आजचं मार्केट – ९ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १७ – १८ ऑगस्ट ला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ९ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ५७.३१ प्रती बॅरल ते US $ ५७.८० प्रती बॅरल या दरम्यान रुपया US $ १= Rs ७०.५० ते US $ १= Rs ७०.८० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.४० होता VIX १५.८४ होता.

मार्केट सतत पडत असल्यामुळे सरकार खडबडून जागे झाले आहे. RBI ने रेट कट करून तसेच इतर बाबतीत काही सुधारणा करून आपल्या वित्तीय धोरणात NBFC, आणि बँका यांना क्रेडिट ग्रोथ करण्याचा मार्ग सुकर केला. कदाचित कलम ३७० रद्द करण्याच्या कामात सरकार व्यस्त असल्याने अर्थव्यवस्थेच्या प्रश्नांकडे लक्ष देता आले नसावे. पण गेले ३ दिवस अर्थ मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, नीती आयोग कॅपिटल मार्केट का पडत आहे?, FPI का नाराज आहेत?, त्यांची नाराजी घालवण्यासाठी कोणते उपाय योजता येतील, ग्रोथ रेट आणि कन्झ्युमर डिमांड का कमी होत आहे ? आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचा शिरकाव होत आहे का ? कोणत्या औद्योगिक क्षेत्राना उत्तेजन, सवलती सोयी देण्याची /वाढवण्याची गरज आहे या सर्व प्रश्नांचा उहापोह करत आहे. अर्थमंत्री उद्योगपती, फायनान्सियल मार्केटमधील प्रमुख व्यक्ती, तसेच FPI चे प्रतिनिधी यांच्या बरोबरच्या मीटिंगमध्ये त्यांना भेडसावत असलेले प्रश्न आणि त्यावर करता येण्यासारखे उपाय यावर चर्चा करत आहेत. या सर्व समुद्रमंथनातून काहीतरी चांगले निर्णय होतील अशी मार्केटची अपेक्षा आहे. ‘पी हळद आणि हो गोरी’ असा ताबडतोब निर्णय झाला नाही तरी ८-१० दिवसात का होईना पण यावरती तोडगा निघेल असे मार्केटला वाटत आहे. ऑटो इंडस्ट्री आणि रिअल्टी उद्योगामध्ये खूपच इन्व्हेन्टरी जमा झाली आहे. म्हणजेच न विकला गेलेला माल आहे. १०-१० दिवस कारखाना बंद ठेवण्याची वेळ येत आहे. त्यामुळे अनेक उपायांवर चर्चा चालू आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी शॉर्ट पोझिशन घेतली होती त्यांना ती क्लोज करावी लागली. म्हणून गेले तीन दिवस मार्केट सतत वाढत आहे.त्यामुळे हा आठवडा आशेचा किरण दाखवणारा होता असे म्हणणे योग्य ठरेल.

IBC अंतर्गत घर /फ्लॅट खरेदी करणाऱ्याना फायनान्सियल क्रेडिटरचा दर्जा देण्याविरुद्ध बिल्डर्सनी केलेला अर्ज सुप्रीम कोर्टाने रद्द केला.

DR रेडीजच्या USA मधील SHREVEPORT युनिटला USFDA नी क्लीन चिट दिली.

महिंद्रा आणि महिंद्राने सांगितले की दुसऱ्या तिमाहीत त्यांचे उत्पादन ८ ते १४ दिवसपर्यंत बंद ठेवले जाईल.

स्ट्राइड्स फार्माच्या ALATHUR युनिटला ५ ऑगस्ट २०१९ ते ९ ऑगस्ट २०१९ या दरम्यान केलेल्या तपासणीत क्लीन चिट दिली.

मारुतीने XL६ ही मल्टिपर्पज व्हेईकल लाँच केली.

इमामीच्या प्रमोटर्सनी २ ऑगस्ट २०१९ ला ३८ लाख शेअर्स तारण म्हणून ठेवले.

ऑटो इंडस्ट्रीला GST मध्ये सवलत मिळण्याची शक्यता आहे.

ब्रिटानियाचे पहिल्या तिमाहीचे प्रॉफिट कमी, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले. कंपनीला Rs १५.६ कोटींचा वन टाइम लॉस झाला. कंपनीचे इतर उत्पन्न Rs ६७ कोटी होते. मागणी कमी होत असूनही कंपनीचे निकाल समाधानकारक म्हणता येतील.
फायझर, स्पाईस जेट ( तोट्यातून फायद्यात), श्री सिमेंट, MRF, गेल, शोभा, सुब्रोस, सीमेक, सॅटिन क्रेडिटकेअर, या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

किर्लोस्कर इंडस्ट्रीज, PSP प्रोजेक्ट्स, मार्कसन्स फार्मा, युनिव्हर्सल केबल, यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल ठीक आले.
हिंदाल्को, पंजाब केमिकल्स, VST टिलर्स, नाटको फार्मा, NCC, जमना ऑटो, कॅडीला, प्रकाश इंडस्ट्रीज,BHEL यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

पुढील आठवड्यात सोमवार १२ ऑगस्ट २०१९ आणि गुरुवार १५ ऑगस्ट २०१९ रोजी अनुक्रमे ईद आणि स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याने दोन दिवस मार्केट बंद राहील.म्हणून या आठवड्याची एक्सपायरी बुधवारी होईल. RIL ची AGM १२ ऑगस्टला आहे. तसेच BPCL आणि NTPC या कंपन्या आपले निकाल जाहीर करतील. अर्थमंत्र्यानी उद्योग फायनान्सियल मार्केट्स आणि FPI ना दिलेल्या सकारात्मक प्रतिसादातील प्रगतीही कळून येईल. त्यामुळे मंगळवारी जेव्हा मार्केट उघडेल तेव्हा या सर्व गोष्टींना मार्केट काय प्रतिसाद देईल याचे कुतूहल राहील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७५८१ NSE निर्देशांक निफ्टी १११०९ बँक निफ्टी २८४३१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – ९ ऑगस्ट २०१९

 1. Vishwas Baddad

  I need to understand what stretagy you are going to provide in trading session.
  I am interested in stock derivatives, index derivatives. Is these subject are involved into training session.

  Reply
  1. surendraphatak

   HI, the current course focuses on equity segment.. we do not cover derivatives as a part of this course

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.