आजचं मार्केट – १४ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १७ – १८ ऑगस्ट ला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १४ ऑगस्ट २०१९

उद्या असलेल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व वाचकांना शुभेच्छा. टिपांपासून सर्वांनी स्वातंत्र्य मिळवावे आणि स्वावलंबी बनावे हीच प्रार्थना

आज क्रूड US $ ६०.६३ प्रती बॅरल ते US $ ६०.८० प्रती बॅरल या दरम्यान, रुपया US $१=Rs ७०.९७ ते US $ १= Rs ७१.३० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.७६, VIX १७.३० होते.

आज USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या निवडक वस्तूंवर ड्युटी लावण्याचा निर्णय पुढे ढकलला १ सप्टेंबर २०१९ पासून जी १०% ड्युटी वाढणार होती ती आता १० डिसेम्बर २०१९ पर्यंत पुढे ढकलली. नाताळच्या सणासाठी ही सवलत दिली आहे.

हाँगकाँग विमानतळावर होत असलेल्या निर्दशनांमुळे सर्व उड्डाणे रद्द झाली.

चीनने युआनची किंमत US $१= ७.०३१२ युआन अशी ठरवली. .

स्टॅंडर्ड लाईफने त्यांचा HDFC लाईफ मधील ०.७% स्टेक Rs ४७७.८० ते Rs ४९३ या भावाने विकला .

आजपासून विप्रोचा Rs १०५०० कोटींचा शेअर बायबॅक Rs ३२५ प्रती शेअर या भावाने सुरु झाला.

सरकार ऑटो क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी आता वेगवेगळे उपाय योजण्यावर विचार करत आहे. NHB च्या धर्तीवर ऑटोक्षेत्रासाठी फायनान्सिंगसाठी एक फंड उभारला जाईल. NBFC ना ऑटो फायनान्ससाठी फंड्स पुरवले जातील. ऑटोफायनान्सिंगसाठी एक डेडिकेटेड विंडो उघडली जाईल.

BEML या कंपनीमधील आपला स्टेक ऑक्टोबर -डिसेंबर २०१९ या काळात विकून सरकार Rs १००० कोटी उभारेल.
SFIO (सिरीयस फ्रॉड इन्वेस्टीगेशन ऑफिस) ने J कुमार इन्फ्रा या कंपनीला ‘शेल’ कंपन्यांच्या यादीतून बाहेर काढले. त्यामुळे हा शेअर वाढला.

SBI ला त्यांचा SBI कार्ड्स मधील त्यांचा हिस्सा IPO दवारा विकण्यासाठी SBI ला मंजुरी मिळाली. SBI चा या कंपनीत ७४% हिस्सा आहे.

GST कौन्सिलची पुढील बैठक २० सप्टेंबर २०१९ रोजीने गोव्यात होईल. हेल्थकेअर क्षेत्रातील इनपुट टॅक्स क्रेडिट वर चर्चा अपेक्षित आहे. सध्यातरी ऑटो सेक्टरला GST मधून काही सवलत मिळण्याची शक्यता वाटत नाही.

DR रेडीज या कंपनीला USFDA ने त्यांच्या COPAXONE या औषधासाठी आणि NUVARING या महिला कॉन्ट्रासेप्टिव्ह च्या मार्केटिंगसाठी COMPLETE RESPONSE लेटर दिले. DR रेड्डीज या औषधांची जनरिक व्हर्जन लाँच करण्यासाठी अर्ज करणार होती. आता हे लेटर इशू केल्यामुळे त्यांचा अर्ज मंजूर होणार नाही. यामुळे DR रेडीजचा शेअर पडला. आता ही औषधे लाँच करण्यासाठी DR रेडीज ला २०२० च्या मध्यापर्यंत थांबावे लागेल.

सन फार्माचा पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला आला. पण व्यवस्थापनाने सांगितले की त्यांच्या सोरायसिस या रोगावरच्या औषधाची विक्री चांगली नाही. मार्केटच्या या औषधाबद्दल खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे सन फार्माचा मार्केट शेअर कमी होत आहे. त्यामुळे शेअर पडला.

ब्रिटानियाने असे सांगितले की Rs ५ किंमत असलेल्या पाकिटाची किंमत Rs ०.५० ने वाढवली तर त्याचा २१% परिणाम विक्रीवर होत आहे. या वरून सामान्य माणूस Rs ५ चा पुडा घेण्यासाठी एवढा विचार करतो आहे. यावरून अर्थव्यवस्थे मध्ये येऊ घातलेल्या मंदीची कल्पना येते.

RBI कडे असलेल्या सरप्लसच्या संबंधात जालान समिती आपला अहवाल सरकारला लवकरच सादर करेल.
जुलै २०१९ साठी WPI (होलसेल प्राईस इंडेक्स) १.०८% ( जूनमध्ये ३.१०%) या २५ महिन्यातील किमान स्तरावर आहे.
NEULAND लॅब, कावेरी सीड्स, गेटवे डिस्ट्रिपार्क, CESC, ग्रासिम (कंपनीला वन टाइम लॉस Rs २९० कोटी पेमेंट बँक बंद करण्याच्या संबंधात झाला.) नेक्टर लाईफ सायन्सेस, WOCKHARDT ( तुलनात्मक दृष्ट्या लॉस कमी झाला तर EBITDA आणि मार्जिन वाढले), भारत रसायन, जॉन्सन हिताची, यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
CESC व्हेंचर (फायद्यातून तोट्यात) , एडलवेस ( प्रॉफिट उत्पन्न कमी परंतु या कंपनीमध्ये कोरा मास्तर फंड गुंतवणूक करणार आहे या बातमीमुळे शेअर वाढला.) KNR कन्स्ट्रक्शन, WABCO या कंपन्यांचे पहिल्या तिमाहिचे निकाल असमाधानकारक होते.

JSPL या कंपनीचे निकाल ठीक होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७३११ NSE निर्देशांक निफ्टी ११०२९ बँक निफ्टी २८०१९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.