Monthly Archives: September 2019

आजचं मार्केट – ३० सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १२ – १३ऑक्टोबर आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ३० सप्टेंबर २०१९

आज क्रूड US ६१.५६ प्रती बॅरल ते US $ ६१.९५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.४५ ते US $ ७०.७५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९९.१६ VIX १६.२५ होते.

आज RBI ने लक्ष्मी विलास बँकेला PCA ( प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन) लागू केले. या तरतुदीनुसार बॅन्केवर नवीन शाखा उघडणे, नवीन कर्ज देणे यासारख्या गोष्टींवर निर्बंध येतात. त्यामुळे लक्ष्मी विलास बँक आणि इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स पडले.

सिप्लाच्या गोवा प्लॅन्टचे USFDA ने केलेल्या तपासणीत १२ त्रुटी दाखवल्या. म्हणून हा शेअर पडला.

ग्लेनमार्क फार्माच्या गोवा येथील असलेल्या प्लांटच्या तपासणीत USFDA ने २ त्रुटी दाखवल्या.

हिरो मोटो कॉर्पने बाईक्सच्या काही मॉडेल्सवर Rs २००० पर्यंत डिस्काउंट जाहीर केला.

PAYTMने पेमेंट केले तर Rs १००००च्या व्हाउचर्सची घोषणा केली.

TVS मोटर्सने काही मॉडेल्सवर Rs ७००० पर्यंत सूट जाहीर केली.

ICRA ने इन्फिबीमचे रेटिंग कमी केले म्हणजे ‘A’ रेटिंग बदलून ‘A -‘ केले.

चीनमधून आयात होणाऱ्या डक्टाईल आयर्न पाइप्सवरची इम्पोर्ट ड्युटी वाढवली.यामुळे जिंदाल SAW या कंपनीचा शेअर वाढला.

APTEL ने प्रयागराज पॉवर च्या शेअर ट्रान्सफरला मंजुरी दिली. रिलायन्स कॅपिटलने २७-३० सप्टेंबर दरम्यान Rs ७२.६५ कोटी कर्ज भरले. कंपनी कर्जाची पूर्णपणे परतफेड करत आहे. कंपनी तारण म्हणून ठेवलेले सर्व शेअर्स सोडवेल.
मारुतीच्या XL या मल्टिपर्पज व्हेइकलसाठी ६ महिन्यांचा वेटिंग पिरियड लागेल. आतापर्यंत ८००० गाड्यांसाठी बुकिंग झाले.

नोव्हेंबर २०१९ च्या अखेरपर्यंत BPCL मधले विनिवेश सरकार पूर्ण करेल.

सरकार कर्जबाजारी झालेल्या इन्फ्रा कंपन्यांचे पॉवर प्लांट खरेदी करू शकते. IL & FS चा CUDALUR येथील प्लांट खरेदी करण्यात NTPC ,अडाणी ग्रुप सकट १३ कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे.

आज IRCTCचा IPO ओपन झाला. जवळ जवळ सर्व ब्रोकरेज हाऊसेसनी या IPO मध्ये सबस्क्राईब करा असा सल्ला दिला होता. आज पहिल्या दिवशीच IPO पूर्णपणे भरला.

आज इंडिया बुल्स हौसिंग फायनान्सचा शेअर सपाटून पडला. त्यांचेबरोबर ज्या सात बँकांनी या ग्रुपला कर्ज दिली आहेत त्या बँकांचे शेअर्सहि मंदीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८६६७ NSE निर्देशांक निफ्टी ११४७४ बँक निफ्टी २९१०३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १२ – १३ऑक्टोबर आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २७ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६२.२३ प्रती बॅरल ते US $ ६२.६८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=Rs ७०.६२ ते US $ १=Rs ७०.९६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९९.२० हता VIX १६.३० होते. आज ऑक्टोबर सिरीजचा पहिला दिवस. आतापर्यंत शॉर्टकव्हरिंगमुळे मार्केट तेजीत होते. पण आता यामुळे येणारी तेजी संपली.

NMDC चा नागरनार प्लांट विकणार आहे. हा प्लांट छत्तीसगढ राज्यात आहे. हा प्लांट पूर्ण व्हायला ८ ते १० महिने लागतील. त्याआधीच हा प्लांट विकण्याचा सरकारचा इरादा आहे.

आज आरती इंडस्ट्रीजची शेअर्स एक्स बोनस झाले.

नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी तयार करण्यासाठी ३ ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची बैठक आहे. याचा फायदा एजीस लॉजिस्टिक, नवकर कॉर्प, कंटेनर कॉर्पोरेशन, TCI, अलकार्गो, महिंद्रा लॉजिस्टिक, रेंडिंग्टन, यांना होईल. या क्षेत्रात गुंतवणूक येणे जरुरीचे आहे.

विमा क्षेत्रातील परदेशी कंपन्या भारतात येण्यास उत्सुक आहेत.

E-कॉमर्स कंपन्यांची विक्री वाढत आहे.

भारतात गॅसच्या किमती कमी होतील. याचा अनुकूल परिणाम टाईल्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर होईल. निटको, मुर्डेश्वर, कजारिया सिरॅमिक्स.

सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्यांना सांगितले की त्यांच्याजवळ जी कॅश पडून आहे त्याचा उपयोग भांडवली गुंतवणुकीसाठी करा किंवा लाभांश द्या.त्यामुळे हल्ली सरकारी कंपन्यांचे शेअर्स तेजीत असतात.

आज सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील ८ सरकारी बँकांच्या Rs ३२९०६ कोटी रिकॅपिटलायझेशनसाठी नोटिफिकेशन जारी केले.

BPCL च्या ऍसेटसाठी कंपन्यांनी ड्यू डिलिजन्स चालू केला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८८२३ NSE निर्देशांक निफ्टी ११५१२ बँक निफ्टी २९८७६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २६ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १२ – १३ऑक्टोबर आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २६ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $६२.२३ प्रती बॅरल ते US $ ६२.३१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८९ ते US $१=Rs ७०.९२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.५६ तर VIX १६.६३ होते.

२ ऑक्टोबर २०१९ पासून भारताला सिंगल प्लास्टिक वापरापासून मुक्त करायचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून CAIT ( कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) या ट्रेडर्सच्या संघटनेने ग्राहकांना कोणतेही सामान आणण्यासाठी पिशवी घेऊन येण्याचे आवाहन केले आहे.

२२ फूड कंपन्यांनी आज जाहीर केले की आम्ही सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणार नाही. या मध्ये डाबर, HUL, मदर डेअरी, नेस्ले, मॅकडोनाल्ड यांचा समावेश आहे. कोर्टानेही सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. सरकारच्या घोषणेनंतर पेपर आणि ताग उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. उदा मालू पेपर, ओरिएंट पेपर, JK पेपर, इंटरनॅशनल पेपर, पदमजी पल्प, TNPL, शेषशायी पेपर, हुतामाकी PPL, वेस्ट कोस्ट पेपर. CHEVIOT, लुडलो ज्यूट. GLOSTER

सप्टेंबर एक्स्पायरीपासून खाली दिलेल्या १२ कंपन्यांचे शेअर्स F & O सेगमेंट मधून बाहेर पडतील. (१) MCX (२)ओरॅकल (३) रेमंड (४) DHFL (५) EIL (६) कजारिया सिरॅमिक्स (७) IDBI बँक (८) हिंदुस्थान झिंक (९) बिर्ला सॉफ्ट (१०) अरविंद (११) रिलायन्स कॅपिटल (१२) रिलायन्स इन्फ्रा आणि इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स हा शेअर निफ्टी मधून बाहेर पडेल आणि नेस्ले या आंतरराष्ट्रीय कंपनीचा निफ्टीमध्ये समावेश होईल

बजाज ऑटो, बँक ऑफ इंडिया, CESC, ICICI PRU, पिरामल एंटरप्रायझेस, ग्रासिम, श्री सिमेंट, IDFC फर्स्ट बँक, JSW स्टील या शेअर्समधील काँट्रॅक्टस ८५% पेक्षा जास्त रोल ओव्हर झाली .

आता F & O सेगमेंटमधील जवळ जवळ सर्व शेअर्समध्ये डिलिव्हरी घ्यावी लागेल. नाहीतर एक्स्पायरीच्या आधी एक्झिट करावे लागेल. स्पेक्युलेशन रोखणे हा यामागील उद्देश आहे. पूर्वी ४-५ कंपन्यांचे शेअर बॅनमध्ये असत. आता या बॅनच्या मार्गाने होणाऱ्या सट्टयाला आळा बसेल.

स्पाईस जेटने २७ ऑक्टोबर २०१९ पासून भारतात ४६ नवीन उड्डाणे लाँच केली.

२३ सप्टेंबर २०१९ पासून म्युच्युअल फंड अनलिस्टेड CP मध्ये नवीन गुंतवणूक करू शकणार नाही. तसेच आपल्या AUM ( ऍसेट अंडर मॅनेजमेंट) च्या १०% पेक्षा जास्त गुंतवणूक अनलिस्टेड NCD ( नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स) मध्ये करू शकणार नाहीत.

सरकार आता आपल्या डायव्हेस्टमेन्टचा वेग आणि कक्षा वाढवणार आहे. सरकार आता हिंदुस्थान झिंक, कंटेनर कॉर्पोरेशन, BEML, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधील आपला स्टेक डायव्हेस्ट करणार आहे. तसेच रेल्वेशी संबंधित RAILTEL आणि IRFC या कंपन्यांचा IPO लवकरच आणण्यात येईल.

येस बँकेने कॅपिटल उभारण्यासाठी RBI कडे अर्ज केला आहे.

आपल्या पेट्रोल बिलाचे किंवा डिझेल बिलाचे पेमेंट क्रेडिट केल्यावर मिळणारा Rs ०.७५ प्रती लिटर कॅश बॅक १ ऑक्टोबर २०१९ पासून मिळणार नाही. हा बायबॅक ऑइल मार्केटिंग कंपन्या देत असल्यामुळे त्यांचे रिटेलिंग मार्जिन वाढेल.
ऑक्टोबर २०१९ हा महिना पांच आठवड्यांचा आहे आणि या महिन्याची F & O सेगमेंटची एक्स्पायरी ३१ ऑक्टोबरला असेल. या महिन्यात मार्केट गांधी जयंती, विजयादशमी, महाराष्ट्रामधील मतदान, दिवाळी यासाठी मार्केट चार दिवस बंद राहील. या महिन्यात चीन आणि USA यांच्यातील ट्रेड वाटाघाटी अंतिम फेरीत असतील. ४ ऑक्टोबर २०१९ रोजी RBI आपले द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर करेल. १ ऑक्टोबर २०१९ पासून GST चे सुधारित दर अमलात येतील. सेबीने एक्स्पायरीच्या दिवशी जर कॉन्ट्रॅक्ट लाईव्ह असेल तर त्या शेअर्सची फिझिकल डिलिव्हरी द्यावी/ घ्यावी लागेल असा नियम केला आहे. त्यामुळे एक्स्पायरीच्या आधी बहुसंख्य ट्रेडर्स पोझिशन SQUARE करण्याचा किंवा रोल ओव्हर करण्याचा प्रयत्नात असतील.ऑक्टोबर महिन्यात कंपन्या आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

इन्फोसिस ११ ऑक्टोबर २०१९ रोजी आपले दुसऱ्या तिमाही निकाल जाहीर करेल. २७ ऑक्टोबर २०१९ रोजी BSE आणि NSE या दोन्ही एक्स्चेंज मध्ये मुहूर्त ट्रेडिंग असेल. तसेच ३१ ऑक्टोबर २०१९ हा ब्रेक्झिट ( UK युरोपियन युनियनमधून बाहेर पडेल) साठी अखेरचा दिवस आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८९८९ NSE निर्देशांक निफ्टी ११५७१ बँक निफ्टी ३०००२ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २५ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १२ – १३ऑक्टोबर आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २५ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६२.०५ प्रती बॅरल ते US $ ६२.५९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.०१ ते US $१=Rs ७१.१२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.२० तर VIX १६.८५ होता.

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगाची तयारी त्यांचे विरोधक करत आहेत.

सौदी आरामकोची उत्पादनक्षमता पुन्हा पूर्ववत झाली. ठरलेल्या किंवा जाहीर केलेल्या तारखेच्या आधीच उत्पादन पूर्वस्थितीला आले. त्यामुळे आज क्रूडचा दर थोडा कमी झाला.

सरकार त्यांच्या बॉरोइंग कॅलेंडरमध्ये कोणताही बदल करणार नाही.

पॉवर ग्रीड ही कंपनी आपले Rs २०००० कोटींचे असेट्स एका वर्षात दोन टप्प्यात विकणार आहे. या ऍसेटमध्ये अडाणी एंटरप्रायझेस, अडाणी ट्रान्समिशन KEC या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे आज पॉवर ग्रीडचा शेअर ६% नी वाढला.

पॉवर ट्रेडिंग कंपनी आता आपले नॉन कोअर बिझिनेस विकणार आहे. कंपनी PTC फायनान्सियल सर्व्हिसेस आणि PTC एनर्जी या कंपन्यातील आपला स्टेक विकून Rs २००० कोटी गोळा करेल.

अल कार्गो लॉजिस्टिक ‘गती’ या कंपनीमध्ये कंट्रोलिंग स्टेक घेणार आहे

सरकार SUTTI मधील आपला ऍक्सिस बँकेतील ५.३६% आणि ITC मधील ७.९७% स्टेक प्रथम भारत ETF २२ आणि नंतर OFS च्या माध्यमातून विकणार आहे.

मारुतीने आपल्या काही मॉडेल्सच्या किमती सुमारे Rs ५००० नी कमी केल्या.

बजाज ऑटोने आपल्या काही मॉडेल्सच्या किमतीमध्ये Rs ६००० पर्यंत कपात जाहीर केली. पल्सर Rs ३८०० प्लॅटिना Rs २५०० तर डॉमिनार वर Rs ६००० ची सूट जाहीर केली.

टी सी एस ला वेस्टर्न आशियातील QNB ग्रुपकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिसेससाठी ऑर्डर मिळाली.
ITC या कंपनीने आपल्या काही उत्पादनांच्या किमती कमी केल्या. VIVAL, आशीर्वाद आटाच्या किमती कमी केल्या.
या सर्व कंपन्या असे सांगत आहेत की त्यांना कॉर्पोरेट टॅक्समध्ये मिळालेल्या सवलतींमधील काही भाग त्या ग्राहकांकडे पास ऑन करत आहेत.

स्पाईस जेट आपल्या कार्गो युनिटचा IPO आणणार आहे.

काल RBI ने पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लावले. या बँकेने काही रिअल्टी क्षेत्रातील कंपन्यांना दिलेली कर्जे NPA झाली म्हणून ही उपाययोजना केली गेली. याचा परिणाम म्हणजे आज सोशल मेडियावर सरकार काही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँका बंद करण्याचा निर्णय घेत आहेत असा मेसेज दिला गेला. RBI आणि केंद्र सरकारचे फायनान्सियल सेक्रेटरी यांनी लोकांना आश्वस्त केले की सरकारचा असा काहीही विचार नाही.

२६ सप्टेंबर २०१९ रोजी १२ कंपन्यांचे शेअर्स F & O सेगमेंटमधून बाहेर पडतील.

हेक्सावेअर ही कंपनी IT निर्देशांकात समाविष्ट होईल.

आठवड्याचे सुरुवातीचे दोन दिवस कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्यामुळे मार्केट वाढले. कारण यामुळे EPS मध्ये फरक पडणार आहे. आधी मार्केट मंदीत होते. ट्रेडरनी शॉर्ट पोझिशन घेतल्या होत्या. त्यामुळे शॉर्टकव्हरिंग आले. त्यामुळे दोन दिवस कोणताही शेअर वाढत होता. पण आता तसे होणार नाही कोणत्या कंपन्या किती टॅक्स भरत आहेत आणि त्यांना या कॉर्पोरेट टॅक्समधील सवलतींचा किती फायदा होईल याचा विचार करूनच आता खरेदी होईल. ‘सब घोडे बारा टक्के’ असे होणार नाही.

आज काही बातम्यांशी संबंधित शेअर्स आणि IT क्षेत्रातील शेअर्स सोडून बाकी शेअर्समध्ये मंदी होती. ही मंदी दिवसाच्या शेवटी वाढतच गेली. आज बँकांच्या शेअरमध्ये सपाटून विक्री झाली

उद्या F & O सेगमेंटमधील काँट्रॅक्टसची सप्टेंबर महीन्याची एक्स्पायरी आहे

IRCTC ( इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) या सरकारी कंपनीचा Rs ६४५ कोटींचा IPO सोमवार ३० सप्टेंबर २०१९ ला ओपन होत आहे. हा IPO ३ ऑक्टोबरला बंद होईल . या IPO चा प्राईस बँड Rs ३१५ ते Rs ३२० आहे.मिनिमम लॉट ४० शेअर्सचा आहे. किरकोळ गुंतवणूकदार आणि कंपनीचे कर्मचारी यांना Rs १० डिस्काउंट आहे. या इशुमधील सर्व शेअर्स ऑफर फॉर सेल आहे. आज रेल्वेशी संबंधित म्हणजेच RITES, RVNL, टिटाघर वॅगन्स, IRCON हे शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८५९३ NSE निर्देशांक निफ्टी ११४४० बँक निफ्टी २९५८६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २४ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २४ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६४.०८ प्रती बॅरल ते US $ ६४.४० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.७९ ते US =Rs ७०.९४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.६० होता VIX १७.९० होते.

मार्केट गेले दोन दिवस कमालीच्या तेजीत होते. त्यामुळे ही तेजी आज थोडी विश्रांती घेईल हे भाकीत आज खरे ठरले. या कन्सॉलिडेशनमध्ये चांगले शेअर खरेदी करण्याची संधी किरकोळ गुंतवणूकदारांना मिळाली.

सरकार लवकरच इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी जाहीर करेल. इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी रिचार्जेबल लिथियम-इऑन बॅटरीचा मुख्य खर्च असतो. या बॅटरीसाठी प्रामुख्याने लिथियम लागते हे लिथियम बोलिव्हियामध्ये विपुल प्रमाणात मिळते. भारताने बोलिव्हियाबरोबर लिथियम पुरवठा करण्यासाठी करार केला आहे. या बॅटरीसाठी किलोवॅटमागे Rs २००० सबसिडी मिळणार आहे. सध्या कॉर्पोरेट टॅक्स खूप कमी केलेला आहे. याचा फायदा एक्झाईड, JBM, अमरराजा बॅटरी हिमाद्री केमिकल्स, स्नायडर, टाटा केमिकल्स या कंपन्यांना होईल. त्यामुळे बॅटरी उत्पादनासाठी संबंधित कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

रुपया मजबूत होत आहे. ११ ऑक्टोबर २०१९ रोजी इन्फोसिस आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल. दुसऱ्या तिमाहीचे निकाल फारसे चांगले येण्याची शक्यता कमी आहे. कॉर्पोरेट टॅक्समधील सवलतींचा फायदा IT सेक्टरला होणार नाही. कारण हे आताच २२% कॉर्पोरेट टॅक्स भरत आहेत. हीच कथा फार्मा सेक्टरमधील कंपन्यांची आहे. त्यामुळे IT आणि फार्मा सेक्टरमधील कंपन्या या तेजीच्या वाहत्या गंगेत मंदीत आहेत.

सरकार नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी तयार करत आहे. याचा फायदा स्नोमॅन लॉजिस्टिक, महिंद्रा लॉजिस्टिक, गती, एजीस, BALMER लॅरी, कंटेनर कॉर्पोरेशन, अलकार्गो या कंपन्यांना होईल.

SAT ने C G पॉवर कंपनीच्या सेबीने केलेल्या तपासणीचा अहवाल SAT ला सादर करायला सांगितला. या अहवालाची एक प्रत गौतम थापरना द्यायला सांगितली.

पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटीव्ह बँकेच्या कारभारावर RBI ने बंधने घातली आहेत. या अन्वये ही बँक आता डिपॉझिट घेऊ शकणार नाही किंवा कर्ज देऊ शकणार नाही. ज्या लोकांचे पैसे या बँकेत आहेत त्यांना सहा महिन्यातून Rs १००० काढता येतील. ही बँक गोव्यातील एका बँकेबरोबर टेकओव्हर साठी बोलणी करत होती.

टी सी एसने फायनान्सियल सर्व्हिसेससाठी SaaS लाँच केले.

सरकार लवकरच सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांचे आणखी एकदा Rs ५५२५० कोटी गुंतवून रिकॅपिटलायझेशन करण्याची शक्यता आहे.

FITCH ने भारतीय बँकांच्या लोन ग्रोथचे फोरकास्ट १३.५% वरून ११% पर्यंत कमी केले.

सरकार नेहेमी कर्ज काढत असते. कॉर्पोरेट टॅक्समधील सवलतींमुळे सरकारचे उत्पन्न Rs १४५००० कोटींनी कमी होणार आहे. त्यामुळे ही घट भरून काढण्यासाठी आणि इतर सरकारी योजनांसाठी सरकार विविध उपायांचा अवलंब करण्याची शक्यता आहे. कारण अर्थमंत्रयांनी हे स्पष्ट केले की सरकार आपला विविध योजनांवर आणि कामांवर खर्च कमी करणार नाही. यात स्वदेशातुन तसेच परदेशातून कर्ज उभे करण्याचा पर्याय आहे. हे कर्ज सरकार केव्हा, कोणत्या प्रकारे, कोठल्या मार्गाने आणि किती व्याजाच्या दराने उभे करणार याची योजना म्हणजेच “बॉरोइंग कॅलेंडर’ ची सरकार सोमवारी घोषणा करेल.

सध्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये ज्या सवलती दिल्या आहेत त्यांचा फायदा घ्यायचा असेल तर त्या कंपन्यांना आता मिळत असलेल्या कोणत्याही सवलतींचा फायदा घेता येणार नाही. डाबर, मेरिको, गोदरेज कन्झ्युमर या कंपन्या २५.६% टॅक्स भरतात. त्यामुळे या कंपन्यांना नवीन योजनेत जाणे फायदेशीर होणार नाही. या कंपन्या आपल्या उत्पादनांचा भाव कमी करणार नाहीत. टॅक्समधील सवलती बंद होतील तेव्हा या कंपन्या नव्या योजनेत शिफ्ट होतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९०९७ NSE निर्देशांक निफ्टी ११५८८ बँक निफ्टी ३०१८३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २३ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २३ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६४.९१ प्रती बॅरल ते US $ ६५.०१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.९० ते US $१=Rs ७१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.६५ होता तर VIX १७.५१ होता.

सध्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे USA च्या दौऱ्यावर आहेत. ह्यूस्टन येथे त्यांचा ‘HOWDY MODI’ हा कार्यक्रम USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी एनर्जी क्षेत्रातील नामवंत उद्योगपती हजर होते. ट्रम्प यांनी भारताबरोबर मिनी डील करण्यात येईल असे सांगितले. पेट्रोनेट LNG ही भारतीय कंपनी TELLURIN कंपनीच्या LOUISANA प्रोजेक्टमध्ये US $ २.५ बिलियनची (१८% स्टेक) गुंतवणूक करेल. ही कंपनी भारताला पुढील ४० वर्षे प्रती वर्षी ५ मिलियन मेट्रिक टन LNG चा पुरवठा करेल. यामुळे भारत ही गॅस बेस्ड अर्थव्यवस्था बनेल. आणखीही काही गुंतवणुकीसाठी MOU केले जातील अशी अपेक्षा आहे.

माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली कॉर्पोरेट आयकरातील कपात, FPI ला लावलेला कॅपिटल गेन्सवरील सरचार्ज रद्द करण्याची केलेली घोषणा, GST कौन्सिलने केलेली विविध दरात कपात, USA आणि चीन यांच्यातील ट्रेडवार संबंधातील आलेला समजूतदारपणा आणि दोन्हीही देशांचा सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे भारतीय मार्केटमध्ये गेले दोन दिवस आलेली तेजी. त्याला सपोर्ट मिळाला मोदींच्या USA दौऱ्याचा. या दौऱ्यामुळे USA आणि भारतात नवे नवे करार होतील. तसेच नवीन FDI भारतात येईल. आज USA शी संबंधित मल्टिनॅशनल कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. कोलगेट, GILLETTE, फायझर, हनीवेल ऑटोमेशन, व्हरपुल, सिमेन्स

GST कौन्सिलने हॉटेल रूमच्या भाड्यावरील GST मध्ये कपात केली. Rs १००० च्या खाली GST लागणार नाही. Rs १००१ ते Rs ७५०० पर्यंत भाड्यावर १२% GST तर Rs ७५०१ आणि त्यावरील भाड्यावर १८% GST लागेल असे जाहीर केले. कॅफिनेटेड पेयांवर GST चा दर वाढवला. याचा परिणाम वरूण बिव्हरेजीस, कॅफे कॉफी डे, NESTLE, या कंपन्यांवर होईल.

इंडोको रेमिडीजच्या गोवा युनिटच्या UK रेग्युलेटरी ऑथॉरिटीने केलेल्या १६ ते २० सप्टेंबरच्या तपासणीत २ त्रुटी दाखवल्या.
पंजाब आणि सिंध बँकेने एरा इन्फ्रा या कंपनीला दिलेले Rs ३० कोटींचे कर्ज ‘फ्रॉड’ म्हणून घोषित केले.
केंद्र सरकारने स्क्रॅपेज पॉलिसीचा आराखडा बनवला आहे. या प्रमाणे शहरी एरियात १५ वर्षांपेक्षा जुन्या ट्रकना प्रवेश दिला जाणार नाही. १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना प्रत्येक सहा महिन्यांनी फिटनेस सर्टिफिकेट घ्यावे लागेल. १५ वर्षांपेक्षा जुन्या आणि नव्या वाहनांवर वेगवेगळ्या दराने रोड टॅक्स लावला जाईल. जुने वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी केले तर रोड टॅक्समध्ये सूट मिळेल. जुने वाहन स्क्रॅप केल्यावर स्क्रॅपेज सर्टिफिकीट दिले जाईल आणि हे ट्रांसफरेबल असेल. हा ड्राफ्ट वेगवेगळ्या मंत्रालयांना त्यांच्या अभिप्रायासाठी आणि सूचनांसाठी पाठवला आहे.

RBI ने बँकांना आपले कर्जावरील व्याजाचे दर रेपो रेट किंवा FBIL ने ठरवलेल्या एक्स्टर्नल बेंच मार्कशी सलंग्न करायला सांगितले आहे. त्याप्रमाणे SBI ने आज आपले कर्जावरील व्याजाचे दर १ ऑक्टोबर २०१९ पासून एक्स्टर्नल बेंच मार्क रेटशी सलंग्न असतील असे जाहीर केले.

आता थोडेसे थॉमस कूक या कंपनीच्या लिस्टेड शेअर विषयी. थॉमस कूक ही लंडन येथे असलेली कंपनी दिवाळखोरीत निघाली. पण थॉमस कूक ( इंडिया) ही कंपनी फेअर फॅक्स या कॅनडियन कंपनीच्या मालकीची आहे.त्यांचा या कंपनीत ६७.६% स्टेक आहे. या भारतीय कंपनीचे फंडामेंटल्स ठीक आहेत.आपल्याजवळ हे शेअर्स असतील तर घाबरून जाऊन ते विकून टाकू नयेत म्हणून हे लिहिले.

ITC ही एक बहुउद्देशीय वेलडायव्हर्सिफाइड कंपनी आहे. ही कंपनी पेपर, सिगारेट, बिस्कीट आणि इतर पेये, हॉटेल व्यवसाय या उद्योगात आहे. हल्ली झालेल्या सिंगल प्लास्टिकवरील बंदी, E- सिगारेट वरील बंदी, GST कौन्सिलने रूमरेन्टवरील GST मधे केलेली कपात आणि कॉर्पोरेट टॅक्समधील कपात या सर्व गोष्टींचा फायदा ITC ला होईल.
ब्रिटानिया या कंपनीच्या शेअरने एका महिन्यात ४०% रिटर्न दिला. कोलगेट आज ऑल टाइम हायवर होता.

BPCL ह्या ऑइल मार्केटिंग कंपनीतील आपला स्टेक सरकार आंतरराष्ट्रीय किंवा भारतीय कंपनीला विकण्याची शक्यता आहे. या कंपनीचा विस्तार बिना, नुमालीगढ, कोची येथील रिफायनरीज, असंख्य पेट्रोलपंपामार्फत ऑइल मार्केटिंग, आणि खूप मोठी जमीन बँक असा आहे यामुळे ही कंपनी जर सरकारने योग्य रीतीने किंमत ठरवून विकली तर सरकारच्या स्टेकसाठी खूप किंमत मिळेल. आज या बातमीने BPCL चा शेअर खूप वाढला. सरकारने आता दोन सरकारी कंपन्यांचे मर्जर करून डायव्हेस्टमेन्ट करून फायदा होत नाही नुसती आकडेमोड होते, नवीन तंत्रज्ञान, व्यवस्थापन तंत्र येत नाही म्हणून अशा प्रकारची डायव्हेस्टमेन्ट करायची नाही असे ठरवले आहे.
BSE चा निर्देशांक सेन्सेक्स ३९०९० NSE निर्देशांक निफ्टी ११६०० बँक निफ्टी ३०५६६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २० सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २० सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६४.६६ प्रती बॅरल ते US $ ६४.८२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.९० ते US $१=Rs ७१.०९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.२६ होता VIX १६.८० होता.

आज सकाळी माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन टॅक्स संबंधात काही सवलतीं घोषित केल्या.

वित्तीय वर्ष २०१९-२०२० पासून कोणत्याही डोमेस्टिक कंपनीला २२% दराने कॉर्पोरेट टॅक्स पेमेंट करण्याचे ऑप्शन राहील. पण या कंपनीला कोठल्याही प्रकारचे एक्झम्शन क्लेम करता येणार नाही. या योजनेखाली सर्व प्रकारचे चार्जेस समाविष्ट करून कॉर्पोरेट टॅक्सचा इफेक्टिव्ह दर २५.१७% राहील. हे ऑप्शन एक्झरसाईझ केलेल्या कंपन्यांना MAT ( मिनिमम अल्टर्नेट टॅक्स) च्या तरतुदी लागू होणार नाहीत.

२०१९-२०२० या वित्तीय वर्षात सुरु होणाऱ्या आणि उत्पादन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना १५% कॉर्पोरेट टॅक्स पेमेंट करण्याचे ऑप्शन राहील. या ऑप्शनमध्ये कॉर्पोरेट टॅक्सचा इफेक्टिव्ह दर १७.०१% राहील. या कंपनीने आपले उत्पादन ३१ मार्च २०२३ पूर्वी चालू केलेले असले पाहिजे.

ज्या कंपन्यांना टॅक्स हॉलिडे किंवा काही सवलती मिळत असतील त्यांना हा टॅक्स हॉलिडे किंवा सवलतींचा काळ संपल्यावर २२% कॉर्पोरेट टॅक्स भरण्याचे ऑप्शन घेता येईल. या कंपन्यांच्या बाबतीत MAT १८.५% वरून १५% केला आहे. ही ऑप्शन एकावेळीच एक्झरसाईझ करता येतील. त्याच्यात वारंवार बदल करता येणार नाहीत. कॅपिटल मार्केटमध्ये येणारा पैशाचा ओघ स्थिर करण्यासाठी त्यांनी खालील सवलती जाहीर केल्या. फायनान्स ऍक्ट २ ऑफ २०१९ अन्वये कॅपिटल गेन्सवर वाढवलेला सरचार्ज आता कंपन्यांचे शेअर्स, इक्विटी फंडाची युनिट्स यांच्या विक्रीतून होणाऱ्या कॅपिटल गेन्सला लागू होणार नाही. मात्र यावर STT भरलेला असला पाहिजे. तसेच FPI ने केलेल्या सिक्युरिटीजच्या विक्रीला मग ती कॅश मार्केटमध्ये असो किंवा डेरिव्हेटीव्ह मार्केटमध्ये असो त्यापासून होणाऱ्या कॅपिटल गेन्सवर वाढवलेला सरचार्ज लागू होणार नाही. ह्या सर्व सवलती वटहुकूमाद्वारे मंजूर करण्यात येतील.

ज्या कंपन्यांनी आपल्या शेअर बायबॅकची घोषणा ५ जुलै २०१९ पूर्वी केलेली आहे त्यांच्या शेअर बायबॅकवर शेअर बायबॅकवर लागू होणारा २०% शेअर बायबॅक टॅक्स लागू होणार नाही

कंपन्या आपल्या CSR फंडातून राज्य किंवा केंद्र सरकारने किंवा PSU ने वित्त पुरवठा केलेल्या आणि पुरस्कृत केल्या इन्क्युबेटर्स, युनिव्हर्सिटीज, लॅबोरेटरीज यांना पैसे अलॉट करू शकतात.

या सर्व सवलतींमुळे सरकारला Rs १४५००० कोटींच्या रेव्हेन्यूवर पाणी सोडावे लागेल.

माननीय अर्थमंत्रयांच्या या घोषणेमुळे औद्योगिक जगताची कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याची किंवा त्यात काही सवलती देण्याची मागणी अंशतः तरी पुरी झाली.

कॅपिटलगेन्सवर वाढवलेल्या सरचार्जमुळे रुष्ट झालेले FPI नी अंदाजपत्रकातील या तरतुदीनंतर भारताच्या शेअरमार्केटमधून सतत विक्री करून आपला पैसा काढून घेतला होता. त्यामुळे शेअर मार्केट सतत पडत होते. आता ह्या सरचार्जशी तरतूद रद्द केल्यावर पुन्हा FPI आणि इतर विदेशी गुंतवणूक भारताच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतील अशी अपेक्षा आहे.

अर्थमंत्र्याच्या या घोषणांना शेअरमार्केटने भरभरून प्रतिसाद दिला. निफ्टीने आपली सर्व प्रकारची मूव्हिंग ऍव्हरेजीस पार केली. ह्या तरतुदी जवळ जवळ सर्व कंपन्यांना आणि सर्व क्षेत्रांना लागू होत असल्यामुळे सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली. आणि निर्देशांकांनी इंट्राडेवाढीचे सर्व रेकॉर्ड्स पार केले. ब्ल्यूचिप आणि लार्जकॅप शेअर्समध्ये लक्षणीय तेजी आली आणि शेअर मार्केटने एक महिना आधीच दिवाळी साजरी केली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८०१४ NSE निर्देशांक निफ्टी ११२७४ बँक निफ्टी २८९८१ वर बंद झाले
भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १९ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १९ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६३.५९ प्रती बॅरल ते US $ ६४.८८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.१३ ते US $१= Rs ७१.३२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.५० होता तर VIX १५.७८ होते.

आज USA ची सेंट्रल बँक फेडने ०.२५% चा रेट कट केला. आता व्याजाचे दर १.७५% ते २% या दरम्यान राहतील. फेडने लागोपाठ दुसऱ्यांदा रेट कट केला. USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवरील आर्थीक निर्बंध कडक करायची आवश्यकता आहे असे सांगितले.

RITES या कंपनीला श्री लंकेकडून मल्टिपल रेल्वे फॅसिलिटीजसाठी Rs १६० कोटीची ऑर्डर मिळाली.

NTPC ५००० MV चे UMRPP कच्छमध्ये सुरु करेल.

HDFC बँकेच्या स्टॉक स्प्लिटचा आज अखेरचा दिवस होता त्यामुळे आज बँकेच्या शेअरचा भाव अर्धा झाला. त्याचबरोबर दर्शनी किंमत Rs २ ची Rs १ होऊन शेअर्सची संख्या दुप्पट होईल. ( स्टॉक स्प्लिट, बोनस, मर्जर आणि इतर कॉर्पोरेट एक्शन विषयी माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे.)

केंद्रीय मंत्री पासवाननी सांगितले की FCI ( फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) मध्ये ८५% तागाच्या पॅकेजिसचा उपयोग केला जाईल.

IIFL वेल्थ मॅनेजमेंटचा शेअर Rs १२१० वर लिस्ट झाला.

TVS मोटर्सने TVS NTORQ १२५ CC ही मोटार बाईक Rs ६२९९५ ला लाँच केली.

टाटा मोटर्स त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार मार्च २०२० पर्यंत लाँच करतील. टाटा मोटर्सचा JLR ब्रँड BMW खरेदी करणार आहे. म्हणून आज मार्केट मंदीत असतानाही टाटा मोटर्सचा शेअर वाढत होता.

ब्रिटानिया इंडस्ट्रीज त्यांच्या शेअरहोल्डर्सना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक शेअरमागे एक फुली पेड फुली सेक्युअर्ड Rs ३० किमतीचा एक रिडिमेबल डिबेंचर इशू करणार आहे. यासाठी रेकॉर्ड डेट २४ ऑगस्ट २०१९ होती.

ल्युपिनला त्यांच्या मंदीद्वीप प्लांट साठी USFDA कडून वॉर्निंग लेटर मिळाले.

झी इंटरप्रायझेस मधील कोणाकडेही तारण म्हणून न ठेवलेला प्रमोटर्सचा स्टेक विकायला हायकोर्टाने मनाई केली. इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स या कंपनीने दिलेल्या कर्जाच्या परतफेडीत डिफॉल्ट केला म्हणून हायकोर्टाने मनाई केली.

कोळसा उत्पादन क्षेत्रात १००% FDI मुळे नवीन आणि अद्ययावत टेक्नॉलॉजीला उत्तेजन मिळेल. कोळसा खाणींचा लिलाव डिसेम्बर २०१९ पर्यंत केला जाईल.

सरकारने डायव्हेस्टमेन्ट करण्यासाठी १२ PSU ची निवड केली आहे. सरकार या PSU मधील आपला स्टेक ५१% पेक्षा कमी करेल. NTPC, PFC, पॉवर ग्रीड, BPCL, गेल, IOC, CONCOR, BEL, NALKO, MOIL,.कोणत्या PSU मध्ये किती प्रमाणात डायव्हेस्टमेन्ट करायची या साठी एक समिती नेमली जाईल.

सरकारचे टॅक्स कलेक्शन कमी होत असल्यामुळे सरकारचे रेव्हेन्यूचे लक्ष्य पुरे होणार नाही. क्रूड ऑइलच्या किमती वाढत असल्यामुळे भारताचे आयात बिल वाढेल. खाजगी बँकांनी कमर्शियल रिअल इस्टेटसाठी कर्ज दिली आहेत. दुसर्या तिमाहीचे कंपन्यांचे निकाल तेवढेसे चांगले येणार नाहीत. सरकारच्या उत्पनात घट झाल्यामुळे सरकारला आपल्या सार्वजनिक खर्चात कपात करावी लागेल. त्यामुळे मागणीवर परिणाम होईल. या सर्व गोष्टींचा विचार करून FII नी पुन्हा विक्री सुरु केल्यामुळे आज मार्केट सपाटून पडले.

उद्या होणाऱ्या GST कौन्सिलच्या मीटिंगमध्ये Rs ७५०० च्या वर भाडे असलेल्या हॉटेल्सना GST मध्ये सवलत मिळेल म्हणून हॉटेल कंपन्यांचे शेअर्स, देशी रेल्वे वॅगन उत्पादकांना GST मध्ये सवलत मिळेल म्हणून टिटाघर वॅगन आणि ऑक्टोबर २ २०१९ पासून अमलात येणाऱ्या सिंगल यूज प्लॅस्टिकच्या बंदीमुळे पेपर आणि ताग उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.
बाकी सर्व क्षेत्रांमध्ये मंदी होती.

RBL बँक त्यांच्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा Rs ५०० कोटींचा IPO आणणार आहे. ही स्माल फायनान्स बँक मुख्यतः बिहार आणि उत्तर प्रदेशात काम करते. उत्कर्ष कोअर इन्व्हेस्ट ही संस्था २००९ मध्ये स्थापन झाली. तिला २०१६ मध्ये स्मॉल फायनान्स बँकेचे लायसेन्स मिळाले आणि त्यांनी २०१७ मध्ये स्माल फायनान्स बँक म्हणून काम सुरु केले. या बँकेत UK सरकारच्या संस्थेचा १४%.स्टेक आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६०२३ NSE निर्देशांक निफ्टी १०७०४ बँक निफ्टी २६७५७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १८ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १८ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६४.१२ प्रती बॅरल ते US $ ६४.७० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.२० ते US $ १= Rs ७१.४८ या दरम्यान होता. US $ निर्देशांक ९८.२८ होता. VIX १५.८० होते.

सौदी अरेबियाने सांगितले की त्यांचे क्रूडचे उत्पादन ७०% नॉर्मल झाले आहे . सप्टेंबर २०१९ अखेरीपर्यंत पूर्णपणे नॉर्मल होई. त्याप्रमाणे आज क्रूडचे दर US $ १ =Rs ६८ प्रती बॅरल वरून US $१=Rs ६४ पर्यंत खाली आला. रुपयाही सुधारला.
USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की USA इराणबरोबरच्या युद्धासाठी सुसज्ज आहे.

आज रात्री उशिरा फेडने रेटकट विषयी काय निर्णय घेतला आणि इतर धोरण विषयक त्यांच्या काय कॉमेंट्स आहेत ते फेड जाहीर करेल. सर्वांची अपेक्षा आहे की फेड ०.२५% रेट कट करेल.

GST कौन्सिल ऑटो आणि ऑटो पार्ट्स बिस्किटे, विमा यावरील GST कमी करण्याची शक्यता मावळली. त्यामुळे आज ब्रिटानिया आणि ITC मध्ये मंदी आली लक्झरी हॉटेल्सच्या रूम भाड्यावरील GST कमी होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे आज सर्व हॉटेल्सच्या शेअर्स मध्ये तेजी आली.उदा :- इंडियन हॉटेल्स, EIH, ताज GVK, सयाजी हॉटेल्स, रॉयल आर्चिड्स, स्पेशॅलिटी रेस्टारंट

IIFL वेल्थचे १९ सप्टेंबर २०१९ रोजी तर IIFL सिक्युरिटीजचे २० सप्टेंबर २०१९ला लिस्टिंग होईल.

सरकारने ओपन सेल टी व्ही पॅनलवरील ड्युटी ५%ने कमी केली.

चीन आणि व्हिएतनाम यामधून वेल्डेड स्टील पाईप आणि ट्यूब भारतात डम्प केले जात होते. सरकारने या प्रकारच्या पाईप्स आणि ट्यूब्सवर ५ वर्षांकरता ANTIDUMPING ड्युटी लावली. याचा फायदा जिंदाल SAW, महाराष्ट्र सीमलेस, ASTRAL पॉली फिनोलेक्स या कंपन्यांना होईल.

सरकार कोल ब्लॉक्सच्या लिलावात विदेशी कंपन्यांकडूनही बोली मागवण्याची शक्यता आहे..

LED आणि LCD टी व्ही वरची ड्युटी कमी होईल याचा फायदा मर्क, BPL, सूर्या रोशनी यांना होईल.

SRF ने थायलंडमधील त्यांची टेक्निकल टेक्सटाईल ऑपरेशन्स बंद केली.

सरकारने E -सिगारेट्स च्या उत्पादन, आयात निर्यात, जाहिरात, साठा करण्यावर बंदी घातली. हा दखलपात्र गुन्हा ठरवून १ वर्षाच्या शिक्षेची आणि Rs १ लाख दंडाची तरतूद केली. या सरकारच्या धोरणात्मक निर्णयाचा फायदा गोल्डन टोबॅको, गॉडफ्रे फिलिप्स, ITC, VST यांना झाला. याबरोबरच ITC ची लक्जरी हॉटेल्स असल्यामुळे ITC मध्ये चांगलीच तेजी आली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६५६३ NSE निर्देशांक निफ्टी १०८४० बँक निफ्टी २७१७२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६८.१० प्रती बॅरल ते US $ ६८.७८ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.५९ ते US $१=Rs ७१.८३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.६३ होता. VIX १५.७५ होते.

आज भारताचे माननीय आणि अतिशय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ६९ वा वाढ दिवस. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ‘आजच्या मार्केट’ ची सूरूवात करू.

सौदी अरेबियामध्ये क्रूडचे ४०% उत्पादन पुन्हा सुरु झाले. क्रूड US $ ७० प्रती बॅरल पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उद्या फेडची मीटिंग संपल्यावर फेड रेट करणार का ? आणि केल्यास किती करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. USA चे अध्यक्ष ट्रम्प हे फेडने रेट कट करावा यासाठी सतत पाठपुरावा करत आहेत.

आज क्रूडचे वाढते दर, रुपयांची US $१=Rs ७२ पेक्षा घसरण आणि २२ तारखेच्या GST कौन्सिलच्या मीटिंगमध्ये GST दरांमध्ये कपात होण्याची शक्यता मावळल्यामुळे मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर मंदी आली.

सरकार आता लॉजिस्टिक सेक्टर साठी वेगळे धोरण आखणार आहे.

वाणिज्य मंत्री गोयल यांनी निर्यातदारांसाठी NIRVIK (निर्यात रिन विकास) योजना जाहीर केली. आता छोट्या निर्यातदारालाही विम्याचे जास्त संरक्षण मिळेल. यासाठी Rs ८५०० कोटींचा फंड उभारला जाईल.

सरकार STC MMTC या कंपन्या बंद करायचा विचार करत आहे. या कंपन्या इतर उद्योजकांसाठी परदेशातून माल मागवत होत्या. पण आता हे काम प्रत्येक कंपनी आपापले करते. STC वर कर्ज आहे यासाठी STC चे ऍसेट बँकांना दिले जातील. MMTC जरी फायद्यात असली तरी या फायद्यातून कोठलेही मोठे कार्य साध्य होत नाही. त्यामुळे या कंपन्या बंद करणे किंवा त्यांचे मर्जर करणे हे दोन्ही विचार डोळ्यासमोर आहेत. पण या कंपन्या बंद करण्याचा अंतिम निर्णय झालेला नाही.

SAIL आपल्या आयर्न ओअर उत्पादनापैकी २५% उत्पादनाची विक्री करू शकेल.

टाटा पॉवरने राजस्थानामध्ये १५० MV पॉवरची सोलर प्रोजेक्ट सुरु केली.

TCS ने बंगलोर येथील GM टेक्निकलबरोबर ENGG डिझाईन सर्व्हिसेस साठी ५ वर्ष मुदतीचा करार केला. TCS GM टेक्निकलमध्ये स्टेक खरेदी करेल.

DLF ही कंपनी आपली ३२ एकर जमीन अमेरिकन एक्स्प्रेसला विकणार आहे.

कॅफे कॉफी डे यांचा व्हिलेज टेक्निकल पार्क ब्लॅकस्टोन Rs २७०० कोटींना खरेदी करणार आहे. कावेरी सीड्स या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची शेअर बाय बॅकवर विचार करण्यासाठी २४ सप्टेंबर २०१९ रोजी बैठक बोलावली आहे.
टाटा कम्युनिकेशन मधून १७ सप्टेंबर २०१९ ही रेकॉर्ड डेट असल्यामुळे VSNL च्या मालकीचे ७७३.७० एकर जमीन (या जमिनीची किंमत Rs १०००० ते Rs १४००० कोटी आहे) हेमिस्फिअर प्रॉपर्टीज म्हणून वेगळी केली गेली. या जमिनीची किंमत प्रती शेअर Rs १७५ ते Rs १९० असल्यामुळे टाटा कम्युनिकेशनची किमत त्याप्रमाणात कमी झाली.म्हणजे Rs २६० झाली तुमच्या जवळ जर टाटा कम्युनिकेशनचा १ शेअर असेल तर तुम्हाला हेमिस्पिअर प्रॉपर्टीजचा एक शेअर मिळेल.
IL & FS ची वसुली प्रक्रिया योग्य मार्गावर आहे. Rs ५०००० कोटी एवढी वसुली होईल असा अंदाज आहे.

आज BALMER LAWRIE या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बोनसवर विचार करण्यासाठी बैठक असल्यामुळे ह्या शेअर मध्ये तेजी होती.

आजपासून ४८ कंपन्यांचे शेअर ज्यात युनिप्लाय, स्मार्ट लिंक, प्रोझोन, मुकंद, आशापुरा माईनकेम या कंपन्यांचा समावेश आहे T टू T सेगमेंट मधून बाहेर येतील

तांत्रिक विश्लेषण

Technical Chart

 

गोल्डन क्रॉस आणि डेथ क्रॉस या दोन पॅटर्नकडे विश्लेषकांचे लक्ष असते. ज्यावेळी शॉर्ट टर्म मूव्हिंग ऍव्हरेजची लाईन ( ५० दिवसांची मूव्हिंग ऍव्हरेजीसची लाईन) लॉन्ग टर्म मुविंग ऍव्हरेजीसच्या लाईनला (२०० दिवसांच्या मूव्हिंग ऍव्हरेजीसची लाईन) वरच्या दिशेने छेदते आणि क्रॉस करून वर जाते त्याला गोल्डन क्रॉस म्हणतात. अशावेळी शॉर्ट टर्म मध्ये तेजी येते. . या उलट शॉर्ट टर्म ऍव्हरेजीसची लाईन लॉन्ग टर्म ऍव्हरेजीसच्या

लाईनला खालच्या दिशेने क्रॉस करते आणि खाली जाते त्या वेळी शॉर्ट टर्म मध्ये मंदी येते याला डेथ क्रॉस असे म्हणतात. अशा प्रकारचा डेथ क्रॉस पॅटर्न सध्या तयार झाला आहे. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये मंदी राहील

 

 

 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६४८१ NSE निर्देशांक निफ्टी १०८१७ बँक निफ्टी २७१३१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!