आजचं मार्केट – १६ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १७ – १८ ऑगस्ट ला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १६ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ५८.९० प्रती बॅरल ते US $ ५९.०५ प्रती बॅरल या दरम्यान, रुपया US $१=Rs ७१.११ ते US $ ७१.४७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.४० आणि VIX १७.३९ होता.

GE या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीच्या ऑइल आणि गॅस युनिटमध्ये US $ ३८ बिलियन चा फ्रॉड झाला आहे असे हॅरी मार्कोपोलस या व्हिसलब्लोअरने सांगितले आहे. GE ही कंपनी जवळ जवळ सगळ्या IT कंपन्यांची ग्राहक आहे. यामुळे याचा IT क्षेत्रातील सर्व कंपन्यांवर परिणाम होईल.

चीनला हाँगकाँगमध्ये जे काही घडते आहे ते पसंत नाही. त्यामुळे चीन हाँगकाँगविरुद्ध मिलिटरी पर्याय अमलात आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

येस बँकेने QIP दवारा Rs ८३.५५ प्रती शेअर (बँकेने Rs ८७.९० ही या इशूसाठी फ्लॉवर प्राईस ठेवली होती) या दराने Rs १९३० कोटी उभारले. ठरवलेल्या दरापेक्षा कमी दराने QIP करायला लागणे ही चांगली गोष्ट मानली जात नाही. ही रकम बँकेच्या बिझिनेसचा विस्तार करण्यासाठी उपयोगात आणली जाईल असे त्यांच्या CEO रावनीत गिल यांनी सांगितले.
KNR कन्स्ट्रक्शन ही कंपनी आपले SPV क्यूब हायवेजला Rs ९५.८ कोटींना विकेल. KNR कन्स्ट्रक्शन या कंपनीचा पहिल्या तिमाहीचा निकाल असमाधानकारक होता.

आता थोडे ‘अंडरवेअर’ निर्देशांकाविषयी!  – हा निर्देशांक फेडचे चेअरमन ग्रीनस्पॅन यांनी १९७० च्या दशकात सुरु केला. जेव्हा अंडरवेअरसारख्या अत्यावश्यक गोष्टीची विक्री कमी होऊ लागते तेव्हा अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट घोंगावत असते. भारतात अंडरवेअरचे उत्पादन पेज इंडस्ट्रीज, लक्स, VIP इंडस्ट्रीज, डॉलर इंडस्ट्रीज या कंपन्या करतात. त्यांच्या विक्रीमध्ये घट आहे किंवा वाढ असली तरी फार थोडी आहे. हाच मुद्दा ब्रिटानियाच्या व्यवस्थापनाने Rs ५ च्या पॅकेटची किंमत वाढवली तर विक्रीवर नको तितका परिणाम होत आहे. ग्राहक Rs ५ चे पॅकेट घेतानाही विचार करू लागला आहे. त्यामुळे मागणी कमी होऊन मंदी येण्याचा धोका आहे. असे सांगून स्पष्ट केला होता. .

आता थोडे ‘इन्व्हर्टेड( उलटा) बॉण्ड (DEBT इन्स्ट्रुमेंट) यिल्ड( बॉन्डवर मिळणारे उत्पन्न) ‘ विषयी :- आपण सामान्यतः बघतो की जशीजशी आपल्या ठेवीची किंवा ‘DEBT इन्स्ट्रुमेंट’ची मुदत वाढते तसे त्याच्यावरील यिल्ड वाढत जाते. केंद्र सरकार. राज्य सरकार, प्रत्येक देशातील सरकार आणि कंपन्यासुद्धा डिबेंचर्सच्या स्वरूपात बॉण्ड्स इशू करतात. USA सरकारने इशू केलेल्या अल्प मुदतीच्या बॉण्ड्स वरचे यिल्ड मध्यम मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या बॉण्ड्सवरील यिल्डपेक्ष जास्त झाले आहे.

१० वर्ष मुदतीच्या बॉन्डवर १.५४% २ वर्षाच्या मुदतीच्या बॉण्ड्सवर १.५१% तर ३ महिने मुदतीच्या बॉण्ड्स वरील यिल्ड १.९१% आहे. याचा अर्थ असा होतो की गुंतवणूकदार मध्यम मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या काळातील ग्रोथविषयी साशंक आहेत त्यामुळे या मुदतीच्या बॉण्ड्स मध्ये पैसा गुंतवण्याची त्यांची तयारी नाही. याउलट अल्प मुदतीमध्ये असणाऱ्या आणि प्रत्यक्ष दिसत असणाऱ्या परिस्थितीत त्यांची पैसे गुंतवण्याची तयारी असल्यामुळे अल्प काळासाठी असलेल्या बॉण्ड्सवर यिल्ड जास्त मिळत आहे. जर असा ‘इन्व्हरटेड बॉण्ड यिल्ड कर्व्ह’ तयार झाला तर नजीकच्या काळात मंदी येते. याआधी सन २००० आणि सन २००७ मध्ये असा कर्व्ह तयार झाला होता. या कर्व्हचे भाकीत आता पर्यंत एकदाच चुकले आहे. पण हा कर्व्ह तयार झाल्यावर एक ते दीड वर्षांनंतर मंदी तीव्रतेने जाणवू लागते. हा कर्व्ह येणाऱ्या मंदीआधी तयार होत असल्याने हा मंदीचा लिडिंग इंडिकेटर आहे असे म्हणता येईल. जगातील सर्व देशांच्या सेंट्रल बँकांनी हे चिन्ह ओळखून मंदीचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करणे सुरु केले आहे. भारतातील स्थिती थोडी वेगळी आहे कारण भारतात कमी प्रमाणात का होईना ग्रोथ आहे.

सरकारने जल जीवन योजनेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल असे घोषित केले. घर घरमे जल, प्रत्येक घरात पाईपद्वारे पाणीपुरवठा, या योजनांचा फायदा वॉटर ट्रीटमेंट करणाऱ्या कंपन्या पाईप उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांना होईल. यामध्ये व्हा टेक, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, प्राज इंडस्ट्रीज, ASTRAL पॉली, थरमॅक्स या कंपन्यांचा समाचवेश असेल.

सरकार IT क्षेत्रातील, टेलिकॉम क्षेत्रातील, आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कंपन्यांबरोबर ‘मेक इन इंडिया’ आणि डिजिटल इंडिया या सरकारी उपक्रमांचा उपयोग नोकऱ्या वाढवण्यासाठी कसा करता येईल यावर विचार करण्यासाठी बैठका घेत आहे.यामुळे आज सरकारी कंपन्यांमध्ये तेजी होती. उदा ड्रेजिंग, ITI, MMTC, REC, PFC, हिंदुस्थान कॉपर

पंतप्रधानांनी आपल्या १५ ऑगस्टच्या संदेशात वेल्थक्रिएटर्सना उत्तेजन आणि RBI ने केलेले रेटकट ग्राहकांपर्यंत पोहोचवणे यांचे महत्व विशद केले. त्यामुळे आता काहीतरी महत्वाचे घडेल या अपेक्षेने मार्केट सावरले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७३५० NSE निर्देशांक निफ्टी ११०४७ बँक निफ्टी २८२१७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – १६ ऑगस्ट २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.