आजचं मार्केट – ८ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १७ – १८ ऑगस्ट ला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ८ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ५७.४१ प्रती बॅरल ते US $ ५८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.५७ ते US $ १= Rs ७०.९५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५४ तर VIX १६.७२ होता.

कलम ३७० आणि ३५-A रद्द करण्याच्या निर्णयावर पाकिस्तानने तिखट आणि कडवट प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानातील भारताच्या राजदूतांना परत पाठवले. भारतात निर्माण झालेल्या चित्रपटांवर बंदी घातली. समझोता एक्स्प्रेस काही काळ बंद केली. आम्ही भारताच्या या निर्णयाला योग्य उत्तर देऊ असे सांगितले.

पडणारा रुपया सावरण्यासाठी RBI ने फॉरेक्स मार्केटमध्ये ओपनमार्केट ऑपरेशन केले. त्यामुळे रुपया सुधारला.फारशी मागणी नसल्यामुळे क्रूडचा दर कमी झाला.

आज अर्थमंत्र्यांनी उद्योगपतींबरोबर झालेल्या बैठकीत अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीचा सामना कसा करावा याची चर्चा केली. ऑटो क्षेत्रातील कंपन्यांनी पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांवर आणि तीनचाकी वाहनांवर बंदी आणण्याची मुदत अनुक्रमे २०२३ आणि २०२५ यांच्यात वाढ करण्याची विनंती केली. त्यांनी अशीही सूचना केली की एकाच वेळेला बंदी घालण्यापेक्षा टप्प्याने टप्प्याने बंदी घातली तर ऑटो क्षेत्रातली मंदी कमी होईल. फक्त जेथे प्रदूषण जास्त आहे तेथे ही बंदी ठेवावी असे सांगितले. EV (इलेक्ट्रिकल व्हेहिकल) चे उत्पादन आणि त्यासाठी लागत असलेले इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण होण्याआधी जर ही बंदी घातली तर ग्राहकांना आणि ऑटो उत्पादकांनाही गैरसोयीचे होईल. सरकारने आश्वासन दिले की आम्ही यात लक्ष घालू आणि योग्य त्या सवलती आणि सोयी देण्यावर विचार करू. या अर्थमंत्र्याच्या आश्वासनानंतर ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी आली. या बैठकीत FPI ना जादा सेसच्या कक्षेतून बाहेर काढण्याविषयी चर्चा झाली नाही.

अर्थमंत्र्यानी सांगितले की FPI वरती लावलेल्या जादा सेसमुळे होणाऱ्या त्रासाविषयी सरकार विचार करत आहे आणि लवकरच यातून मार्ग काढला जाईल. या आश्वासनानंतर मार्केट सुधारले. सरकार नोटिफिकेशन किंवा वटहुकूमाद्वारे FPI ना या जादा सेसच्या कक्षेतून बाहेर काढून टाकु शकेल. . भारतीय HNI वरील हा सरचार्ज कायम राहील.

लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स कराबाबतही सरकार ठोस पाऊले उचलत आहे. गुंतवणूक केलेले शेअर्स ३ वर्षांनंतर विकल्यास लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स लावू नये असा विचार चालू आहे.

आज AFFLE चा शेअर Rs ९३० प्रति शेअर या भावाने लिस्ट झाला. IPO मध्ये हा शेअर Rs ७४५ ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना लिस्टिंग गेन झाला.

येस बँकेचा US ३०० मिलियनचा QIP १.४ पट सबस्क्राईब झाला.

कोर्टाने निर्णय दिला की HPCL मध्ये ONGC चे स्टॅटस प्रमोटर म्हणून असेल. HPCL ने २५ दिवस उत्पादन बंद ठेवले होते. HPCL ला सरकारने EV साठी चार्जिंग स्टेशन त्यांच्या पेट्रोल पंपाशेजारी लावायला सांगितले आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करावी लागेल असे सांगितले.

पेट्रोनेट LNG या कंपनीची सर्व कॉन्ट्रॅक्ट US ८ प्रती MMBTU या दराने केलेली आहेत. आता दर चालू आहे US $ ४ प्रती MMBTU. कंपनीवर दबाव आहे की नवीन कॉन्ट्रॅक्ट करा. सध्या लॉन्ग टर्म कॉन्ट्रॅक्ट US $ २ प्रती MMBTU या दराने होत आहेत.

JSPLने पेमेंट डिफॉल्ट केला अशी बातमी आल्यामुळे शेअर पडला. व्यवस्थापनाने बातमीचे खंडन केले तरी शेअर वाढला नाही.

MTNL आणि BSNL यांच्या मर्जरला मंजुरी मिळाली. ५० वर्षांवरील लोकांना स्वेच्छा निवृत्ती दिली जाईल. निवृत्तीचे वय ५८ केले.

रिन्यूएबल एनर्जी प्रॉडक्टवरील इम्पोर्ट ड्युटी वाढवली जाणार आहे.

ABBOT लॅब, इमामी (अन्य उत्पन्न Rs ३० कोटींनी वाढले), ऍडव्हान्स एन्झाईम, अपार इंडस्ट्रीज, रेल विकास निगम, अल्ट्राटेक सिमेंट, थरमॅक्स, मिश्र धातू निगम, वॉन्डरेला हॉलिडेज, टेक्स रेल, अडानी एंटरप्रायझेस ( Rs ३२८ कोटी वन टाइम गेन आणि टॅक्स खर्चात वाढ),करिअर पाईंट, EIL या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
सिटी युनियन बँक,ग्रीव्हज कॉटन, गोदरेज प्रॉपर्टीज ( उत्पन्न कमी झाले.), गुजरात पिपावाव, कॅपॅसिटे इन्फ्रा, GE शिपिंग यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

यूको बँक, नोव्हार्टीसचे निकाल असमाधानकारक होते.

पेज इंडस्ट्रीजने Rs ५१ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७३२७ NSE निर्देशांक निफ्टी ११०३२ बँक निफ्टी २८११० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.