आजचं मार्केट – ७ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १७ – १८ ऑगस्ट ला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ७ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ५८.७० प्रती बॅरल ते US $ ५८.८८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १= Rs ७०.६४ ते US $१= Rs ७०.९१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.७० तर VIX १६.२१ होता.

आज RBI ने अपेक्षेनुसार रेट कट केला तरी मार्केटला फारसा आनंद झालेला आढळला नाही. कारण FPI वर लावलेला सरचार्ज लवकरच काढला जाईल असे घाटते आहे पण प्रत्यक्षात फारसे काही घडत नाही. त्यामुळे ट्रेडर्सनी जी पोझिशन घेतली होती ती सोडून दिली असावी असे जाणवले. फायनान्स बिल पास झाले असल्यामुळे आता कोणत्या वेगळ्या मार्गाने FPI ना सरचार्जमध्ये सवलत देता येईल या बाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मार्केटची अवस्था दोलायमान राहील. रेट कट करूनही लोन ग्रोथ होत नाही हे आता लक्षात आले आहे.

आज I R B इंफ्राचा शेअर ११% वाढला. GIC या सिंगापूर सॉव्हरिन वेल्थ फंडाने कंपनीच्या रोड प्लॅटफॉर्ममध्ये Rs ४४०० कोटींची गुंतवणूक केली.

सरकार इलेक्ट्रिक व्हेहिकल साठी लागणाऱ्या लिथियम आयन बॅटरी उत्पादनासाठी सबसिडी देण्याची आणि यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरची आयात ड्युटी रद्द करण्याची शक्यता आहे.

येस बँकेने US $ ५०० मिलियनचा QIP आणण्यासाठी मोतीलाल ओसवाल, JM फायनान्सियल यांची बँकर म्हणून नेमणूक केली आहे. या QIP मध्ये भाग घेण्यासाठी GIC सिंगापूर, वेस्टब्रिज, सारखे PE प्लेयर्स आणि HDFC AMC सारखे संस्थागत निवेशक उत्सुक आहेत.

कलम ३७० रद्द झाल्यामुळे ITI चा फायदा होईल. ITI ला आपला J & K मधील श्रीनगर येथील प्लांट बंद करावा लागला होता. तो आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.

वोल्टासचे पहिल्या तिमाहीचे निकाल ठीक होते. कंपनीचे उत्पन्न वाढले , प्रॉफिट कमी झाले, आणि मार्जिन पूर्वीच्या स्तरावर राहिले.

महिंद्रा आणि महिंद्राच्या पहिल्या तिमाहीत प्रॉफिट Rs २२६० कोटी (यात Rs १३६७ वन टाइम गेन आहे) उत्पन्न Rs Rs १२८०६ कोटी तर मार्जिन कमी होऊन १३.६% राहिले.

इंडिया सिमेंट, रामको सीमेन्ट, ASTRA झेनका, सीमेन्स, अलकार्गो, सिप्ला, इंडिया बुल्स व्हेंचर, अडाणी पोर्ट,जे कुमार, पेट्रोनेट LNG, ल्युपिन, वेलस्पन कॉर्प, होंडा सीएल पॉवर प्लान्ट, बजाज इलेक्ट्रिकल(उत्पन्न वाढले प्रॉफिट कमी झाले), HPCL ( उत्पन्न वाढले, प्रॉफिट कमी, सरकारकडून केरोसीन सबसिडी Rs १५० कोटी मिळाली) या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

HCL टेक या IT क्षेत्रातील कंपनीचे प्रॉफिट ७.६०% कमी होऊन Rs २२२० कोटी होते. रेव्हेन्यू १८.४०% ने वाढून Rs १६४२५ कोटी झाला. कंपनीने FY २०२० साठी कॉन्स्टन्ट करन्सीमध्ये १४% ते १६ % गायडन्स तर EBIT मार्जिनसाठी १६.५०% ते १८.५०% चा गायडन्स दिला. कंपनीने Rs २ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

टाटा स्टीलचे पहिल्या तिमाहीचे निकाल ठीक आले. रेव्हेन्यू Rs ३५९४७.१० कोटी तर प्रॉफिट Rs ६९३.१० कोटी होते. EBITDA मार्जिन १५% होते. EBITDA Rs ५३७६.८० कोटी होते.

महाराष्ट्र सिमलेस पाइप्स, डॉलर इंडस्ट्रीज, सोनाटा सॉफ्टवेअर यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल ठीक होते.

इंडियन मेटल्स, बलरामपूर चिनी, ऍस्टर DM यांचे निकाल असमाधानकारक होते.

लेमन ट्री हॉटेल ही कंपनी फायद्यातून तोट्यात गेली.

आज RBI ने आपल्या द्विमासिक वित्तीय धोरणात ACCOMMODATIVE स्टान्स कायम ठेवत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ३५ बेसिस पाईंटने कमी केला. त्यामुळे आता रेपो रेट ५.४०% तर रिव्हर्स रेपो ५.१५ % झाला. CRR ४% वर कायम ठेवला. कमी होणारी महागाई, चांगला पाऊस आणि मंदावणारी ग्रोथ ही यामागची कारणे आहेत.

RBI ने FY २०२० साठी ग्रोथ रेट ६.९% केला. H १ FY २०२० साठी ग्रोथ रेट ५.८% ते ६.६% तर H २ FY २०२० साठी ग्रोथ रेट ७.३% ते ७.५% तर इन्फ्लेशन ३.५% तो ३.७% राहील असे अनुमान केले .FY २० Q १ मध्ये ग्रोथ रेट ७.४% तर महागाई ३.६% राहील.

डिसेंबर २०१९ पासून NEFT सेवा चोवीस तास सुरु राहील. कन्झ्युमर कर्जासाठी रिस्क वेटेज १२५% वरून १००% केले. बँकांचे एका NBFC साठी एक्स्पोजर लिमिट १५% वरून २०% केले. MSME कर्जासाठी Rs २० लाखापर्यंतच्या कर्जाला प्राथमिकता दिली जाईल. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६६९० NSE निर्देशांक निफ्टी १०८५५ तर बँक निफ्टी २७७०२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.