आजचं मार्केट – ३ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ५८.०९ प्रति बॅरल ते US $ ५८.७५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.९६ ते US $१= Rs ७२.३३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९९.२६ तर VIX १८ होता.

दिनांक १ सप्टेंबर २०१९ पासून चीन आणि US ने परस्परांकडून आयात होणाऱ्या वाढवलेली ड्युटी लागू झाली. चीनने USA मधून आयात होणाऱ्या क्रूडवर ५% लावली. अशा पद्धतीने चीन आणि USA मधील ट्रेड वार थांबण्याचे चिन्ह दृष्टीपथात नाही. चीनने WTO (वर्ल्ड ट्रेंड ऑर्गनायझेशन) कडे या संबंधात तक्रार नोंदवली आहे.

आज रुपया ९ महिन्यांच्या किमान स्तरावर होता.

१ सप्टेंबर रोजी ऑगस्ट महिन्यातील ऑटो विक्रीचे आकडे जाहीर झाले. मार्केटच्या अपेक्षेच्या विपरीत प्रत्येक कंपनीच्या विक्रीमध्ये १० ते १५ % (YOY) घट दिसून आली.

अशोक लेलँडची विक्री मात्र ५०% कमी झाली. अशोक लेलँडच्या हेवी ट्रकला BSVI प्रमाणपत्र मिळाले.

TVS मोटर्सच्या विक्रीमध्ये १५.५% घट झाली (YOY). मात्र त्यांची निर्यात वाढली.

एस्कॉर्टसची ट्रॅक्टर विक्री १९.५% (YOY) ने कमी झाली.

BPCL मधील सरकारचा हिस्सा IOC Rs ४०००० कोटींना खरेदी करणार आहे.

गेलचा मार्केटिंग विभाग BPCL किंवा IOC विकत घेईल.

NTPC सरकारचा SJVN मधील संपूर्ण स्टेक विकत घेणार

ONGC च्या नवी मुंबई प्लांटमध्ये आज आग लागली. या आगीमुळे मुंबई महानगरांमधील CNG आणि PNG पुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

आज मंत्रिमंडळाने आपल्या बैठकीत इथेनॉलमध्ये Rs ०.४९ ते Rs १.८४ या मर्यादेत दरवाढ मंजूर केली. सरकारने २०२० -२१ पर्यंत Rs २६० कोटी लिटर्स इथेनॉल ब्लेंडींगचे लक्ष्य ठेवले आहे. या वर्षापर्यंत इथेनॉल ब्लेंडींग १०% पर्यंत नेण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. शुगर सिरप पासून बनवलेले इथेनॉल खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली.

सरकारने टेक्स्टाईल उद्योगाला उत्तेजन देण्यासाठी काही उपाय योजण्याचे ठरवले आहे. सिंथेटिक यार्न आणि मॅन मेड फायबर यावरील GST १८% वरून १२% केला जाईल.

यार्नवरील आयात ड्युटी ५% वरून १०% पर्यंत वाढवण्यात येईल. याचा फायदा रेयॉनला होईल.

हाय स्पीड शटल लेस लूम वरील सबसिडी १०% वरून १५% पर्यंत वाढवली जाऊ शकते. याचा फायदा वर्धमान टेक्सटाईल्सला होईल.

आज सरकारने IDBI बँकेत Rs ९००० कोटी भांडवल LIC बरोबर संयुक्तरित्या गुंतवण्याची घोषणा केली. सरकार Rs ४५५७ कोटी आणि LIC Rs ४७४३ कोटी भांडवल गुंतवेल.

आज मार्केटमध्ये ज्या बँका अँकर बँका म्हणून निवडल्या गेल्या त्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त प्रॉफिट टेकिंग दिसून आले. ज्या बँका अँकर बँकेमध्ये मर्ज होणार आहेत त्यापैकी काही बँकांमध्ये मामुली तेजी दिसून आली.आज खासगी बॅंकांमध्येही मंदी दिसून आली.

रुपया सतत घसरत असल्याने IT क्षेत्रातील इन्फोसिस, TCS HCL TECH, टेकमहिन्द्र या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
USA आणि चीन यांच्यातील चिघळते ट्रेड वार, ऑटोविक्रीचे असमाधानकारक आकडे, घसरणारा रुपया आणि येऊ घातलेली जागतिक मंदी, GDP ग्रोथचे असमाधानकारक आकडे यांच्यामुळे सर्व टेक्निकल सपोर्ट्स तोडत आज मार्केट पडतच राहिले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६५६२ NSE निर्देशांक निफ्टी १०७९७ बँक निफ्टी २६८२४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.