आजचं मार्केट – २८ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २८ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ५९.८६ प्रती बॅरल ते US $ ६०.२३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=Rs ७१.५८ ते US $१= Rs ७१.८६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.१० होता तर VIX १६.२६ होता.

चीन आणि USA यांच्यातील ट्रेड वॉर आता आणखी तीव्र झाले. ट्रम्पनी सांगितले की वाटाघाटींसाठी चीनमधून फोन आला होता. पण चीनने मात्र आमच्याकडून कोणी USA मध्ये अशाप्रकारचा फोन केला नव्हता असे सांगितले.

‘जगत’ हा तांदुळाचा ब्रँड आहे. त्याच्या प्रमोटरला पकडले आहे. हा ब्रँड असलेली कंपनी लिस्टेड नाही याचा फायदा तांदुळाची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना होईल. गल्फ देशांबरोबर फ्री ट्रेड करार होण्याची शक्यता आहे. यामुळे या देशांना होणाऱ्या तांदुळाच्या निर्यातीत वाढ होईल.

रेल्वे ऑथॉरिटीज सप्टेंबरपासून ऑर्डर द्यायला सुरुवात करतात. त्याचा फायदा RVNL आणि RITES या कंपन्यांना होईल.
चीनमध्ये जनरिक औषधांच्या संबंधात एक बिल पास झाले आहे. याचा फायदा DR रेड्डीज या कंपनीला होईल.

कमर्शियल कोल मायनिंग, सिंगल ब्रँड रिटेल, डिजिटल मीडिया, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग यामधील विदेशी गुंतवणूकीवर आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत विचार होईल. याचा तोटा कोल इंडिया तर फायदा CANTABIL, ट्रेंट, HT मीडिया, बालाजी टेली, झेई मीडिया अशा कंपन्यांना होईल.

ऑटो सेक्टरची समीक्षा केली जाईल. सध्या घेतलेल्या निर्णयांचा ऑटो क्षेत्रावर काय परिणाम होतो आहे हे पाहावे लागेल. आणि गरज भासल्यास आणखी उपाय योजावे लागतील.

GST संबंधात असलेल्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करू असे अर्थमंत्र्यानी सांगितले.

फिलिप मॉरीस आणि ALTRIA यांच्या मर्जरची बातमी आहे. या दोन कंपन्यांचे US $ २०००० कोटीं मध्ये मर्जर होईल. फिलिप मॉरीसचा गॉडफ्रे फिलिप्समध्ये २५.१% स्टेक आहे. जर हा स्टेक वाढला तर गॉडफ्रे फिलिप्स मध्ये ओपन ऑफर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॉडफ्रे फिलिप्सचा शेअर वाढत होता.

अफोर्डेबल हौसिंगच्या व्याख्येत महत्वाचे बदल केले जाणार आहेत. याचा फायदा ब्रिगेड इंटरप्रायझेस यासारख्या कंपन्यांना होईल.

सोने आणि चांदीचे दर कमाल स्तरावर आहेत. इक्विटी मार्केटमध्ये मंदी असते तेव्हा कमोडिटी मार्केटमध्ये व्हॉल्युम वाढतात. याचा फायदा MCX ला होत आहे. म्हाणून या कंपनीचा शेअर वाढत आहे.

तळवलकर्स या कंपनीचे स्टॅटयूटरी ऑडिटर M K दांडेकर आणि कंपनी यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाने आमच्या क्वेरीजना समाधानकारक प्रतिसाद दिला नाही म्हणून राजीनामा दिला. या शेअरला लोअर सर्किट लागले.

सरकारने ६० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. Rs १०.५० प्रती किलो या दराने साखरेसाठी सबसिडी मिळेल. प्रमोशन आणि मार्केटिंगवर जोर असेल. सरकार Rs ६००० कोटींचे पॅकेज मंजूर करण्याची शक्यता आहे.
IOC सिटी गॅस प्रोजेक्टमध्ये ८ वर्षांत Rs १०००० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

कल्पतरू पॉवर या कंपनीला बोली लावताना नियमांकडे दुर्लक्ष केले म्हणून वर्ल्ड बँकेने नोटीस पाठवली आहे. कंपनीने आम्ही या नोटिसीला उत्तर पाठवू असे सांगितले.

सरकारचा असा विचार आहे की वीज कंपनीच्या ग्राहकाला आपण कोणत्या वीज कंपनीकडून वीज घ्यावी हे ठरवण्याचे आणि प्रसंगी ही कंपनी बदलण्याचे स्वातंत्र्य असावे.म्हणून सरकार आवश्यक ते बदल करत आहे.

आयकरासाठी नेमलेल्या टास्क फोर्सने आज आपल्या शिफारशी सरकारला सादर केल्या. आयकरासाठी असलेली रिबेटची सीमा सध्याच्या Rs ५ लाखांवरून Rs ६.२५ लाखापर्यंत वाढवावी. पण करमुक्त उत्पन्नाची मर्यादा मात्र Rs २.५ लाखच ठेवावी. Rs २.५ लाख ते Rs १० लाख उत्पन्नावर १०% , तर Rs १० लाख ते Rs २० लाख उत्पन्नावर २०% आयकराचा रेट ठेवावा. सुझुकीने आपल्या कंपनीत ४.९% स्टेक टोयोटा या कंपनीने घेण्यासाठी करार केला.

मूडीजने येस बँकेचे लॉन्ग टर्म रेटिंग कमी केले आणि आउटलूक निगेटिव्ह केला. रेटिंग Ba१ वरून Ba३ केले.
RBL बँकेच्या शेअरची पडझड थांबायचे नाव काढत नाही. आज हा शेअर लिस्टिंग डेच्या हायपेक्षाही कमी पातळीवर आला. आज या बँकेच्या व्यवस्थापनाने आपला होलसेल लोन पोर्टफोलिओचा गायडन्स कमी केल्यामुळे शेअर पडतच राहिला.

रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ने कॉफी डे च्या AGM ची तारीख (३० सप्टेंबरला ही AGM होणार होती) पुढे ढकलायला परवानगी दिली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७४५१ NSE निर्देशांक निफ्टी ११०४६ बँक निफ्टी २७८०४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.