आजचं मार्केट – २७ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २७ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ५८.८९ प्रती बॅरल ते US $ ५९.०३ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.६७ ते US $१=Rs ७१.८६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.९० आणि VIX १६.४० होते.

रिझर्व्ह बँकेने दिलेले Rs १.७६ लाख कोटी देशाच्या कन्सॉलिडिटेड फंडात जमा करून त्याचा विनिमय अंदाजपत्रकातील तरतुदीसाठी करण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले.

HDFC लाईफ आजपासून MSCI निर्देशांकामधे समाविष्ट केला जाईल. आणि युनियन बँक ऑफ इंडिया आणि शारदा क्रॉपकेम हे बाहेर पडतील

NSE त्यांच्या F & O सेगमेंटमधून स्ट्राइड्स फार्मा या कंपनीला १ नोव्हेंबर २०१९ पासून बाहेर काढेल.

मारुती CNG कार्सचे उत्पादन ५०% वाढविण्याची योजना आखत आहे. भारतात इलेक्ट्रिक व्हेइकलचे टेस्टिंग सुरु आहे असे सांगितले. पुढच्या वर्षीपासून तिसऱ्या प्लांटमध्ये काम सुरु होईल. या वर्षाच्या अखेरीपर्यंत डिझेल कार्सचे उत्पादन बंद करण्यात येईल असे कंपनीने सांगितले. ब्रेझा आणि अर्टिगा याची पेट्रोल व्हर्जन चालू ठेवणार आहेत.

GSTN च्या प्रक्रियेचा अर्थमंत्री आढावा घेतील. आणि रिफंडची प्रक्रिया सरळ आणि जलद बनविण्यावर विचार करण्यात येईल.

स्पाईस जेट आता स्वदेशातील उड्डाणांसाठी स्वस्त योजना लाँच करत आहे. Rs १२९९ मध्ये स्वदेशात प्रवास करण्याची योजना लाँच करत आहे.

DGTP ने मलेशियातून आयात होणाऱ्या पामतेलावर ५% सेफगार्ड ड्युटी लावण्याची शिफारस केली.

आज इन्फोसिसने आपली शेअर बाय बॅक योजना बंद केली. कंपनीने ११०५.१९ लाख शेअर्स सरासरी किंमत Rs ७४७.३८ या भावाने बाय बॅक केले या बायबॅकसाठी Rs ८२५९.९९९९ कोटी बायबॅक वर खर्च केले. त्यामुळे कंपनीने ही मार्च २०१९ पासून सुरु असलेली Rs ८२६० कोटींची शेअर बायबॅक योजना २६ ऑगस्ट २०१९ पासून बंद केली.

V G सिद्धार्थ यांच्या दुखःद निधनानंतर RBL बँकेच्या ऑफिसर्स आणि स्टाफने त्यांच्या जवळ असलेले शेअर्स विकून टाकले. RBL बँकेने V G सिद्धार्थ यांच्याशी संबंधित असलेल्या लॉजिस्टिक, कॉफी, आणि रिअल इस्टेट बिझिनेसला लोन दिली होती. या स्टाफ आणि ऑफिसर्सनी केलेल्या विक्रीमुळे RBL बँकेचा शेअर या निधनानंतर १३% पडला होता.
‘एक वेळ अशी येते की कंपनी आपल्या प्रमोटर्सपेक्षा मोठी होते आणि आपल्या पायावर उभी राहते’ हे विधान आहे इंडीगोचे एक प्रमुख प्रमोटर राहुल भाटिया यांचे. राहुल भाटिया आणि गंगवाल या दोन प्रमुख प्रमोटर्समध्ये रस्सीखेच चालू असताना त्याचा परिणाम कंपनीच्या बिझिनेसवर झाला नाही ही पार्श्वभूमी या विधानामागे आहे. कंपनीचा बिझिनेसही वाढला आणि कंपनीच्या शेअर्सचा भावही वाढला.

आज सरकारने कोरियामधून आयात होणाऱ्या CPVC वर डम्पिंग ड्युटी बसवली. याचा फायदा ASTRAL पॉली, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, सुप्रीम इंडस्ट्रीज या कंपन्यांना होईल.

आज HUL ने आपल्या काही प्रॉडक्टसच्या किमतीत कपात केली. लक्स साबण २५.९%, लाईफबॉय २८.६%, डोव्ह २०%, रिन १५% यांच्या किमतीत याप्रमाणे कपात केली.

क्लोजअपची नवीन टूथपेस्ट लाँच केली. तर वॅसेलीनचे ५ नवीन स्किन केअर प्रोडक्ट लाँच केले.

ONGC विदेश कझाकस्थान ब्लॉक मधून बाहेर पडणार आहे.

एक रिपोर्ट प्रमाणे भारतामध्ये बिस्किटाऐवजी लोकांची आवड कुकीजकडे जास्त झुकत आहे. ब्रिटानिया या कंपनीने नुकताच कुकीजच्या मार्केट मध्ये प्रवेश केला आहे.

सिप्लाच्या इंदोर प्लाण्टला UK रेग्युलेटरी ऑथॉरिटीने क्लीन चिट दिली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७६४१ NSE निर्देशांक निफ्टी १११०५ बँक निफ्टी २८१२६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.