आजचं मार्केट – ३० ऑगस्ट २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३० ऑगस्ट २०१९

आज क्रूड US $ ६०.६९ प्रती बॅरल ते US $ ६१.१० प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.५० ते US $ १= Rs ७१.७८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.५६ तर VIX १७.१७ होते.

पुढील आठवड्यात सोमवार २ सप्टेंबर २०१९ रोजी आपल्या सर्वात आवडत्या देवाचे म्हणजे गजाननाचे आगमन घरोघरी आणि सार्वजनिक समारंभात होईल. त्याच्या आगमनासरशी सर्व विघ्ने दूर होऊन आपल्याला संपदा स्वास्थ्य, सुख याची प्राप्ती व्हावी ही शुभेच्छा

आज साप्ताहिक मासिक क्लोजिंग चांगले झाले.आज मार्केट आजच्या लोपासून ५०० पाईंट वाढले. त्याचबरोबर F & O मार्केटमधील सप्टेंबर सिरींजची सुरुवात चांगली झाली. विघ्नहर्त्या गजाननाची चाहूल लागली.

HDFC ने गृहफायनान्समधील आपला ९.२% स्टेक Rs २४३ प्रती शेअर ते Rs २४७ प्रती शेअर या भावाने विकला. कंपनीला या विक्रीतून Rs १६७८ कोटी मिळतील अशी अपेक्षा होती. HDFC ला भरपूर लिक्विडीटी मिळते आहे. गृह फायनान्समधल्या HDFC च्या स्टेकविक्रीची टांगती तलवार नाहीशी झाली. यामुळे HDFC, बंधन बँक, गृह फायनान्स हे सर्व शेअर्स वाढले. सरकारचा जोर पॉवर क्षेत्रावर आहे. विजेचे खांब हल्ली झिंकचे असतात. चांदी हे झिंकचे बायप्रॉडक्ट आहे.हिंदुस्थान झिंक ही कंपनी चांगला लाभांश देते. हिंदुस्थान झिंकचे प्रमोटर अनिल अग्रवाल हे कोल मायनिंगसाठी बोली लावण्याची शक्यता आहे.यामुळे हिंदुस्थान झिंक या शेअरमध्ये तेजी होती. चीन आणि USA यांच्यात पुन्हा बोलणी सुरु होत आहेत. त्यामुळे सर्व मेटल शेअर्स तेजीत होते.

इंडिगो मध्ये चालू असलेल्या दोन प्रमुख प्रमोटर्समधील विवादाबद्दल आज चेअरमननी सांगितले की रेग्युलर किंवा रिलेटेड पार्टीजमार्फत कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. सर्व जुन्या व्यवहारांना ऑडिटर्सने प्रमाणित केले आहे. याबाबतीत आम्ही नवीन आणि परिणामकारक पॉलिसी सेफगार्डस तयार केले आहेत. आम्ही MCA आणि SEBI ला कागदपत्र दिले आहेत. प्रमोटर्समध्ये बोलणी चालू आहेत आणि यातून काही तोडगा निघेल याविषयी आम्ही आशावादी आहोत. कंपनी ग्रोथवर लक्ष केंद्रित करत आहे.

सरप्लस फंड्स ट्रान्स्फर केल्यावर RBI OMO ( ओपन मार्केट ऑपरेशन्स) च्या खरेदीमध्ये कपात करू शकते.

NTPC त्यांच्या कोल बिझिनेससाठी वेगळी सबसिडीअरी बनवणार आहे.

नेस्लेने Rs १० किमतीचे कोटेड वेफरचे पॅकेट लाँच केले.

नीती आयोगाच्या पुढाकाराने स्ट्रॅटेजीक विक्रीवर विचार करण्यासाठी बैठक बोलावली आहे.

IDBI बँक रेपोरेट लिंक्ड घर कर्ज आणि ऑटो कर्जाची योजना १० सप्टेंबर २०१९ पासून लाँच करत आहे

स्पाईस जेटने २५ सप्टेंबरपासून ६ नवी उड्डाणे जाहीर केली.

पहिल्या तिमाही मध्ये GDP मधील ग्रोथ ५% होती. ही २५ महिन्यातील किमान ग्रोथ आहे.

वेंकीज बॅक्टेरिया फ्री एग्ग्ससाठी नवीन युनिट सुरु करणार आहे. वेंकीजच्या काही अंड्यांवर ++ असे चिन्ह असते या अंड्यांचा भाव दुप्पट असतो अशी माहिती मिळते. चिकनचा खप प्रती माणशी वाढत आहे. श्रावण महिना आज संपेल त्यामुळे मद्यार्क आणि चिकन अंडी यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येईल.

आज विश्वप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांचा ८९ वा वाढदिवस होता. या दिवशी आपण त्यांच्या काही विचार जाणून घेऊ. ‘शेअर मार्केटमध्ये पहिला नियम असा आहे की आपली भांडवल सुरक्षित ठेवणे आणि दुसरा नियम हा आहे की पहिल्या नियमाचे वारंवार स्मरण करणे. जेव्हा सर्व लोक खरेदीची शिफारस करत असतील तेव्हा तो शेअर खरेदी करू नका. शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी अतिशय हुशार माणसाची जरुरी नसते. शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी संयम आणि धैर्य यांची जरुरी असते. यशस्वी होण्यासाठी पुस्तके वाचून ज्ञान मिळवणे जरुरीचे आहे. ज्या उद्योगाविषयी आपल्याला पुरेसे ज्ञान नसेल त्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करू नका.’

आज माननीय अर्थमंत्र्यानी बँकांच्या मर्जरविषयी आणि एकंदर बँकिंग उद्योगात सुधारणा आणण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली.

PNB, OBC, युनायटेड बँक यांची एक बँक बनवली जाईल. या तिन्ही बँकांत वापरली जाणारी टेक्नॉलॉजी कम्पॅटिबल आहे. या बँकेच्या ११४३७ शाखा असतील. या बँकेचे नाव PNB असेल.

कॅनरा आणि सिंडिकेट यांचा विलय करून दुसरी बँक बनवली जाईल. या बँकेच्या एकूण मुख्यतः दक्षिण भारतात १०३४२ शाखा असतील. या बँकेचे नाव कॅनरा बँक असेल

युनियन बँक, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक एकत्र करून बँक बनवली जाईल. या बँकेच्या ९६०९ शाखा असतील. या बँकेचे नाव युनियन बँक ऑफ इंडिया असे असेल

इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक एकत्र करून बँक बनवली जाईल. या बँकेचे नाव अलाहाबाद बँक असे असेल.
वरील चार बँका SBI आणि बँक ऑफ बरोडा अशा ६ आणि बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब आणी सिंध बँक, सेंट्रल बँक, युको बँक, IOB, बँक ऑफ इंडिया अशा सहा क्षेत्रीय बँका मिळून आता सार्वजनिक क्षेत्रातील २७ बँकांऐवजी १२ बँका राहतील.
सरकार बँकांना खालीलप्रमाणे भांडवल पुरवेल. युनियन बँक Rs ११७०० कोटी, PNB Rs १६००० कोटी, बँक ऑफ इंडिया Rs ११७०० कोटी, कॅनरा बँक Rs ६५०० कोटी , बँक ऑफ बरोडा Rs ७००० कोटी, IOB Rs ३८०० कोटी, यूको बँकेला Rs २१०० कोटी, सेंट्रल बँकेला Rs ३३०० कोटी,. इंडियन बँक Rs २५०० कोटी, पंजाब आणि सिंध बँक Rs ७५० कोटी.
त्याचबरोबर सरकारने कोणालाही नोकरीवरून काढून टाकण्यात येणार नाही. कोणत्याही कर्मचार्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. असे आश्वासन दिले. ही मर्जर्स करताना दशा दिशा आणि गंतव्य यांचा विचार केला आहे. टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म आणि प्रत्येक बँकेचे वर्ककल्चर कम्पॅटिबल आहेत याचा विचार केला आहे. स्ट्रॉंग बँक आणि WEAK बँक असा विचार केलेला नाही. बँकेची साईझ स्केल आणि डेप्थ यांचा विचार केला आहे.

बँकांमध्ये हुशार आणि कर्तृत्ववान माणसांना आकर्षित करण्यासाठी साजेसा मोबदला दिला जाईल. एक चीफ रिस्क ऑफिसर नेमला जाईल.

मार्केटवर मंगळवारी या घोषणांचा परिणाम विशेषतः बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तात्पुरती तेजी येण्यात कदाचित होईल. पण फार जास्त किमतीला शेअर पोहोचला असेल तर खरेदी करु नका कारण या घोषणांमुळे बँकांच्या फंडामेंटल्समध्ये काहीही फरक पडलेला नाही. जरी काही शेअर्स खरेदी केले तरी दिवस अखेरीस ते विकून प्रॉफिट/लॉस बुक करा. अन्यथा वरच्या किमतीत खरेदी केलेले शेअर्स तुमच्याकडे पडून राहण्याची शक्यता आहे. गेल्यावेळच्या बँकांच्या रिकॅपिटलायझेशनच्या वेळी असाच अनुभव आला होता.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७३३२ NSE निर्देशांक निफ्टी ११०२३ बँक निफ्टी २७४२७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.