आजचं मार्केट – २२ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २२ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ६० प्रती बॅरल ते US $ ६०.४७ प्रती बॅरल या दरम्यान तर रूपया US $१=Rs ७१.६४ ते US $ १= Rs ७१.९१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.१७ तर VIX १८.१२ होते.

मार्केटच्या आकाशात सर्व बाजूनी अंधार झाला आहे. जागतिक मंदीचे सावट, USA आणि चीन यांच्यात चालू असलेले ट्रेड वॉर, अंदाजपत्रकातील जादा सेसमुळे FPI करत असलेली धुवाँधार विक्री, रुपयाची घसरण, ग्रामीण आणि अर्धशहरी भागात कमी होत जाणारी मागणी आणि त्यामुळे कंपन्यांनी प्लांट बंद करणे किंवा कामगारांना काढून टाकणे, दिवसेंदिवस कमी होणारी गुंतवणूक आणि GDP ग्रोथचा रेट. या सगळ्या अंधारात सरकारकडे विविध उद्योग एका सवलतींच्या पॅकेजची अपेक्षा करत आहेत. सरकार काही हस्तक्षेप करून आपल्या उद्योगासाठी आणि शेअर मार्केटसाठी काही सूट सवलती, सोयी जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. पण सरकार सर्व उद्योगांशी बोलणी करत आहे आमचा स्टिम्युलस पॅकेजवर विचार चालू आहे अशी घोषणा करत आहे. आजचे चीफ इकॉनॉमिक सल्लागारांचे निवेदन म्हणजे पाऊस पडण्याऐवजी डोक्यावर वीज कोसळावी या प्रकारचे होते. त्यांनी सांगितले की ‘प्रॉफिट झाले तर तुमचे आणि लॉस झाला तर मात्र समाजाचा’ असे होऊ शकत नाही. करदात्यांचा पैसा वापरताना फार विचार करूनच वापरावा लागेल.तेजी आणि मंदी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या चीफ इकॉनॉमिक सल्लागारांच्या निवेदनानंतर मार्केट पडण्याची गती वाढली आणि ते पडतच राहिले. त्यातच पंतप्रधान परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे दौऱ्यावरून आल्याशिवाय पॅकेजविषयी निर्णय होणे कठीण आहे मार्केट एक तर अती निराशा किंवा अवास्तव अपेक्षा यांच्या आहारी नेहेमीच जात असते .

पंतप्रधान फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात संरक्षणविषयी काही करार होण्याची शक्यता आहे त्यामुळे सरंक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्या या पडझडीतही टिकून होत्या. उदा BEL

टाटा स्पॉन्जचे नाव आता ‘टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्ट्स’ असे होईल.

LIC हाऊसिंगमधील शेअर्स ३% ते ८% डिस्काऊंटवर FIDELITY ने विकले हे शेअर्स Rs ४२५ ते Rs ४४९ प्रती शेअर या भावाने विकले.

स्टील कंपन्यांनी २५% सेफगार्ड ड्युटी लावण्याची सरकारला विनंती केली. पण सरकारने ती मान्य केली नाही.
केरळमध्ये कच्च्या रबराचे उत्पादन होते. ओणमचा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. पण यावेळेला आलेल्या पुरामुळे सणासुदीच्या काळात कार्स, ज्युवेलरी यांची मागणी कमी असेल. पूर परिस्थितीमुळे घरांचे नुकसान झाल्यामुळे सिमेंट आणि बिल्डिंग मटेरिअल्सची मागणी वाढेल.

कर्नाटक सरकारने NMDC कडून दोनीमलाई खाणीचे लायसेन्स परत घेतले. सरकार या खाणीचा पुन्हा लिलाव करणार होते. पण कोर्टाने त्याच्यावर स्टे दिला.

राणा कपूरच्या कंपनीने तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले. म्युच्युअल फंडांचे Rs ७९० कोटींचे कर्ज फेडले.
सरकारने MTNL आणि BSNL च्या मर्जरला मंजुरी दिली नाही.

L & T ला सौदी आरामको कडून Rs २५०० कोटी ते Rs ५००० कोटींच्या दरम्यानचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

सुप्रीम कोर्टाकडून DLF या कंपनीला डिस्क्लोजर्स संबंधात नोटीस मिळाली असे कंपनीने सांगितले. हरयाणामधील ५-६ एकर जमिनीसंबंधात झालेल्या कायदेशीर कार्रवाईविषयी माहिती दिली नाही. कंपनीने सांगितले की QIP करताना सर्व डिस्क्लोजर दिलेली आहेत. कंपनी सुप्रीम कोर्टाच्या या नोटिसीलाही योग्य ते उत्तर पाठवेल असे कंपनीने सांगितले. DLF चा शेअर खूप पडला.

अडाणी पोर्ट येत्या ६ वर्षात Rs १७५०० कोटींची गुंतवणूक करेल.

ITC ने FABELLE चॉकोलेट बारचे चार नवीन प्रकार लाँच केले. ITC ने त्यांना कॅफे कॉफी डे मध्ये स्वारस्य आहे या बातमीचा इन्कार केला.

IRCTC ने २ कोटी शेअर्सच्या IPO साठी अर्ज केला.

ल्युपिन ही फार्मा क्षेत्रातील कंपनी त्यांचा जपानमधील INJECTABLE बिझिनेस विकणार आहे.

अडाणी ग्रीनने राजस्थानमध्ये १०० MV चा सोलर एनर्जी प्लांट सुरु केला.

ग्रनुअल्सच्या USA सबसिडीअरीच्या तपासणीत USFDAला २ त्रुटी मिळाल्या.

PMO ने आयकर खात्याला स्टार्टअपच्या संबंधातील टॅक्सविषयीचे विवाद लवकर निपटायला सांगितले. तसेच स्टार्टअपच्या तपासणीत थोडी सौम्यता आणावी असे सांगितले.

THYSSENKRUPP या जर्मन कंपनीने टाटा स्टील बरोबरच्या जॉईंट व्हेंचर करण्याला प्रतिबंध करणाऱ्या EU कमिशनच्या ऑर्डरविरुद्ध EU कोर्टात अर्ज केला.

पॉवर सेक्रेटरीने सांगितले की कोल इंडिया बरोबरच इतर कंपन्यांनाही कोळसा उत्पादनाची संधी दिली पाहिजे. या त्यांच्या निवेदनानंतर कोल इंडियाचा शेअर पडला.

HDFC AMC चे C G पॉवर मध्ये एक्स्पोजर होते.

GILLETTE चे तिमाही निकाल चांगले आले. कंपनीने Rs २५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६४७२ NSE निर्देशांक निफ्टी १०७४१ बँक निफ्टी २७०३४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.