आजचं मार्केट – २० ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २० ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ५९.७३ प्रती बॅरल ते US $ ६०.१६ प्रती बॅरल या दरम्यान रुपया US $१=Rs ७१.५१ ते US $ १= Rs ७१.७५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.३४ तर VIX १६.८० होता.

USA मध्ये क्रूडचा साठा १९ लाख बॅरल कमी झाला. तसेच USA चे अध्यक्ष ट्रम्प यांचा US चीन ट्रेड वॉरविषयी पवित्रा सौम्य झाला. त्यामुळे क्रूडच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. आज रुपया ६ महिन्यांच्या किमान स्तरावर होता. यामुळे IT क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

US $ मजबूत होत आहे, US $ निर्देशांक तीन महिन्याच्या उच्च स्तरावर असल्याने सोने आज घसरले.
MGL मध्ये ब्रिटिश गॅसचा स्टेक आहे. हा स्टेक ब्रिटिश गॅस अधून मधून कमी करत असे. या शेअरवर हा स्टेक म्हणजे टांगती तलवार होती. आज ब्लॉक डीलच्या सहाय्याने MGL मधील आपला १०% स्टेक Rs ७८० प्रती शेअर या भावाने ब्रिटिश गॅसने विकला.या शेअर्स साठी असलेला ३ वर्षांचा लॉकइन पिरियड १ जुलै २०१९ रोजी संपला. त्यात ब्रिटिश गॅस प्रमोटर होते त्यामुळे त्यांच्या साठी ह्या शेअर्ससाठी ३ वर्षांचा लॉकइन पिरियड होता. महानगर गॅसचे लिस्टिंग जून २०१६ मध्ये झाले. या नंतर ३ वर्षांनी हा लॉकइन पिरियड संपला. हे शेअर्स खरेदी करण्याचा अधिकार GAIL ला होता पण त्यांनी शेअर्स खरेदी करण्यासाठी नकार दिल्यामुळे ब्रिटिश गॅसने हा स्टेक ओपन मार्केटमध्ये विकला. या स्टेक विक्रीमुळे MGL च्या शेअरमध्ये तेजी होती.

HDFC AMC आणि HDFC लाईफ यांना एस्सेल ग्रुपकडून रक्कम मिळणार आहे. बुधवारी स्टॅंडर्ड लाईफने HDFC लाईफमधला ३.३३% स्टेक विकला.

L I C ने क्रॉम्प्टन कन्झ्युमर मधील स्टेक ५.२% वरून ३.१% इतका कमी केला. तर हिंदाल्को मधील आपला स्टेक ८.३२% वरून १०.३९% पर्यंत वाढवला.

M & M फायनान्सियल्सने IDEAL फायनान्स मध्ये ५८.२% स्टेक Rs ८०.६ कोटींना विकत घेतला.

DHFL ने आज पुम्हा Rs १५७१ कोटीच्या पेमेंटमध्ये डिफॉल्ट केला.

GAIL येत्या ५ वर्षात गॅस पाईप लाईन वर Rs ४८००० कोटींची गुंतवणूक करेल.

आज स्टर्लिंग & विल्सनचे Rs ७०६ प्रती शेअर या भावावर लिस्टिंग झाले म्हणजे इशू प्राईसच्या ९% डिस्काउंटवर झाले. या IPO चा प्राईस बँड Rs ७७५ ते Rs ७८० होता. IPO ची साईझ कमी केली होती. त्यामुळे लिस्टिंग इशू प्राईसपेक्षा कमी प्राईसवर होईल असा अंदाज होताच.

ONGC ३ कोलंबियन ब्लॉकमधून बाहेर पडणार आहे.

ओबेराय रिअल्टीज आणि CAPACITE इन्फ्रा या कंपन्यांचा आयकर विभागाने सर्व्हे केल्यामुळे हे दोन्ही शेअर पडले.
C G पॉवर मध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कंपनीने तारण म्हणून ठेवलेले शेअर्स येस बँकेने जप्त केले होते. त्यामुळे आता या कंपनीत येस बँकेचा १२.७९% स्टेक आहे. त्यामुळे C G पॉवर आणि येस बँक या दोन्ही कंपन्यांचे शेअर पडले.

SBI ने सणासुदीच्या दिवसांसाठी ऑटोलोन वरील प्रोसेसिंग चार्जेस रद्द केले आहेत. कारसाठी

८.७० % दराने कर्ज देणार आहे. जर तुम्ही कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केला तर तुम्हाला व्याज दरात ०.२५% ची सूट मिळेल.

जम्मू आणि काश्मीरमध्ये NHPC आणि JKSPDC हे संयुक्तरीत्या हायड्रोप्रोजेक्ट तयार करणार आहेत. यात NHPC चा ५१% स्टेक असेल. हा एकूण Rs ५२८१ कोटींचा प्रकल्प आहे.यामुळे NHPC च्या शेअरमध्ये तेजी आली.
हुंदाईने आज आपली GRAND i १० NIOS ही कार लाँच केली.

कर्नाटक राज्य सरकारने दोनीमलाई मायनिंगचा अधिकार NMDC कडून परत घेतला.

NMDC च्या छत्तीसगढमधील खाणींसाठी असलेले मायनिंग लायसेन्स २०२० मध्ये संपत आहे. त्यामुळे NMDC च्या शेअर्सच्या प्राईसमध्ये घट झाली.

BSE चा शेअर बायबॅक ३० ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या मुदतीत ओपन राहील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७३२८ NSE निर्देशांक निफ्टी ११०१७ बँक निफ्टी २७९८२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.