आजचं मार्केट – २६ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २६ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ५८.७१ प्रति बॅरल ते US $ ५९.३४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=७१.९४ ते US $१= Rs ७२.२३ या दरम्यान होता. US $ निर्देशांक ९७.६८ तर VIX १७.५० होता.

भारताचे अर्थमंत्री तसेच इतर खात्याचे मंत्री असलेले धुरंधर आणि समन्वयांत विश्वास ठेवणारे राजकारणी, तज्ज्ञ वकील तसेच एक अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्ता लाभलेले असे अरुण जेटली यांचे निधन झाले. त्यांना भावपूर्वक आणि आदराने श्रद्धांजली वाहून आजचा ब्लॉग सुरु करूया

आज रुपया घसरला आणि US $१=Rs ७२ च्या स्तराला पोहोचला. तसेच चीनची करन्सी युआन ही ११ वर्षांच्या किमान स्तरावर होती.

आज जागतिकीकरण म्हणजे काय आणि याचा प्रत्येक देशाच्या अर्थकारणावर काय परिणाम होतो याचे उत्तम उदाहरण पाहावयास मिळाले. आज भारताच्या माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या विविध निर्णयांमुळे मार्केट तेजीत राहील असा सर्वांचा अंदाज होता. त्याप्रमाणे मार्केट ओपन झाले ही तेजीत निफ्टी ११००० या स्तरावर होता. पण बातमी आली की USA चे अध्यक्ष यांनी चीनमधून आयात होणाऱ्या US $ २५० बिलियन किमतीच्या मालावरील ड्युटी २५% वरून ३०% केली. या बातमीसरशी तेजीत ओपन झालेले भारतीय मार्केट धडाधड पडू लागले आणि शुक्रवारपेक्षाही मंदीत गेले. त्यावेळेस मार्केट निफ्टी १०७५६ पर्यंत पोहोचले. तेवढ्यात बातमी आली की ट्रम्प यांनी आता अशी घोषणा केली की चीनबरोबर अजून वाटाघाटी करायला लागतील. मार्केटने हा धागा पकडला आणि ट्रम्प यांचा ट्रेडवॉर मधील पवित्रा थोडा सौम्य झाला असे समजून मार्केटमध्ये तेजी परतली आणि ती शेवटपर्यंत टिकली.मार्केटने ११०७० निफ्टी गाठला. आणि ११०५७ निफ्टीचा क्लोज दिला. या मुळे बुलिश PIN BAR पॅटर्न तयार झाला.

शुक्रवारी PIERCING लाईन पॅटर्न तयार झाला होता. हा बुलिश रीव्हर्सल पॅटर्न समजला जातो. गुरुवार आणि शुक्रवारच्या मार्केटच्या स्थितीवरून हे लक्षात येते. गुरुवारी CEA (चीफ इकॉनॉमिक एडव्हायझर) नी सांगितले की तेजी आणी मंदी मार्केटमध्ये आणि बिझिनेसमध्ये येणारच. प्रॉफिट इज पर्सनल आणि लॉस मात्र सोशल असे सांगितल्यामुळे जखमेवर मीठ चोळल्यासारखे होऊन मार्केट पडले होते.

पण शुक्रवारी दिवसभर सांगण्यात आले की संध्याकाळी अर्थमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही महत्वाच्या घोषणा करणार आहेत.त्यामुळे दिवसभर मार्केट तेजीत राहिले. गुरुवारी झालेला बराचसा लॉस भरून निघाला. ६०% ते ६५% मार्केट रीट्रेस झाले. PIERCING लाईन पॅटर्न तयार झाला. हा बुलिश रिव्हर्सल पॅटर्न तयार झाला.म्हणजेच २ दिवस पाठोपाठ तेजीचे पॅटर्न तयार झाले त्याचबरोबर अर्थमंत्र्यानी जाहीर केलेल्या सवलती हा मूलभूत बदल झाला आणि अजूनही काही सवलती दिल्या जाणार आहेत असे सांगितले आहे. यामुळे ही तेजी अल्पमुदतीसाठी चालू राहील.

अर्थात चीनने असे उत्तर दिले की आम्ही USA च्या दबावाखाली झुकणार नाही. आम्ही आमच्या देशाच्या हिताचे रक्षण करू. तसेच आम्ही USA ऐवजी दुसरा पार्टनर शोधू असे सांगितले.

युनिकेम लॅबच्या गाझियाबाद युनिटच्या USFDA ने केलेल्या तपासणीत १ त्रुटी दाखवली.

CBIC (सेंटर बोर्ड ऑफ इन्डायरेक्ट टॅक्सेस आणि कस्टम) भ्रष्टाचाराच्या आपल्या २२ सिनियर अधिकाऱ्यांवर कारवाई केली.

स्वदेशी गॅस कंपन्या गॅस क्षेत्रात Rs ५ लाख कोटींची गुंतवणूक करतील.

NCLT कडून PVR मध्ये ‘SPI सिनेमाज’ चे मर्जर करायला मंजुरी मिळाली.

स्पाईस जेटने स्वस्त परदेशी उड्डाणांची योजना लाँच केली. आता तुम्ही Rs ३९९९ मध्ये परदेशी जाऊ शकाल.

दिलीप बिल्डकॉनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी ५ रोड प्रोजेक्टमधील कंपनीची हिस्सा विकण्यासाठी मंजुरी दिली
RBI ने सरकारला Rs १.७६ लाख कोटी लाभांश म्हणून देण्याचे ठरवले आहे.

टाटा मेटॅलिक्सचे खडगपूर युनिट ३ दिवस रिपेरिंगसाठी बंद राहील.

HDFC म्युच्युअल फंडाने TNPL मध्ये २.५% स्टेक खरेदी केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७४९४ NSE निर्देशांक निफ्टी ११०५७ बँक निफ्टी २७९५१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.