज्यपालांच्या नियंत्रणाखाली येईल कारण या बँकेत ६५% स्टेक जम्मू आणि काश्मीर राज्य सरकारचा आहे. या बँकेच्या व्यवस्थापनात आणि कामकाजातही सुधारणा होईल अशी शक्यता आहे.

२ ऑगस्ट २०१९ रोजी ASTRAL पॉली या कंपनीने बोनस जाहीर केला. तुमच्याजवळ कंपनीचे ४ शेअर्स असतील तर तुम्हाला एक बोनस शेअर मिळेल.

काल मार्केट बंद झाल्यावर SRF चे पहिल्या तिमाहीचे निकाल खूपच चांगले आले.

रिअल्टी आणि ऑटो या दोन्ही क्षेत्रात मंदी असताना पेन्ट उत्पादक कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले येत आहेत. एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स कन्साई नेरोलॅक या तिन्ही कंपन्यांचे निकाल चांगले आले. ऑटो पेंट्सच्या क्षेत्रात ग्रोथ कमी असली तरी डेकोरेटिव्ह पेंट्सच्या क्षेत्रात या कंपन्यांनी चांगली प्रगती दाखवली आहे

A B फॅशन & रिटेल ( प्रॉफिट,उत्पन्न, मार्जिन वाढले), हॉकिन्स, सतलज टेक्सटाईल्स, पीडिलाइट , टायटन, REC यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

BASF, JSW एनर्जी, ASHAHI इंडिया यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल ठीक होते.

अरविंद लिमिटेडचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

HCL टेकला त्यांचा HCL इन्फोमधला स्टेक विकण्यासाठी मंजुरी मिळाली

सरकार SUUTI मधील L &T मधील ०.५% स्टेक ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकण्याची शक्यता आहे.

USA मधील क्लास ८ ट्रकसाठी मागणी कमी झाली आहे. याचा परिणाम GNA अक्सल्स आणि भारत फोर्ज या कंपन्यांवर होईल.

इंडियन हॉटेल्सचा पहिल्या तिमाहीचा निकाल खूपच चांगला आला. पण हॉस्पिटॅलिटी सेक्टरला E-कॉमर्स कंपन्यांकडून होत असलेल्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजची AGM तोंडावर आली आहे. कंपनीने कोणत्या नव्या क्षेत्रात प्रवेश केला आहे ही मार्केटमध्ये उत्सुकता आहे.

KEI इंडस्ट्रीजचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. इंडिया आणि वेस्ट इंडिज मधील क्रिकेट सामन्याच्या मालिकेसाठी ब्रँड अँबेसेडॉर असल्याचा फायदा कंपनीला होईल. कंपनीच्या व्यवस्थापनाने भविष्यकाळासाठी चांगला गायडन्स दिला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६९७६ NSE निर्देशांक निफ्टी १०९४८ वर बँक निफ्टी २८०२२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – ६ ऑगस्ट २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.