आजचं मार्केट – २९ ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २९ ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ६०.११ प्रती बॅरल ते US $ ६०.४४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.७२ ते Rs ७२.०३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.१७ होता. VIX १६.९० वर होता. चिनी युआन US $१= ७.१७२९ होता.

आजपर्यंत आपण USA- इराण, USA- चीन, चीन- हाँगकाँग, UK मधील ब्रेक्झिट आणि UK च्या पंतप्रधानांनी बरखास्त केलेली संसद या विविध ठिकाणी असणाऱ्या जिओ पोलिटिकल ताणतणाव यांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि देशावर आणि पर्यायाने शेअर मार्केटवर काय परिणाम होईल याची चर्चा करत होतो. पण आता हेच जिओ पोलिटिकल ताणतणाव अगदी आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत.

पाकिस्तानच्या एका मंत्र्यानी घोषणा केली की पाकिस्तान आणि भारताचे ऑक्टोबर नोव्हेंबर २०१९ मध्ये युद्ध होईल. त्यातच भर म्हणून आज कांडला पोर्टवर आतंकवादी हल्ला होण्याची शक्यता जाहीर झाली आहे अडानी पोर्टने मुंद्रा पोर्टला ऍडव्हायझरी जारी केली आहे.

गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील सर्व बंदरांमध्ये धोक्याचा इशारा दिला आहे.

शेअरमार्केट किंवा कोणत्याही मार्केटला राजकीय. सामाजिक अस्थिरता आवडत नाही. मार्केट हाव आणि भीती या दोन जबरदस्त भावनांवर चालते. त्यामुळे भारताच्या माथ्यावर घोंगावत असलेल्या युद्धाच्या ढगांची भीती मार्केटला आणखी किती खाली खेचते हे बघावे लागेल.

२७ सप्टेंबर २०१९ पासून इंडिया बुल्स हौसिंग निफ्टीमधून बाहेर पडेल आणि नेस्लेचा शेअर निफ्टीमध्ये समाविष्ट होईल. २६ सप्टेंबरपासून रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स कॅपिटल, DHFL हे शेअर्स F & O मार्केटमधून बाहेर पडतील.

लक्ष्मी विलास बँकेचे CEO पार्थसारथी मुखर्जी यानी राजीनामा दिला. ३० ऑगस्ट २०१९ हा त्यांच्या कार्यकालाचा शेवटचा दिवस असेल.

कमर्शियल कोल मायनिंगसाठी १००% FDI ला सरकारने मंजुरी दिली.

शुगरसाठी ठरल्याप्रमाणे Rs ६२०० कोटी सबसिडीअरी मंजूर झाली. पण ही सबसिडी शुगरमीलला न मिळता थेट शेतकऱ्यांना मिळेल.

व्होल्टासला मुंबई मेट्रोकडून Rs २३३ कोटींची ऑर्डर मिळाली.

C G पॉवरचे चेअरमन गौतम थापर यांना त्यांच्या पदावरून हटविण्यासाठी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी परवानगी दिली. ही कारवाई शेअरहोल्डर्स आणि कंपनीचे हित लक्षात घेऊन केली असे जाहीर केले. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरमध्ये किंचित तेजी आली.

सरकार आता डायव्हेस्टमेन्टवर पुरा जोर देणार आहे. इंटरमिनिस्टरीयल समिती यावर विचार करत आहे. BEL, IRCON, SJVN, MOIL, RITES, NBCC या कंपन्या सरकारच्या डायव्हेस्टमेन्टच्या लक्ष्यावर आहेत. ही डायव्हेस्टमेन्ट शेअर बायबॅक प्रक्रियेच्या माध्यमातून केली जाईल. बायबॅकची साईझ आणि वेळ ही लवकरच निश्चित केली जाईल.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सिमेंटच्या किमतीमध्ये प्रती बॅग Rs ४० ते Rs ५० च्या दरम्यान दरवाढ करण्यात आली. या दरवाढीचा फायदा इंडिया सिमेंट, सागर सिमेंट, रामको सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांना होईल.

सूर्या रोशनी या कंपनीला IOC कडून Rs ८९ कोटींची ऑर्डर मिळाली त्यामुळे हा शेअर वाढला.

१ सप्टेंबर २०१९ हा दिवस महत्वाचा ठरणार आहे त्या दिवशीपासून चीनने जाहीर केलेली USA मधून होणाऱ्या US $७५ बिलियन आयातीवर वाढीव ड्युटी लागू होईल, आणी USA ने चीनमधून होणाऱ्या US $ ३०० बिलियन आयातीवर वाढीव ड्युटी लागू होईल.

१ सप्टेंबर २०१९ पासून मार्जिनट्रेडिंग विषयी सेबीने केलेले नवीन नियम लागू होतील. त्या आधी सेबीने ब्रोकर्स, ट्रेडिंग मेम्बर्सना त्यांच्याजवळ असलेल्या किंवा त्यांनी तारण ठेवलेल्या सर्व पार्टली पेड शेअर्सचा बॅलन्स क्लिअर करायला सांगितला आहे. त्यामुळे ३१ ऑगस्ट २०१९ रोजी म्हणजे उद्या मार्केटमध्ये उदाहरणादाखल येस बँक, इंडिया बुल्स हाऊसिंग, RIL, L & T, तसेच मारुती या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये जोरदार विक्री होण्याची शक्यता आहे.
NSE ने आज काही तांत्रिक अडचणींमुळे डेरिव्हेटीव्ह डेटाची भाव कॉपी प्रसिद्ध केली नाही. त्यातून आज मंथली एक्स्पायरीचा दिवस. आज झीरोदा या ब्रोकिंग हाऊसची ऑन लाईन साईट काही वेळ बंद होती. त्यामुळे शेअर्समध्ये विशेषतः F &O सेगमेंट ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेडर्सची गैरसोय झाली.

RBL बँकेच्या व्यवस्थापनाने खुलासा केला की सेबीने घालून दिलेल्या नियमानुसार कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर काम करते. आमची बँक ही प्रोफेशनली मॅनेज्ड बँक आहे. जे स्टाफला ESOP दिलेले आहेत त्यासंबंधातील नियम स्टाफवर बंधनकारक आहेत. या नियमांचा भंग करून कोणीही शेअर्स विकलेले नाहीत. या व्यवस्थापनाच्या स्पष्टीकरणानंतर बँकेचा शेअर पुन्हा वाढावयास सुरुवात झाली.

सरकार आता सार्वजनिक क्षेत्रातील प्रत्येक सरकारी बँकेला किती कॅपिटलायझेशनची जरूर आहे याचा शोध घेत आहे. मार्केटने आज बँक निफ्टीमधील शेअर्समध्ये जोरदार विक्री केली.

IIFL वेल्थ ही L & T फायनान्सचा वेल्थ मॅनेजमेंट बिझिनेस खरेदी करणार आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७०६८ NSE निर्देशांक निफ्टी १०९४८ बँक निफ्टी २७३०५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.