आजचं मार्केट – ५ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ५ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६०.४१ प्रती बॅरल ते US $ ६०.७७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.७९ ते US $१=Rs ७१.९५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.४८ होता. VIX १६.८० होते.

ऑक्टोबर २०१९ च्या सुरुवातीला चीन आणि USA यांच्या वॉशिंग्टनमध्ये समोरासमोर बसून व्यापारासंबंधी द्विपक्षीय वाटाघाटी होतील. चीनने USA च्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून ही घोषणा केली. यामुळे USA आणि चीन यांच्यातल्या चिघळलेल्या ट्रेड वॉरमध्ये सामोपचाराची भूमिका घेतली जाईल अशा विचाराने आशियातील सर्व मार्केट सुधारली.
FY १९-२० च्या पहिल्या तिमाहीत FDI २८% ने वाढून US $ १६ बिलियन झाली.

आज RBI ने बँकांना गृह कर्ज, पर्सनल कर्ज आणि MSME ना दिलेल्या कर्जावरील दर रेपो रेट किंवा FBIL (फायनान्सियल बेंचमार्क इंडिया लिमिटेड) यांनी ठरवून दिलेल्या बेंचमार्क रेटशी लिंक करावे लागतील अशी सूचना दिली. ह्या दरांचा दर तीन महिन्यांनी रिव्ह्यू घेतला जाईल. आणि बँकेने ठरवलेला स्प्रेड तीन वर्षे तरी बदलता येणार नाही. ह्यामुळे आता RBI ने केलेले रेट कट कर्जदारांपर्यंत जलद आणि निश्चितपणे पास ऑन होतील.यामुळे बँकांचे या तीन प्रकारच्या कर्जावरील NII (नेट इंटरेस्ट इन्कम) कमी होईल. याचा परिणाम NIM (नेट इंटरेस्ट मार्जिन) वर होईल. आता तरी ही प्रोव्हिजन नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना लागू होईल. ज्या बँकांचे ह्या तीन प्रकारच्या लोनचे एक्स्पोजर जास्त होते त्या बँकांच्या शेअर्समध्ये मंदी आली. यात ICICI बँक ( गृह कर्ज आणि SME यांच्यावर भर) आणी LIC हौसिंगवर परिणाम झाला आणि दोन्ही शेअर पडले. बँकांनी असे सांगितले की सिस्टीममध्ये लिक्विडीटी पुरेशी असल्यामुळे बँका कोणत्याही प्रकारचे कर्ज द्यावयास तयार आहेत.

आज PNB च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी बँकेच्या OBC आणि युनायटेड बँकेबरोबरच्या मर्जरला मंजुरी दिली.
LAURAS लॅबच्या विशाखापट्टणम येथील युनिट १ आणि युनिट ३ ला USFDA ने EIR दिला त्यामुळे हा शेअर वाढला.
आज माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. येत्या ३ महिन्यात Rs ५ लाख कोटींच्या ६८ रोड प्रोजेक्टसाठी कंपन्यांना ऑर्डर दिल्या जातील. सरकार पेट्रोल आणि डिझेल वाहने बंद करणार नाही. हायब्रीड वाहनांवरील GST कमी करण्याविषयी विचारविमर्श चालू आहे. ऑटो निर्यातीसाठी सबसिडी देण्यावर तसेच पेट्रोल आणि डिझेल वाहनांवरील कर कमी करण्याविषयी विचार चालू आहे. ऑटो कंपन्यांनी विक्री वाढवण्यासाठी ऑटो कर्जासाठी आपली स्वतंत्र व्यवस्था चालू करावी

मारुतीने सांगितले की ते FY १९-२० च्या उत्तरार्धातील प्रगतीविषयी आशावादी आहेत. BSVI च्या अटी पूर्ण करण्यासाठी कार्सच्या किमती Rs १५००० नी वाढवाव्या लागतील. कंपनी FY २०-२१ मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच करेल.
JAYPEE होम बायर केसमध्ये सुप्रीम कोर्टाने NBCC ला तीन आठवड्याच्या आत त्यांची योजना सादर करायला सांगितले.
आज सरकारने मलेशियातून आयात होणाऱ्या RBD पामोलिन आणि पाम ऑइलवर ५ % सेफगार्ड ड्युटी लावली. मलेशियातून रिफाईंड तेलाची खूपच आयात होत असल्याने स्वदेशी उद्योगाचे नुकसान होत होते.

आज रिलायन्स जिओ फायबर मार्केटमध्ये लाँच करेल.

बजाज फायनान्स Rs १०० कोटी किमतीचे शेअर्स नोमुरा आणि कोटक बँक यांना विकण्याची शक्यता आहे.
PSU ना आता काँट्रॅक्टर्सना त्यांनी केलेल्या कामाचे पैसे ठरावीक मुदतीत द्यावे लागतील. अन्यथा त्यांना पेनल्टी लावली जाऊ शकते. आर्बिट्रेशनमध्ये अडकलेली रक्कम आता लवकर मिळेल. यासाठी जरूर वाटले तर PSU ना लागू होणाऱ्या नियमात बदल केले जातील.

सरकार लवकरच Rs २० लाख कोटीच्या इन्फ्रा योजनांची घोषणा करेल. यात फ्रेट कॉरिडॉर, पोर्ट ट्रस्ट, गॅस पाईप लाईन, वेअरहाऊस यांच्यावर भर असेल. या इन्फ्रा प्रोजेक्टसाठी निवडक PSU बरोबर माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बैठक घेतील. रिअल टाइम मॉनिटरिंगसाठी एक टास्क फोर्स नेमला जाईल.

DR रेड्डीज ने USA मध्ये ZYBAN ह्या औषधाची जनरिक व्हर्शन लाँच केली.

कोचिन शिपयार्ड या कंपनीला कोच्ची मेट्रोकडून LOA ( लेटर ऑफ ऍक्सेप्टन्स) मिळाले.

भूषण पॉवर या कंपनीचा JSW स्टीलने सादर केलेला रेझोल्यूशन प्लॅन NCLT ने मंजूर केला. सरकार लवकरच BEL, BEML, शिपिंग कॉर्पोरेशन, हिंदुस्थान कोपर यासारख्या PSU मध्ये स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर आणण्याचा प्रयत्न करत आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६६४४ NSE निर्देशांक निफ्टी १०८४७ बँक निफ्टी २६९१९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.