आजचं मार्केट – २१ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २१ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ६०.२९ प्रति बॅरल ते US $ ६०.४५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.५५ ते US $१=Rs ७१.५८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.२३ आणि VIX १७.०२ होते.

आज USA चे चीनशी चालू असलेले ट्रेड वॉर २०२० नोव्हेंबरमध्ये मिटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. USA मध्ये क्रूडचा साठी ३५ लाख बॅरेलने कमी झाला. त्यामुळे क्रूड आज US $६० प्रती बॅरल च्या वर झाले. DR रेड्डीजच्या दुवाडा विशाखापट्टणम युनिटच्या केलेल्या तपासणीत USFDA ने ८ त्रुटी दाखवल्या आणि फॉर्म ४८३ इशू केला.

NSE ने एक्स्चेंजवर लिस्ट झालेल्या आणि ट्रेड होत असलेल्या आणि लिस्टेड नसलेल्या पण ट्रेडिंग साठी परवानगी असलेला कोणताही शेअर निफ्टीमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो असे सांगितले. तसेच असा नियम करण्याबद्दल येत्या मीटिंग मध्ये विचार केला जाईल असे कळवले त्यामुळे ABBOTT इंडिया, बेयर क्रॉप सायन्स, MCX, नेस्ले या चार कंपन्या NSE वर लिस्टेड नसल्या तरी ट्रेड होतात. अशा कंपन्या आता निफ्टीमध्ये समाविष्ट होऊ शकतील. येस बँक आणि इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स हे दोन शेअर निफ्टीमधून बाहेर पडण्याची आणि नेस्ले चा शेअर निफ्टीमध्ये समाविष्ट केला जाण्याची शक्यता आहे.

सेबीने आज H R खान कमिटीच्या शिफारशी मंजूर केल्या. FPI साठी असलेले वर्तमान रेग्युलेटरी फ्रेमवर्क सोपे केले. त्यांच्या असलेल्या ऑपरेशनल निर्बंध आणि कम्प्लायन्ससाठीचे नियम सोपे केले. सेबीने FPI साठी KYC डॉक्युमेंटेशन सोपे आणि सरळ केले.FPIचे वर्गीकरण आता ३ प्रकारांऐवजी दोन प्रकारात होईल

सेबीने भारतीय म्युच्युअल फंडांच्या ऑफशोअर फंडांना FPI म्हणून गुंतवणूक करण्यास परवानगी दिली.
सरकारचे असे म्हणणे आहे की सिमेंट कंपन्या आपापसांत संगनमत करून सिमेंटच्या किमती वाढत्या स्तरावर ठेवण्यासाठी उत्पादन कमी करत आहेत. यामुळे सिमेंटचे शेअर पडले.

कॅफे कॉफी डे या कंपनीत स्टेक खरेदी करण्यासाठी ITC ने त्यांच्या ऍसेट आणि फायनान्सियल्सचा ड्यू डिलिजन्स चालू केला आहे.

सरकार येत्या महिन्यात PSU मधील आपला स्टेक ५१%पेक्षा कमी करण्याची शक्यता आहे. या वेळच्या मंत्रिमंडळात NTPC, NMDC, कोल इंडिया आणि भेल या PSU मधील स्टेक ४०% वर आणण्यासाठी चर्चा झाली.

१० वर्षे जुन्या कमर्शियल वाहनांच्या विक्रीवर Rs ५००००, ७ वर्ष जुन्या कारच्या विक्रीवर वर Rs २०,००० आणि दुचाकी वाहनाच्या विक्रीवर Rs १०००० सूट देण्याचा सरकार विचार करत आहे. १ एप्रिल २०२० पासून आता वापरात असलेल्या BS4 गाड्या रद्द होऊन फक्त BS6 गाड्या वापरात राहतील. सरकार रजिस्ट्रेशन फीमधील वाढ २०२० पर्यंत पुढे ढकलण्यांचा विचार करत आहे.

ब्रिटानिया पाठोपाठ आज पार्ले प्रॉडक्ट्स या कंपनीने बिस्किट्स, चिप्स आणि साबण यांच्या छोट्या पॅकेट्स च्या विक्रीमध्ये घट होत आहे असे सांगितले . सरकारने Rs १०० प्रती किलोपेक्षा कमी दराच्या. बिस्किटांवरील GST कमी करण्याचा विचार करावा नाहीतर मागणी कमी झाल्यामुळे कंपनीला १०% स्टाफ कमी करावा लागेल.असे पार्ले प्रॉडक्ट्सच्या व्यवस्थापनाने सांगितले

GILLETTE, २२ ऑगस्ट रोजी तर वाडीलाल इंडस्ट्रीज २३ ऑगस्ट रोजी आपले तिमाही निकाल जाहीर करतील.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७०६० NSE निर्देशांक निफ्टी १०९१८ बँक निफ्टी २७७१९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.