आजचं मार्केट – १३ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १७ – १८ ऑगस्ट ला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १३ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ५८.२८ प्रती बॅरल ते US $ ५८.५७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=Rs ७१.०३ ते US $१=Rs ७१.२७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५६ तर VIX १७.८० होता.

USA मध्ये क्रूडचे उत्पादन वाढले. चीनची क्रूडसाठी मागणी कमी झाली. ओपेकने उत्पादनातील कपात चालू ठेवली आहे. त्यामुळे क्रूडचे दर नजीकच्या भविष्यकाळात कमीच राहतील.

करन्सी वॉरचा परिणाम आज रुपयावर झाला आणि रुपया US $१= Rs ७१ च्या स्तरावर पोहोचला. परंतु याचा परिणाम IT आणि फार्मा सेक्टरवर दिसला नाही

USA च्या १० वर्षाच्या बॉण्ड्स यिल्ड कमी होत आहेत, USA चीन ट्रेड वॉर अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. आणि जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येत आहे. त्यामुळे सोने आज तेजीत होते. अर्जेंटिना, हाँगकाँग येथील राजकीय अस्थिरता वाढत आहे.

दिलीप बिल्डकॉनला झारखंडमध्ये Rs ४७० कोटींचे धरणाचे काम मिळाले.

इंडिया बुल्स ग्रुपच्या व्हिसल ब्लोअरने आज वर्तमानपत्रातून जाहीर माफी प्रसिद्ध केल्यामुळे इंडिया बुल्स ग्रुपच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

HUL हैदराबाद जवळची २५.४ एकर जमीन विकणार आहे. ३ सप्टेंबरपर्यंत बोली मागवल्या आहेत.

रिलायन्सच्या AGM मध्ये मुकेश अंबानी यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या.

५ सप्टेंबर २०१९ पासून जिओ फायबर लाँच करणार. जियो फायबर प्लॅन्स Rs ७०० पासून सुरु होतील. फ्युएल रिटेलिंग मध्ये BP Rs ७००० कोटींची गुंतवणूक करणार. तसेच सौदी आरामको ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी रिलायन्सच्या केमिकल डिव्हिजनमध्ये US $ १५ बिलियनची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स जियो आणि रिलायन्स रिटेल मध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांचा शोध केला जाईल. रिलायन्स जियो आणि रिलायन्स रिटेल यांचे IPO येत्या ५ वर्षात येतील. क्लाऊड कॉम्पुटिंगसाठी मायक्रोसॉफ्टबरोबर करार करणार. १८ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज मार्च २०२१ DEBT-FREE कंपनी होईल. रिलायन्सच्या AGM मधील या घोषणांनंतर आज रिलायन्सच्या शेअर मध्ये खूप तेजी आली. तसेच मुकेश अंबानी रिलायन्स ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्स तेजी आली. TV १८ ब्रॉडकास्ट, रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रा, डेन नेटवर्क्स, हाथवे केबल या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आली. रिलायन्सच्या AGM मधील घोषणांनंतर रिलायन्सचा शेअर १०% ने वाढला तरीही मार्केट ६०० पाईंट पडले यावरून मार्केटमधील मंदीची कल्पना येते.

ज्या कंपन्यांच्या बिझिनेसवर या घोषणांचा प्रतिकूल परिणाम होईल त्या कंपन्यांचे शेअर्स पडले. उदा मेडिया कंपन्या, टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्या,

भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये बिकट पूर परिस्थिती आहे. या पुरामध्ये प्राण आणि वित्तहानी खूप झाली आहे. त्यामुळे नव्याने घर बांधणी, वाहून गेलेले रस्ते, पुल नव्याने बांधणे आणि सामान्यतः पुरग्रस्ताचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येईल. त्यामुळे बिल्डिंग मटेरियल, सिमेंट,पत्रे तसेच इतर आवश्यक वस्तू म्हणजेच FMCG सेक्टरमधील कंपन्यांमध्ये तेजी येईल.

आज मंत्रिमंडळाने ‘हर घर जल’ या योजनेला मंजुरी दिली.

जुलै २०१९ महिन्यासाठी CPI ( कंझ्युमर प्राईस इंडेक्स) ३.१५% होता.

गायत्री प्रोजेक्ट या कंपनीला त्यांच्या नागालँड प्रोजेक्टसाठी केलेल्या आर्बिट्रेशनमध्ये कंपनीला ९१४.३० कोटी क्लेम मिळाला.

सिम्फनी या कंपनीने MOVICOOL या नावाने एअरकूलर लाँच केला.

भारत फोर्ज, ओरिएंट पेपर, एक्सेल इंडस्ट्रीज, ब्ल्यू स्टार, शिल्पा मेडिकेअर, इन्फो एज, BOSCH, बोडल केमिकल्स, गॅब्रिएल इंडिया, मावाना शुगर, BHEL. सन टी व्ही, SAIL ग्लेनमार्क फार्मा, या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

इंडोको रेमिडीज ( तोट्यातून फायद्यात), JB केमिकल्स, बजाज हिंदुस्थान (तोटा खूपच कमी झाला), CHALET हॉटेल्स, DCW (कंपनी तोट्यातून फायद्यात आली.), IPCA लॅब, सन फार्मा, लाल पाथ लॅब, PFC, PNC इंफ्राटेक, नारायण हृदयालय, APL अपोलो ट्यूब्स, कॅपलीन पाईंट, गॉडफ्रे फिलिप्स, HAL,, NHPC, ऑइल इंडिया, सोलारा ऍक्टिव्ह, गोदरेज इंडस्ट्रीज, ONGC (प्रॉफिट, मार्जिन वाढले), कोल इंडिया (प्रॉफिट, उत्पन्न,मार्जिन वाढले), NMDC, RITES, युनायटेड ब्रुअरीज, आरती इंडस्ट्रीज या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६९५८ NSE निर्देशांक निफ्टी १०९२५ बँक निफ्टी २७७२९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.