आजचं मार्केट – ११ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ११ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६२.७१ प्रती बॅरल ते US $ ६३.०४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.६३ ते US $१=Rs ७१.७७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.२५ तर VIX १४.८८ होता.

आज हाँगकाँगच्या प्रकरणात थोडी नरमाई आली. युरोपियन युनियन आणि फेड आपल्या वित्तीय धोरणात विविध सवलती देतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आज मार्केटमध्ये थोड्या प्रमाणात तेजी होती.

चीनची अर्थव्यवस्था क्लोज्ड अर्थव्यवस्था आहे. चीन आता आपली अर्थव्यवस्था हळू हळू ओपन करत आहे. चीन आपल्या युआन या करन्सीच्या व्हॅल्यूमध्ये वारंवार बदल करत असते. आज चींनने त्यांच्या कॅपिटल मार्केटमध्ये FII साठी घातलेले निर्बंध उठवले.FII च्या गुंतवणुकीवर असलेली US $३०० बिलियनची मर्यादा उठवली. आता चीनच्या शेअर आणि बॉण्ड मार्केटमध्ये परदेशी गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मेटल संबंधीत शेअर्समध्ये तेजी होती.

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वेळोवेळी केलेल्या ट्विटचे विश्लेषण करून JP मॉर्गन यांनी VOLFEFE निर्देशांक तयार केला आहे. ट्रम्प यांनी केलेल्या ट्विट नंतर बॉण्ड करन्सी कमोडिटी आणि इक्विटी मार्केट मध्ये होणाऱ्या बदलांचा हा निर्देशांक अभ्यास करतो.

इंडोनेशियाने त्यांच्या मार्केटमध्ये भारताला ऍक्सेस देण्याचा प्रस्ताव ठेवला भारताने यावेळी ५० लाख टन साखर निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. इंडोनेशियाने ICUMSA ( इंटरनॅशनल कमिशन फॉर युनिफॉर्म मेथड ऑफ शुगर ऍनॅलिसिस) च्या नियमात सवलत देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भारताने या प्रस्तावाला सहमती दिली आहे. याचा फायदा साखर निर्यात करणाऱ्या कंपन्यांना होईल. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

सरकारने बँकांना असे सुचवले आहे की छोट्या उद्योगधंद्यांना( ज्यांनी Rs २ कोटी ते Rs ५ कोटी कर्ज घेतले आहे) त्यांच्या थकलेल्या कर्जाच्या बाबतीत कारवाई करताना थोडे नरम धोरण ठेवावे. जर थकबाकी राहण्याची कारणे खरी असतील तर ही खाती ताबडतोब रिस्ट्रक्चर करावी. मालमत्ता जप्त करून वसुली करणे हा शेवटचा पर्याय ठेवावा.

सरकारने असे जाहीर केले की थोड्याच दिवसात रिअल्टी क्षेत्रासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले जातील.

माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की ५ ते ६ वर्षांत भारत हा एक ऑटो मॅन्युफॅक्चरिंग हब बनेल. दुचाकी वाहनांसाठी लवकरच स्क्रॅपेज पॉलिसी बनवण्यावर विचार मंथन चालू आहे. या मंत्र्यांच्या घोषणेनंतर दुचाकी वाहने उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. हिरो मोटो, बजाज ऑटो, TVS मोटर्स.

आज पंतप्रधानांनी मथुरेमध्ये सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बहिष्कार टाकून भारत सिंगल यूज प्लास्टिक मुक्त करण्याचे आवाहन केले. घरात आणि कार्यालयात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नये. प्लास्टिक रिसायकल केले जाईल. जे प्लास्टिक रिसायकल होऊ शकत नाही त्याचा उपयोग सरकार रस्ते बनवण्यासाठी करेल. या पंतप्रधांनांच्या घोषणेनंतर पेपर, ज्यूट उत्पादक कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी आली.

सरकार सरकारी NBFC मधील स्टेक कमी करण्याचा विचार करत आहे. DIPAM या बाबतीत लवकरच एक नोट प्रसारित करेल.

भेलने ओडिशात १३२० MV प्लांटचे काम सुरु केले

ONGC गुजरातमध्ये १३४ विहिरींची खोदाई करेल.

राणा कपूर या येस बँकेच्या प्रमोटर्सनी आपला ९.६४% स्टेक Rs २००० कोटींना विकण्याचे ठरवले आहे. या शेअर्सची व्हॅल्यू Rs १५५४ कोटी आहे. त्यांची याबाबतीत पे टी एम च्या विजय शेखर शर्मा यांच्याशी बोलणी चालू आहेत. या बातमीमुळे येस बँकेच्या शेअरमध्ये तेजी आली.

फायनान्सियल सेक्रेटरीने सांगितले की भांडवल घातल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका आता PCA च्या बाहेर येऊ शकतील. रिफॉर्म्समुळे NPA कमी झाले. बँकांनी फ्रॉडविषयी रिपोर्टींग ताबडतोब करावे. सर्व NPA खाती IBC च्या दारापर्यंत नेऊ नयेत. विक्री वाढण्यासाठी बँकांनी व्याजाचे दर कमी करावेत.

होंडाने आपली BSVI ऍक्टिव्हा १२५ लाँच केली.

भारती एअरटेलने Rs ३९९९ प्रती महिना ब्रॉडबँड पॅकेज लाँच केले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७२७० NSE निर्देशांक निफ्टी ११०३५ बँक निफ्टी २७५७६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.